जिप्सी (उर्फ- योगेश जगताप)
http://www.maayboli.com/user/2170
जिप्सी नावाची एक आगळी वेगळी दुनिया जी निसर्गसौंदर्याने नटलीय…. कृष्णाची द्वारका पाहिली नाही पण जीप्सीची दुनिया पाहण्याचा योग रोज रोज येतो.
मायबोलीवर फिरता फिरता मी या जिप्सी नावाच्या वलयात प्रवेश केला आणि कुबेराचा खजिनाही फिका पडेल असा खजिना पाहायला मिळाला….
अहो…. " पडेल काय….?
ऑलरेडी पडलाय….!!
सह्याद्रीच वेड कुणाला नसतं?…
या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला येणारया प्रत्येक प्राण्याला असतं….
मग हा जिप्सी नावाचा अवलिया यातून कसा चुकेल….
सह्याद्रीच वेड लागलेला हा जिप्सी…. अथांग (सागरापासून) ते उतुंग (पर्वतापर्यंत) व्यक्तिमत्व जणू एक "सह्यवेडा".
फोटोग्राफी हा श्वास… आणि ध्यास बनलेला हा सह्यवेडा एकदा सह्याद्रीत (निसर्ग सानिध्यात ) शिरला कि, सह्याद्री त्याला आपलं खर रूप दाखवतो. जे रूप तो सहजा सहजी कुणाला दाखवत नाही.
त्यांनी काढलेली इतकी अप्रतिम छायाचित्र… इतकी बोलकी वाटतात कि त्याबद्दल लिहिण्यास शब्द नाहीत म्हणून बहुदा ते आपल्या पोस्ट मध्ये फक्त छायचित्र टाकतात….त्याच वर्णन दुर्मिळ.
मी कोकणातला त्यामुळे कोकणाप्रती अपार प्रेम त्यांनी कोकणातील काढलेले फोटो घरात फ्रेम काढून लावावेसे वाटत आहेत. एका क्लिकवर संपूर्ण कोकण त्यांनी आणून ठेवलय. हा कुबेराचा (जिप्सीचा) खजिना चोरायचा खूप मोह झाला आहे. एकप्रकारची भुरळ या छायाचित्रणाने घातलीय. मी आजपर्यंत खूप फोटोग्राफर पाहिलेत पण जिप्सी आणि स्वप्नील पवार (रानवाटा) यांची फोटोग्राफी पाहिली कि स्तब्ध व्हायला होते. त्यांनी काढलेले फोटोस हे पाहतच रहावे अस वाटतं (विशेषता दुर्गदुर्गेश्वर रायगड आणि हिंदूदुर्ग राजगड).
मनाच्या गाभारयात अगदी हृदयाजवळ भविष्यात जर हार्डडिक्स लावण्याची व्यवस्था झाली तर हे फोटो मी कायम काळजाच्या कप्यात साठवून ठेवेन.
मी मायबोलीवरील त्यांच्या सर्व पोस्ट पहिल्या. इतक्या आवडल्या कि प्रत्येक पोस्ट ला उत्तर देत राहिलो तर खूप वेळ लागेल शब्दांची कोंडी होवून गुदमरतील म्हणून हा एकच लेख लिहिण्याचं कारण.
अगदी सुरवातीपासून म्हणजे त्यांची पहिली पोस्ट सरसगड (पाली) http://www.maayboli.com/node/1103 चे फोटो आणि त्यानंतर त्यांच्या आतापर्यंतच्या पोस्ट मधील प्रवास…. त्यांनी काढलेली छायचित्र आणि त्यामधील सुधारणा हि थक्क करणारी आहे. २००८ पासून सुरु झालेला त्यांचा प्रवास अजूनही २०१५ पर्यंत दिमाखात सुरु आहे आणि भविष्यात गगनभेदी यश प्राप्त करेल यात काही शंका नाही.
सह्याद्रीच वेड मला सुद्धा आहे. भविष्यात कधी जिप्सीसोबत भटकंतीचा योग आला तर मी स्वताला खूप मोठा भाग्यवान समजेन.
आमचे गृरुजी
संभाजीराव भिडे गुरुजी म्हणतात-
सह्याद्री हा शूरांच वादळ आहे ते जिवंत ठेवायचं असेल तर हा सह्याद्री ओळखायला आणि जगायला शिका. आणि जिवंत ठेवा आपल्या येणाऱ्या पिढीसाठी. कोणत्या ना कोणत्यारूपाने हे गडकोट जिवंत ठेवा तेच आपला पराक्रम आणि मराठी बाणा सांगतील.
