'नी' ची कहाणी
हा दागिना म्हणजे 'नी' च्या कहाणीचे महत्वाचे वळण आहे. आसनं समर्पयामि! मधली गणपतीबाप्पाची कहाणी वाचून एका मायबोलीकर मैत्रिणीने गळ्यातल्यासाठी विचारले. मी या प्रकारे बनवलेल्या दागिन्यांची ज्वेलरी लाइन लाँच करणार आहे हे बर्याच मित्रमैत्रिणींना माहिती होतं पण कधी याची मलाही कल्पना नव्हती. त्यामुळे अर्थातच ज्वेलरी लाइनचे नाव काय ठेवायचे वगैरेही ठरलेले नव्हते. मी फक्त माझी कारागिरी अधिकाधिक सुबक व्हावी यासाठी भरपूर प्रॅक्टिस करत होते, ती करता करता माझ्या स्वतःसाठी तांब्या पितळ्याची ज्वेलरी बनत होती.
मैत्रिणीला गळ्यातले करून द्यायचे मान्य केले. मग आम्ही साधारण स्टाइल ठरवली. तिला हव्या असलेल्या तारखेच्या आत गळ्यातले बनवले. त्याच वेळेला 'नी' हे नाव नक्की केले.
मी बनवलेल्यापैकी विकलेला हा पहिला दागिना.
यातला दगड सिंधुदुर्गातल्या नदिकाठी गोळा केलेला आहे.
धातू जर्मन सिल्व्हर आहे.
यानंतर ही कला वापरून बनवलेल्या वस्तू (सध्या फक्त कानातली) 'नी' या लेबलखाली लाँच केल्या.
१० एप्रिल रोजी मराठी स्त्रियांपुरत्या असलेल्या एका संकेतस्थळावर याचे छोटे ओपनिंग केले.
मग १५ एप्रिल रोजी फेसबुक पेज सर्वांसाठी खुले केले.
पूर्ण कलेक्शनपैकी बरेचसे विकले गेले असून आता फक्त ३०% च कलेक्शन उरले आहे.
नियमभंग होऊ नये म्हणून कुठलीच लिंक इथे देत नाहीये.
- नी
भारीच! आता exclusive designer
भारीच! आता exclusive designer दागिने असा नवीन गिफ्ट ऑप्शन लक्षात ठेवेन! नी च्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
वा! आवडले! हार्दिक अभिनंदन
वा! आवडले! हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!
आपुन के पास फर्स्ट लॉट का एक
आपुन के पास फर्स्ट लॉट का एक इअर्रिंग हय!
( सिनेमा फर्स्ट डे फर्स्ट शो पहाण्यात वेगळीच मजा असते तस !!)
निरजा , जेव्हा जेव्हा घातल ,तेव्हा लोकानी कानातल्याबद्दल कॉम्प्लिमेंट्स दिल्या. थॅन्क्स अॅन्ड बेस्टॉफ्लक!!
अभिनंदन आणि शुभेच्छा नी.
अभिनंदन आणि शुभेच्छा नी.
इन्ने, फोटु शेअर कर की माझ्या
इन्ने, फोटु शेअर कर की माझ्या फेबुपेजवर तुझा कानातलं घातलेला.
अभिनंदन आणि शुभेच्छा नी.
अभिनंदन आणि शुभेच्छा नी.
नी, खूप खूप अभिनंदन आणि पुढिल
नी, खूप खूप अभिनंदन आणि पुढिल वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
वाह खूपच छान.... दागिने कसे
वाह खूपच छान.... दागिने कसे मागवता येतील?
नाव एकदम मस्तच.
व्वा... छानच की ! छंदाला
व्वा... छानच की !
छंदाला व्यवसायात बदलणे तितके सोपे नसते.
(बाकी शीर्षक बघितल्यावर आधी मला वाटले होते कि आता ही काय "ऐका सोळा सोमवारची कहाणी" वगैरे सारखे काही सांगु लागलिये की काय....
)
अभिनंदन नी!
अभिनंदन नी!
हो मी पाहिले आहेत तू बनवलेले
हो मी पाहिले आहेत तू बनवलेले दागिणे आणि फार फार आवडलेत मला.
ही बातमी वाचून फार आनंद झाला.
पुढील वाटचालीकरता अनेक उत्तम शुभेच्छा.
अभिनंदन नीधप आणि पुढील
अभिनंदन नीधप आणि पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा!! ज्वेलरी लाइनचे नाव आणि लोगो मस्त एकदम.
