नारायणी भाव

Submitted by नवनाथ राऊळ on 21 June, 2015 - 08:04

नारायणी भाव । परिस बा दासा ।
नुपजे सहसा । अकारणें ॥१॥

हरीप्रेम चित्तीं । खळाळें निर्झरु ।
उमळें पाझरु । अहोभाग्यें ॥२॥

ऐशा भावें पाहीं । बहुमोल ठेवा ।
पांडुरंगें जीवां । धाडिलासे ॥३॥

नाथ म्हणें रावें । प्रेमें भरविला ।
तोचि जाणियेंला । गुरूमंत्र ॥४॥

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हरीप्रेम चित्तीं । खळाळें निर्झरु ।
उमळें पाझरु । अहोभाग्यें ॥२॥ >>> ही खरोखरच महद्भाग्याची गोष्ट आहे.. बहुत सुकृताची जोडी म्हणूनि विठ्ठली आवडी ||

भावपूर्ण अभंग ....