Submitted by मिल्या on 4 June, 2015 - 23:48
पावसाची सुरू पुन्हा वारी
त्यास विठ्ठल जणू धरा सारी
आरशाचे सदैव का ऐकू?
एवढीही नकोच लाचारी
ह्या सुखाच्या महाग वस्त्रांचा
पोत नसतो कधीच जरतारी
आंधळी न्यायदेवता इथली
आणि सारेच देव गांधारी
मांजरासारखे अती लुब्रे
दु:ख येते पुन्हा पुन्हा दारी
दूर गेलीस खेद ना त्याचा
गंध का धाडलास माघारी?
स्वप्न माझे जळून गेले तर
राख सुद्धा खपेल बाजारी
दु:ख आले निघूनही गेले
सांत्वने एकजात सरकारी
मिलिंद छत्रे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दु:ख आले निघूनही
दु:ख आले निघूनही गेले
सांत्वने एकजात सरकारी....
आवडली गझल.
मस्त रे मिल्या!
मस्त रे मिल्या!
धन्यवाद।
धन्यवाद।
क्या बात है ....
क्या बात है ....
लुब्रे मस्त शब्द आवडली गझल
लुब्रे मस्त शब्द
आवडली गझल
व्वाह ! मस्त गजल .. दु:ख आले
व्वाह ! मस्त गजल ..
दु:ख आले निघूनही गेले
सांत्वने एकजात सरकारी >>>>>> हा शेर खास आवडला ..
छान. आवडली गझल. स्वप्न माझे
छान. आवडली गझल.
स्वप्न माझे जळून गेले तर
राख सुद्धा खपेल बाजारी
-दिलीप बिरुटे
धन्यवाद सर्वांना
धन्यवाद सर्वांना