जिप्सीची फोटोग्राफी

Submitted by गणेश पावले on 11 May, 2015 - 05:30

जिप्सी (उर्फ- योगेश जगताप)
http://www.maayboli.com/user/2170

जिप्सी नावाची एक आगळी वेगळी दुनिया जी निसर्गसौंदर्याने नटलीय…. कृष्णाची द्वारका पाहिली नाही पण जीप्सीची दुनिया पाहण्याचा योग रोज रोज येतो.

मायबोलीवर फिरता फिरता मी या जिप्सी नावाच्या वलयात प्रवेश केला आणि कुबेराचा खजिनाही फिका पडेल असा खजिना पाहायला मिळाला….
अहो…. " पडेल काय….?
ऑलरेडी पडलाय….!!
सह्याद्रीच वेड कुणाला नसतं?…
या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला येणारया प्रत्येक प्राण्याला असतं….
मग हा जिप्सी नावाचा अवलिया यातून कसा चुकेल….
सह्याद्रीच वेड लागलेला हा जिप्सी…. अथांग (सागरापासून) ते उतुंग (पर्वतापर्यंत) व्यक्तिमत्व जणू एक "सह्यवेडा".
फोटोग्राफी हा श्वास… आणि ध्यास बनलेला हा सह्यवेडा एकदा सह्याद्रीत (निसर्ग सानिध्यात ) शिरला कि, सह्याद्री त्याला आपलं खर रूप दाखवतो. जे रूप तो सहजा सहजी कुणाला दाखवत नाही.
त्यांनी काढलेली इतकी अप्रतिम छायाचित्र… इतकी बोलकी वाटतात कि त्याबद्दल लिहिण्यास शब्द नाहीत म्हणून बहुदा ते आपल्या पोस्ट मध्ये फक्त छायचित्र टाकतात….त्याच वर्णन दुर्मिळ.
मी कोकणातला त्यामुळे कोकणाप्रती अपार प्रेम त्यांनी कोकणातील काढलेले फोटो घरात फ्रेम काढून लावावेसे वाटत आहेत. एका क्लिकवर संपूर्ण कोकण त्यांनी आणून ठेवलय. हा कुबेराचा (जिप्सीचा) खजिना चोरायचा खूप मोह झाला आहे. एकप्रकारची भुरळ या छायाचित्रणाने घातलीय. मी आजपर्यंत खूप फोटोग्राफर पाहिलेत पण जिप्सी आणि स्वप्नील पवार (रानवाटा) यांची फोटोग्राफी पाहिली कि स्तब्ध व्हायला होते. त्यांनी काढलेले फोटोस हे पाहतच रहावे अस वाटतं (विशेषता दुर्गदुर्गेश्वर रायगड आणि हिंदूदुर्ग राजगड).
मनाच्या गाभारयात अगदी हृदयाजवळ भविष्यात जर हार्डडिक्स लावण्याची व्यवस्था झाली तर हे फोटो मी कायम काळजाच्या कप्यात साठवून ठेवेन.
मी मायबोलीवरील त्यांच्या सर्व पोस्ट पहिल्या. इतक्या आवडल्या कि प्रत्येक पोस्ट ला उत्तर देत राहिलो तर खूप वेळ लागेल शब्दांची कोंडी होवून गुदमरतील म्हणून हा एकच लेख लिहिण्याचं कारण.
अगदी सुरवातीपासून म्हणजे त्यांची पहिली पोस्ट सरसगड (पाली) http://www.maayboli.com/node/1103 चे फोटो आणि त्यानंतर त्यांच्या आतापर्यंतच्या पोस्ट मधील प्रवास…. त्यांनी काढलेली छायचित्र आणि त्यामधील सुधारणा हि थक्क करणारी आहे. २००८ पासून सुरु झालेला त्यांचा प्रवास अजूनही २०१५ पर्यंत दिमाखात सुरु आहे आणि भविष्यात गगनभेदी यश प्राप्त करेल यात काही शंका नाही.

सह्याद्रीच वेड मला सुद्धा आहे. भविष्यात कधी जिप्सीसोबत भटकंतीचा योग आला तर मी स्वताला खूप मोठा भाग्यवान समजेन.

आमचे गृरुजी
संभाजीराव भिडे गुरुजी म्हणतात-
सह्याद्री हा शूरांच वादळ आहे ते जिवंत ठेवायचं असेल तर हा सह्याद्री ओळखायला आणि जगायला शिका. आणि जिवंत ठेवा आपल्या येणाऱ्या पिढीसाठी. कोणत्या ना कोणत्यारूपाने हे गडकोट जिवंत ठेवा तेच आपला पराक्रम आणि मराठी बाणा सांगतील.

"जिप्सी दादांचे फोटो पाहिले तर कुठेच स्वताची प्रसिद्धी नाहीय. फक्त निसर्ग पाहायला मिळतो असे फोटोग्राफर खूप दुर्मिळ आढळतील जे निसर्गावर प्रेम करतात स्वतावर नाही."

