वैश्विक खाज नाही

Submitted by अभय आर्वीकर on 19 April, 2015 - 03:37

वैश्विक खाज नाही

शृंगारल्या मनाला, वैश्विक खाज नाही
भोगत्व सोडले तर, कसलाच माज नाही

निष्णात सैन्य माझे; पण हारणार नक्की
मोफत लढ़ावयाचा, यांना रिवाज नाही

त्यांच्या कपटनितीला, चिरडून टाकतो मी
धर्मास जागणारा, मी धर्मराज नाही

खाणार काय घंटा? सोने पितळ कि तांबे?
शेतीमधे उद्या जर पिकले अनाज नाही

गावे बकाल आणिक, शहरे सुजून आली
आम्हांस मात्र त्याची, अजिबात लाज नाही

शालेय पुस्तकांनी, मेंदू बधीर केला
बुद्धी भ्रमिष्टतेवर, उरला इलाज नाही

स्वातंत्र्य देवते तू, ये भारतात थोड़ी
जेथे 'अभय' कुणाला, कुठलेच आज़ नाही

- गंगाधर मुटे ’अभय’
=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खाणार काय घंटा? सोने पितळ कि तांबे?
शेतीमधे उद्या जर पिकले अनाज नाही>> +११११
आणखी काही वर्षांनी काय होणार आहे कुणास ठावूक . लोकांकडे पैसे , सोनं , चांदी असेल पण शेती करून धान्य पिकावणारच कुणी नसेल तर
खाणार काय ?