"जिप्सी दादांचे फोटो पाहिले तर कुठेच स्वताची प्रसिद्धी नाहीय. फक्त निसर्ग पाहायला मिळतो असे फोटोग्राफर खूप दुर्मिळ आढळतील जे निसर्गावर प्रेम करतात स्वतावर नाही."
सह्याद्री खूप काही शिकवतो मग ते कोणतही क्षेत्र असुदे याच सरळ साधं उदाहरण म्हणजे जिप्सीची फोटोग्राफी.
आपलाच
गणेश पावले….
[ जिप्सी नावाच्या वादळाची माफी मागून हा लेख त्यांची परवानगी न घेता प्रकाशित करतोय]
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय वरच्या लेखात
छान लिहिलंय
वरच्या लेखात माझी एक अॅडिशन -
त्याच्या फोटोज इतकाच जिप्सी स्वतः सुद्धा मनाने स्वच्छ स्पष्ट आणि नितळ आहे
जियो जिप्सी!
मस्त .. जिप्सी
मस्त ..
जिप्सी ___________________^___________
त्याच्या फोटोज इतकाच जिप्सी
त्याच्या फोटोज इतकाच जिप्सी स्वतः सुद्धा मनाने स्वच्छ स्पष्ट आणि नितळ आहे
जियो जिप्सी! >>> + १
अगदी १००% खर आहे.
फोटो इतका.. त्याहून कांकणभर
फोटो इतका.. त्याहून कांकणभर जास्तच !
फोटो इतका.. त्याहून कांकणभर
फोटो इतका.. त्याहून कांकणभर जास्तच !
>>
अॅग्री!
हो रीया, काढायच्याच म्हंटल्या
हो रीया, काढायच्याच म्हंटल्या तर मी त्याच्या फोटोत चुका काढू शकेन.. पण त्याच्यात नाही.
जिप्सीच्या फोटोंची करावी
जिप्सीच्या फोटोंची करावी तितकी तारीफ कमीच असते नेहमी,
अन तो तर इतका चांगला आहे की दा
तुम्ही म्हणता त्याप्रमाणे त्याच्या सारख्यांच्या ब्रीडची वाढ होणे गरजेचे आहे.
रीया,दिनेश्,उजू +१०००० हे
रीया,दिनेश्,उजू +१०००० हे अगदी खरंय!!!
माझ्याकडे शब्द असूनही शब्द
माझ्याकडे शब्द असूनही शब्द नाहीत
जिप्सीच्या फोटोग्राफीच वर्णन करायला…
कृष्णान यशोदेला ब्रम्हांड दाखवलं
अन
जिप्सी आम्हाला तेच दाखवतोय…।
आपल्या अप्रतिम क्लिकमधून
मस्त रे. बर झालस हा लेख
मस्त रे. बर झालस हा लेख लिहिलास.
फोटो इतका.. त्याहून कांकणभर जास्तच ! >> हे अगदी पट्ल त्याची माझी प्रत्यक्ष भेट झालेली नसून सूध्दा.
जीप्सी , फोटुग्राफितल प्रेरणा
जीप्सी , फोटुग्राफितल प्रेरणा स्थाने आमचं ....
@ कंसराज दा…। माझी आणि
@ कंसराज दा…।
माझी आणि जिप्सी ची कधीच भेट झाली नाही.
आम्ही साध कधी संभाषण हि केलं नाही.
सह्यादी हीच ओळख
अन कलेला दाद हि दिलीच पाहिजे…। त्यासाठीच हा लेख लिहिला
जीप्सी , फोटुग्राफितल प्रेरणा
जीप्सी , फोटुग्राफितल प्रेरणा स्थाने आमचं .... >>> +१०१
जिप्सीला व त्याच्या
जिप्सीला व त्याच्या फोटोग्राफीला दिलेली एक छान,मनमोकळी दाद!
गणेश पावले, तुम्ही हा लेख
गणेश पावले, तुम्ही हा लेख लिहुन एक नबंर काम केले आहे. कल्पना आणि लिखाण दोन्ही आवडले.