सुंदर घडण... दगड भाग्यवान
सुंदर घडण... दगड भाग्यवान आहेत.
पुरुषांसाठी पण काहीतरी करता येईल कि.. ( फर्माईश म्हणा, सूचना म्हणा, मागणी म्हणा... )
अतिशयच अवांतर: (पण राहवलेच
अतिशयच अवांतर: (पण राहवलेच नाही म्हणुन नीरजेची आधीच माफी मागून ... )
>>>> सुंदर घडण... दगड भाग्यवान आहेत --- पुरुषांसाठी पण काहीतरी करता येईल कि.. <<<< आर यू रिअली सिरीयस फॉर द्याट?????

"डोक्यावर मिरे वाटणे" ही म्हण माहिते का?
पुरुषाचे डोके म्हणजे पाटा, तर मापानुसार त्याकरताचे (बहुधा अदृष्य) वरवंटे फारफार तर बनवता येतील, असे माझे प्रामाणिक मत!
नी, अभिनंदन आणि हार्दीक
नी, अभिनंदन आणि हार्दीक शुभेच्छा.
आभार. मेन्स ज्वेलरी करणार
आभार.
मेन्स ज्वेलरी करणार आहे. लॉकेटस, ब्रेसलेटस आणि अंगठ्या वगैरे. वेळ आहे त्याला जरा.
नीरजे, टायपीन... जमेल का?
नीरजे, टायपीन... जमेल का?
करून बघावी लागेल.
करून बघावी लागेल.
मेन्स ज्वेलरीची कल्पना फारच
मेन्स ज्वेलरीची कल्पना फारच मस्त आहे. कारण, ह्यामधे स्पर्धा फार कमी आहे आणि हल्ली तर ही तरुणांची गरज आहे.
नी, सिरियसली.. अनेक मायबोलीकर
नी, सिरियसली.. अनेक मायबोलीकर सतत भटकत असतात. काही खास प्रकारचे दगड आणून दिले तर चालतील का ? नेमके कसे हवेत हे सांगितले तर भरपूर दगड मिळतील.
यू क्लिपला जेवढी
यू क्लिपला जेवढी स्प्रिंगअॅक्शन/दबाव असतो तेव्हडा तरी यायला हवा. असो. जमेल तसे बघ.
सन स्टोन नामक एक दगड आहे तो
सन स्टोन नामक एक दगड आहे तो देखील ज्वेलरी म्हणून छान उपयोगाला आणता येईल
काही खास प्रकारचे दगड आणून
काही खास प्रकारचे दगड आणून दिले तर चालतील का ? <<
हो चालेल की.
>> नेमके कसे हवेत हे सांगितले तर भरपूर दगड मिळतील. <<
अंगावर घातल्यावर गळ्यात धोंडा बांधून जलसमाधी घ्यायची वेळ आली असे वाटावे एवढे जड वा मोठे नकोत. बाकी काही प्रेफरन्स नाही.
यू क्लिपला जेवढी स्प्रिंगअॅक्शन/दबाव असतो तेव्हडा तरी यायला हवा. << त्यासाठीच करून बघायला हवे म्हणाले.
माझ्या मते कफ लिंक्स मस्त
माझ्या मते कफ लिंक्स मस्त दिसतील, जर छानसे एक सारखे दिसणारे दगड मिळाले तर.
नी, एखाद्या स्पेसिफीक ऑर्डर साठी इनबॉक्स मधे मेल करायची आहे हे ठीक आहे, पण साधारण या इअर रिंग्ज कितीच्या रेंज मधे आहेत? म्हणजे रु. १०० च्या खाली, १०० ते ५०० रु., ५०० ते १००० रु.ई.ई.? मला खरंच यातलं जास्त काही कळत नसल्यामुळे, गिफ्ट्साठी परवडतील का नाही याचा जरा अंदाज लावायला बरे पडेल.
खरेदी विक्री संदर्भाने कुठलीच
खरेदी विक्री संदर्भाने कुठलीच चर्चा मायबोलीवर नको प्लीज अन्यथा नियमभंग म्हणून हा धागा उडवला जाईल.
खुपच छान आहे. मस्तच
खुपच छान आहे. मस्तच
अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनंदन नी! नव्या
अभिनंदन नी!
नव्या ज्वेलरीलाइनसाठी खूप शेभेच्छा!
नीरजा, अभिनंदन आणि अनेक
नीरजा, अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा!!
आभार
आभार
Pages