सह्याद्री खूप काही शिकवतो मग ते कोणतही क्षेत्र असुदे याच सरळ साधं उदाहरण म्हणजे जिप्सीची फोटोग्राफी.

आपलाच
गणेश पावले….

[ जिप्सी नावाच्या वादळाची माफी मागून हा लेख त्यांची परवानगी न घेता प्रकाशित करतोय]

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुर्जींनी(हो....मी जिप्सीला गुर्जी म्हणते) . तशी प्रत्यक्ष ओळख नसतानाही त्याने मला खूप काही शिकवलं. उदा. माबो वर फोटो पिकासा लिन्क वापरून कसे अपलोड करायचे.
अगदी प्रत्येक स्टेप ....त्या त्या स्टेपचा स्क्रीन शॉट घेऊन मला पाठवून वर स्वता:चा सेल नं ही दिला. अजूनही काही शंका असल्यास फोन करायला.
मी डकवलेल्या फोटोवरही त्याच्या सूचना असतात.
आय्यम अल्सो इन जिप्सी फ्यान क्लब!
आणि हो...त्याच्या फोटोग्राफीबद्दल मी काही अजून लिहायची गरज आहे?

लेख आणि सर्व प्रतिसादांचे मनापासुन धन्यवाद.
खरंतर फॅन क्लब काढण्याइतपत मी मोठा नाही. अजुनही भरपूर शिकायचय. फोटोग्राफीत अजुनही चुका आहेतच Happy भटकंतीची आवड आणि त्यामुळे फोटोग्राफिची आवड. भटकताना जे काही अनुभवतो, टिपतो तेच इथे शेअर करतो आणि ते तुम्हा सगळ्यांना ते आवडतं यातच समाधान. Happy लोभ आहेच तो असाच वृद्धींगत व्हावा. Happy

पण जिप्सी फॅनक्लबात. जिप्सी ने नवीन फोटो अपलोड केले आणि तो धागा दिसता क्षणी उघडला नाही अस कधी झालच नाही..

जिप्सी फॅन क्लब>>>>

साधना, माझा खरेतर फॅनक्लब वगैरे गोष्टींवर अजिबात विश्वास नाही. पण कधी जर जिप्सीचा फॅनक्लब निघाला तर त्याचा सदस्य हे बिरुद मी आनंदाने मिरवेन Happy

जिप्सी दा.....

धन्यवाद... तुमच्याच प्रतिक्रियेची वाट पाहत होतो.

तुमची फोटोग्राफी पाहून मन थक्क झाले.
मग स्वताला आवरू शकलो नाही...
म्हणून हा लेख लिहिला.

तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !!

माझा खरेतर फॅनक्लब वगैरे गोष्टींवर अजिबात विश्वास नाही. पण कधी जर जिप्सीचा फॅनक्लब निघाला तर त्याचा सदस्य हे बिरुद मी आनंदाने मिरवेन
>>
+१११११११११११११

जिप्सि भाउन्चि फोतोग्रफी कमाल आहे. लकवा मारलेल्याल पण अन्गात बळ मिळेल अशी जादू आहे त्याच्या भटकन्ती मधे आणि फोटोन्मधे.

मीपण जिप्सी fan क्लबमध्ये.

क्लब काढा किंवा नका काढू पण मी आहे, ऑलरेडी.

आमी बी हावोत या क्लबात. पण जिप्सीचे पाय जमिनीवर आहेत हे खरे आहे. मागे मी त्याच्या फोटोन्ची तुलना स्व. गौतम राज्याध्यक्षान्शी केलेली, पण जिप्सी ला ते आवडले नसावे बहुधा.:फिदी::डोमा::दिवा:

असो, तणाव, काळजी यातुन बाहेर पडायचे असेल तर जिप्सीचे जुने-नवीन फोटो पहावेत. मन प्रसन्न होते.:स्मित:

अर्र्र...मी मिसला होता हा धागा...बर झालं वर आला ते..
मीपन जिसी फॅन क्लबात..

जिप्सीचे बोलणे अतिशय आर्जवी आहे. मराठी गाण्यांचा फार मोठ्ठा खजिना त्याच्याजवळ आहे. तसेच फोटोंसोबत ज्या सुंदर ओळी तो लिहित असतो त्यावरुन त्याचे वाचनही प्रचंड आहे हे जाणवते...>> कालपरवाच यावर डिस्कशन झाले होते माझे अन शांकलीचे..त्याचे कॅप्शन भारी असतात..
फोटो व्यतिरिक्तपन अजुन बर्‍याच कला आहे बर त्याच्यात.. Wink
असेच फोटो काढत राहा आणि न चुकता शेअर करत राहा..आणि बरोबर माझ्यासरख्या पामरांना गाईड करत राहा..जय हो..

गणेश पावले, तुम्ही हा लेख लिहुन एक नबंर काम केले आहे. कल्पना आणि लिखाण दोन्ही आवडले.
फोटो सुंदर म्हणजे किती तर जिप्सीच्या फोटोंएवढे असं एक समीकरणचं मनात तयार झालं आहे यातच सगळं आलं
१००%खरय!!!!

Pages