Submitted by प्रकु on 18 April, 2015 - 01:54
एक प्राजक्ताच झाड....
शेजारी अजून एक प्राजक्ताच झाड....
आजूबाजूला वस्ती, बाकी ओसाड....
प्राजक्त बेदरकार, खोडकर....
प्राजक्ता बावरलेली, ‘कस हे अस वेडपट झाड, खोडकर नुस्त....’
गमतीजमतीला चढली गुलाबी किनार....
प्राजक्त प्रेमात वेडा झाला पार....
तो एकटक पाहत राही, बावरलेल्या प्राजक्ताला कळेनाच काही....
हळूहळू तिलापण, ‘तसं’ वाटू लागलं....
नजर भिडताच फुल तिचं गुलाबी होऊ लागलं....
बेदरकार झाडाचा कोण तो आनंद....
बावरलेल्या प्राजक्ताचा चोरून पाहण्याचा छंद....
प्रेम मग जगजाहीर झालं, दोघांच मन स्पर्शासाठी आसुसलं....
‘वाढत वाढत जाऊन एकमेकात मिसळू’, ठरलं. रोज नजरानजर, प्रतीक्षा....
अचानकच...... प्रतीक्षा संपली! प्राजक्त प्राजक्ताच्या गंधात न्हाऊन निघाला....
कोण हा उपकारकर्ता, त्याने मागे वळून पाहिलं....
अरे! माणूस... म्हणजे मुळापासून काढलं...
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काही कळलं नाही. सॉरी.
काही कळलं नाही. सॉरी.
(No subject)
गूढ कविता वाटली मला. कल्पना
गूढ कविता वाटली मला. कल्पना आवडली.
धन्यवाद अतिवास
धन्यवाद अतिवास
वा मस्त! बाकी प्रतिसादात अशी
वा मस्त!
बाकी प्रतिसादात अशी अर्थाची वगैरे पोस्ट टाकू नका आणि, लोकांना काढू द्या एकेक व्यापक अर्थ ..
असे म्हणता काय, हम्म. बरोबर
असे म्हणता काय, हम्म. बरोबर आहे तुमचं .. एडीटतो ती पोष्ट ..
धन्यवाद ऋन्मेष ..