१. पेपर डोसा / साधा डोसा
डोसा राईस / कोणताही जाड तांदूळ - ४ वाटी
उडीद डाळ - १/२ वाटी
पोहे - १/२ वाटी
मेथी दाणे - १ टी स्पून
प्रत्येक डोश्याच्या जिन्नसमध्ये जो तांदूळ दिला आहे तोच वापरून वेगवेगळ्या चवीचे डोसे चाखा. प्रत्येक प्रकारच्या डोश्याची एक वेगळी चव आहे.
मसाला डोसा ची बटाट्याची भाजी
फोडणीत उभा चिरलेला कांदा, राई, चणाडाळ, उडिद डाळ. हि. मि. कढीपत्ता, घालून डाळींचा रंग लालसर झाला की त्यात थोडी हळद घालायची त्यात २ टे. स्पून पाणी घालून थोड उकळू देऊन मग त्यात उकडलेल्या बटाट्याच्या फोडी, चवीनुसार मीठ घाला आणि ढवळून घ्या. पाणी आटत आल की त्यात ओल खोबर आणि कोथिंबीर घाला.
२. सेट डोसा / स्पंज डोसा / आंबोळ्या / पोळ्ये
डोसा राईस - २ वाटी
उकडा तांदूळ (लाल, पिवळा किंवा ईडली राईस) - २ वाटी
उडीद डाळ - १/२ वाटी
पोहे - १/२ वाटी
मेथी दाणे - १ टी स्पून
३. दावणगिरी डोसा
उकडा तांदूळ (लाल, पिवळा किंवा ईडली राईस) - ४ वाटी
उडीद डाळ - १/२ वाटी
पोहे - १/२ वाटी
साबुदाणा - १/२ वाटी
चणा डाळ - १/४ वाटी
मेथी दाणे - १ टी स्पून
४ - थंडीतील सेट डोसा हा थोडा कडवड लागतो.
डोसा राईस - २ वाटी
उकडा तांदूळ (लाल, पिवळा किंवा ईडली राईस) - २ वाटी
उडीद डाळ - १/२ वाटी
पोहे - १/२ वाटी
मेथी दाणे - १/४ वाटी
हळद - २ टी. स्पून
५ - सेट डोसा (अजून एक प्रकार)
डोसा राईस - २ वाटी
उकडा तांदूळ (लाल, पिवळा किंवा ईडली राईस) - २ वाटी
उडीद डाळ - १/२ वाटी
पोहे - १/२ वाटी
मेथी दाणे - १ टि. स्पून
चणा डाळ / चटणी डाळ - १/४ वाटी
मुगाची डाळ - १/४ वाटी
६ - नाचणी डोसा
नाचणीच पीठ - ४ वाटी
उडदाची डाळ - १/४ वाटी
मेथी - १/४ टी स्पून
पोहे - १/२ वाटी
७- नीर डोसा,
जूना कोणताही तांदूळ - ४ वाटी ( नविन तांदूळाचा थोडा सांभाळून करावा लागतो पण चविष्ट होतात म्हणून ही टीप.
ओल खोबर - २ टे. स्पून
साखर - १ टी. स्पून
मीठ - चवीनुसार
८. मूग डोसा (पेसाराट्टू)
मूग - २ वाटी
बेडगी मिरची - ४-५
काळी मिरी - ७-८
आल - १/२ इंच
मीठ - चवीनुसार
१. सकाळी तांदूळ व मेथी एकत्र भिजत घाला. उडिद डाळ वेगळी भिजत घाला. साबुदाणे थोडे जास्त पाणी घालून भिजत घाला. संध्याकाळी वाटायच्या १५ मि.अगोदर पोहे भिजत घाला. चण्याची डाळ/ चटणी डाळ/ मूगाची डाळ ही तांदूळाबरोबर भिजत घाला.
२. ग्राइंडर किंवा मिक्सरमध्ये तांदूळ + मेथी दाणे + पोहे + चण्याची डाळ/ चटणी डाळ/ मूगाची डाळ / साबुदाणे एकत्र बारीक वाटून घ्या. उडदाची डाळ कमीत कमी पाणी घालून बारीक वाटून घ्या.
३. एका डब्यात मिश्रण ओतून घ्या. त्यात चवीपुरते मीठ घाला. चमच्याने मिश्रण एकाच दिशेने फेटा. १ टे. स्पून कच्चे तेल मिश्रणावर चमच्याने घाला आणि डब्याला झाकण लावून ठेवा.
४. सकाळी मिश्रण फुगून वर येईल. चमच्याने एकाच दिशेने ढवळून घ्या.
५. बीडाचा तवा तेल लावून गरम करून घ्या. चमच्याने मिश्रण तव्यावर घालून डोसे काढा.
नाचणीच्या डोश्यासाठी
सकाळी उडीद डाळ आणि मेथी वेगवेगळ भिजत घाला. संध्याकाळी दोन्ही एकत्र बारीक वाटून घ्या.
त्यात नाचणीच पीठ, चवीपुरत मीठ, थोड पाणी घालन एकाच दिशेने ढवळून पीठ आंबवायला ठेवा.
सकाळी पेपर डोसे काढा. ह्याचे सेट डोसे मला नाही आवडत. हा डोसा गरम खायला जास्त चांगला लागतो.
नीर डोसा
रात्री तांदूळ भिजत घाला. सकाळी तांदूळ, ओल खोबर, साखर घालून मिक्सरवर वाटून घ्या. एका भांड्यात हे मिश्रण काढून घ्या आणि त्यात चवीप्रमाणे मीठ आणि पाणी घाला. हे मिश्रण पातळ हव.