फोटो सुंदर म्हणजे किती तर जिप्सीच्या फोटोंएवढे असं एक समीकरणचं मनात तयार झालं आहे यातच सगळं आलं
अगदी अगदी .. त्याचा धागा
अगदी अगदी .. त्याचा धागा उघडायच्या आधीच डोऴ्यासमोर रंगीत कॅलेंडर दिसायला सुरुवात होते.. माणूस म्हणून वैयक्तिक ओळख नाही, पण एखादा राणीबाग निसर्ग गटग कधीतरी जमेलच..
आणि असा जिप्स्या आमचा जिगरी
आणि असा जिप्स्या आमचा जिगरी दोस्त आहे ....
आणि असा जिप्स्या आमचा जिगरी
आणि असा जिप्स्या आमचा जिगरी दोस्त आहे ++१.... स्मित
जीप्सी , फोटुग्राफितल प्रेरणा
जीप्सी , फोटुग्राफितल प्रेरणा स्थाने आमचं .... >>> +१०१ >>> +१
त्याच्या फोटोज इतकाच जिप्सी
त्याच्या फोटोज इतकाच जिप्सी स्वतः सुद्धा मनाने स्वच्छ स्पष्ट आणि नितळ आहे >>> अग्दी अग्दी ....
आणि असा जिप्स्या आमचा जिगरी दोस्त आहे ... >>> +१००
जिप्सीचे बोलणे अतिशय आर्जवी आहे. मराठी गाण्यांचा फार मोठ्ठा खजिना त्याच्याजवळ आहे. तसेच फोटोंसोबत ज्या सुंदर ओळी तो लिहित असतो त्यावरुन त्याचे वाचनही प्रचंड आहे हे जाणवते...
जिप्सी दि ग्रेट ....
जिप्सीला व त्याच्या
जिप्सीला व त्याच्या फोटोग्राफीला दिलेली एक छान,मनमोकळी दाद!>>>>>>> +१००
फोटो सुंदर म्हणजे किती तर
फोटो सुंदर म्हणजे किती तर जिप्सीच्या फोटोंएवढे असं एक समीकरणचं मनात तयार झालं आहे यातच सगळं आलं +११११११११११
मी जिप्सीच्या धाग्यावर एखाद दुसरा प्रतिसाद दिला असेल पण त्यांनी काढलेले फोटो आवर्जुन बघते. डोळ्यांची पारणे फेडणारी अशी असते त्यांची फोटोग्राफी.
जिप्सी, तुम्हाला कधी नाही सांगितले पण इथे सांगते खरच तुम्ही खुप मोठे कलाकार आहात आणि तुमची कला बघायला आम्हाला फार आवडते त्यामुळे नेहमीच इथे तुमच्या कलेचे दर्शन घडवत जा हि विनंती. तुमची उत्तरोत्तर प्रगतीच व्हावी हि सदिच्छा!
त्याच्या फोटोज इतकाच जिप्सी स्वतः सुद्धा मनाने स्वच्छ स्पष्ट आणि नितळ आहे >>> आणि म्हणुनच त्यांच्या नितळ मनाचं प्रतिबिंब त्यांच्या फोटोत उतरते.
त्याच्या फोटोज इतकाच जिप्सी
त्याच्या फोटोज इतकाच जिप्सी स्वतः सुद्धा मनाने स्वच्छ स्पष्ट आणि नितळ आहे >>> आणि म्हणुनच त्यांच्या नितळ मनाचं प्रतिबिंब त्यांच्या फोटोत उतरते. १००००००
जिप्सी फॅन क्लब.
जिप्सी फॅन क्लब.
गणेश लेख मनापासून पटला. मी पण
गणेश लेख मनापासून पटला.
मी पण जिप्सी फॅन क्लबात
सर्वांचे खूप खूप आभार…. खूपच
सर्वांचे खूप खूप आभार….
खूपच छान प्रतिक्रिया आल्या आहेत…
या प्रतिक्रिया वाचून
पुढील वाटचालीसाठी जिप्सी दादांना आणखीन बळ नक्कीच येईल….
मनपूर्वक आभार __/\__
उडुन उडुन किती उडणार... केल
उडुन उडुन किती उडणार... केल की नाही कैद..
अप्रतिम
अप्रतिम
छान लेख! जिप्सींनी काढलेले
छान लेख!
जिप्सींनी काढलेले फोटो नेहमीच अतिशय आवडतात.
मी सुद्धा जिप्सी फॅन क्लब मध्ये...
Pages