Submitted by भागवत on 15 June, 2015 - 13:03
वेळ संध्याकाळची... रस्त्यावर दररोजचाच ट्राँफिक जाँम... सगळ्यांची धावपळ...
पाणीपुरी वाला स्टाँल चे सगळे सामान डोक्यावर घेऊन रस्त्याच्या कडेने जातोय.
त्याच्या मागे गाडा आहे. तेवढ्यात कारने शॉर्ट्कट मारून गाड्याला कट मारली.
संभाव्य टक्कर टाळण्यासाठी गाडा हाकण्याराने रस्त्याच्या कडेला गाडा घुसवला.
गाड्याचा धक्का लागून, एका क्षणार्धात पाणीपुरी स्टाँल साठी सकाळ पासून केलेली सगळी मेहनत रस्त्यावर सांडली.
चुक कोणाची आणि शिक्षा कोणाला. . .
कार कोणाचीही पर्वा न करता पुढे निघून गेली....
गाड्यामुळे(pushcart) धक्का बसला पण तो काही दाद देईना.
नुकसान भरपाई आणि पुढे काय हे विचार त्याचा डोक्यात पिंगा घालतायत.
आपल्या चुकीमुळे दुसऱ्याला किती यातना होतात याची मोजदाद आपण कधीच करत नाही.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे. निसटली होती नजरेतुन.
छान आहे. निसटली होती नजरेतुन.
आपल्या चुकीमुळे दुसऱ्याला
आपल्या चुकीमुळे दुसऱ्याला किती यातना होतात याची मोजदाद आपण कधीच करत नाही.>>> अगदी अगदी
मस्त कथा..
धन्यवाद पियू, स्नेहनिल
धन्यवाद पियू, स्नेहनिल
आपल्या चुकीमुळे दुसऱ्याला
आपल्या चुकीमुळे दुसऱ्याला किती यातना होतात याची मोजदाद आपण कधीच करत नाही.>> दुर्दैवाने खरं आहे.