निद्रिस्त महाराष्ट्र पाहून , आज सह्याद्री रडतो आहे
स्वैर झाले विचार, मुठ हातातच गळली
जाज्वल्य इतिहास आपला, आजची पिढी विसरली
जिथ स्वराज्य स्थापिले, तीच ही सह्याद्री माउली
स्वाभिमान विसरून कार्टी, गडाकड फिरकली
दगडावर नाव कोरले, गळ्यात गळे घातले
इतिहास विसरून आपला, अब्रूस वेशीवर टांगले
सुशिक्षित म्हणती स्वताला, ज्ञान मात्र शून्य
बापजाद्याची आठवण नाही, नपुसंक त्यांचे पुण्य
आई बापाचेच संस्कार नाहीत, लेकरे उद्दाम निपजली
सांगा त्यांस आपल्या राजाने, स्वराज्यासाठी तलवार उपसली
इतिहास गर्जून आम्हास, कटू सत्य सांगतोय
आजही मराठा अवघा, हिरव्या रंगात न्हाहतोय
लाज नाही मुळीच, ना स्वाभिमानाची चाड उरली
शिवरायांच नाव घेवून कोणी, भुकेलेली भूक शमवली
खूप काही आहे लिहिण्यासारखे, आवर आता घालतो आहे
निद्रिस्त महाराष्ट्र पाहून , आज सह्याद्री रडतो आहे
© कवी - गणेश पावले
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान
यावर चर्चा होणे गरजेचे होते….
यावर चर्चा होणे गरजेचे होते…. पण नाही झाली
खरंच छान धागा. चर्चा व्हायला
खरंच छान धागा. चर्चा व्हायला हवी.
जाऊ द्या हो ... रडू द्या
जाऊ द्या हो ... रडू द्या त्याला. एकदा कळले आपले लोकं नाकर्ते आहेत की मग तो पण रडणे थांबवेल. अजुनी तो महाराज आणि इतर मावळे मराठ्यांमध्ये अडकून पडलाय! अरे गेले ते दिवस, आता फक्त निवडून यायचे आणि फोर्चुनर उभी करायची आणि आपलं घर किल्ला कसं होईल ते पाहायचं.
अनिरुद्ध_वैद्य - साहेब वास्तव
अनिरुद्ध_वैद्य - साहेब वास्तव बोललात… हि वृत्ती महाराष्ट्राला / देशाला पुन्हा पारतंत्र्यात घेवून जायील शंका नाही