बिडाच्या तव्याला तेल लावून तापवून घ्या. गॅसची फ्लेम मोठीच ठेवा. मिश्रण तव्यावर ओता आणि लगेच फ्लेम स्लो करा. मंदाग्नीवर हा डोसा करतात. हव तर दुसर्या बाजूने एक सेंकंद भाजा. हे डोसे जाळीदार आणि पांढरे शुभ्र होतात. प्रत्येक वेळी डोसा घालताना फ्लेम मोठी हवी. घालून झाल्यावर फ्लेम स्लो करा.
मूग डाळ डोसा
मूगाची डाळ रात्री भिजत घाला. सकाळी डाळ, बेडगी मिरची, काळी मिरी, आल घालून वाटून घ्या. चवीनुसार मीठ घालून लगेच डोसे करा.
डोश्याच्या पीठाचे अजून काही प्रकार
पेपर डोशाच पीठ तव्यावर पसरवल की लगेच त्यावर थोड जिर आणी उभा बारीक चिरलेला कांदा स्प्रिकंल करा. थोड तेल घालून जिर आणि कांदा दाबून घ्या. डोसा फोल्ड करून खायला घ्या. उन्हाळ्यात हा डोसा बनवला जातो. क्रिस्पी जिर कांद्याचा डोसा यम्मी लागतो. नुसता किंवा चटणीबरोबर.
सेट डोशाच पीठ तव्यावर पसरवून त्यावर कच्च अंड फोडून घालून त्यावर मीठ , काळीमिरी पूड, कोथिंबीर, हि. मि. बारीक कापून स्प्रिकंल करतात आणि दोन्ही बाजूने खरपूस भाजतात.
१. डोसा राईस आणि ईडली राईस मॉलमध्ये सहज उपलब्ध आहेत. केरला स्टोअर्समध्ये फक्त ईडली राईस मिळतो.
२. पीठात कच्चे तेल घातल्यावर पुन्हा ढवळू नये.
३. पीठ आंबल्यावर त्यात पाणी घालू नये त्याने डोसे नीट होत नाहीत. जी काही कंन्सिस्टंसी पीठाची करायची असेल ती डाळ तांदूळ वाटल्यावर लगेच करावी.
मूगाचा डोसा उपवासाला चालतो. रोजच्यासाठी बनवायचा असेल तर डोसा तव्यावर पसरवल्यावर त्यावर कांदा बारीक चिरून स्प्रिंकल करा.
क्रिस्पी पेपर डोश्यासाठी टिप्स
तवा व्यवस्थित तापवून घ्या. गॅस मिडीयम फेल्मवर ठेवा. रुमाल मीठाच्या पाण्यात किंवा साध्या पाण्यात बुडवून तापलेला तव्यावर ओला रूमालने पुसून घ्या. त्यावर चमच्याने मधोमध पीठ घालून संपूर्ण तव्यावर पसरवा. एक टिस्पून तेल / बटर / घी डोश्याच्या वरच्या बाजूला सगळीकडे लागेल अस शिंपडा आणि पसरवून घ्या
सेट डोसा, दावणगिरी डोसा बनवताना प्रत्येक वेळेस तव्याला तेल /बटर/ तूप लावून मग त्यावर पीठ घालून तुम्हाला हव्या त्या जाडीचा डोसा पसरवा.
सेट / दावणगिरी डोसे प्रवासासाठी उपयुक्त. २-३ दिवस सहज टिकतात. सॉफ्टही राहतात.
प्रवासासाठि नेताना हे डोसे थंड करून डब्यात भरायचे. त्याला अजिबात वाफ सुटायला नको तसेच पाण्याचा हात लावू नका.
चव खूप छान आली होती . पण पीठ
चव खूप छान आली होती .
पण पीठ पसरवताना एका ठिकाणी पटकन गोळा होत होता म्हणजे मी तवा पूर्ण तापवून घेते फ्लेम बारीक करते. मध्यभागी पीठ टाकून सगळीकडे पसरवते . अस करताना कधी कधी पीठ सगळीकडे evenly पसरत नव्हते .
मेथ्या जास्त झाल्या असतील का ? म्हणजे त्यामुळे पिठाचा चिकटपणा वाढला असेल .
शनिवारी रात्री स्पंज डोसे
शनिवारी रात्री स्पंज डोसे केले होते. घरी असलेलाच कोलम तांदूळ वापरला. एकदम मस्त डोसे झाले. तव्यावरून पटकन सुटतही होते. तवा चांगला तापल्यावर गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवून नंतर तिला हात न लावता डोसे घालणे एवढं पथ्य पाळायला लागतं. पीठ मस्त आपोआप गोलाकार पसरत होतं. छान जाळीही पडत होती.
उकडा तांदूळ वापरला तर डोसे अजून मऊ लुसलुशीत होतील.
दावणगिरी डोसा जमला. "साध्या
दावणगिरी डोसा जमला.
"साध्या डोश्यापेक्षा चव काही वेगळी नाही, फक्त सॉफ्ट आहेत" - इति घरचं पब्लिक.
अजून हॉटेलातला दा.डो. आम्ही कुणीच खाल्लेला नाहीये. त्यामुळे चालून गेला असावा
नीर डोसा ६०-७० टक्के जमला असं म्हणावं लागेल. चव परफेक्ट झाली, पण नॉनस्टिक तव्याचं तापमान आणि पिठातल्या पाण्याचं प्रमाण - यावर अजून जरा ट्रायल अँड एरर करावी लागणार आहे. शेवटचा डोसा मी जरा पाणी वाढवून पीठ पातळ फुळकवणी करूनच घातला, तर तोच सर्वात छान झाला असं सर्वांचं म्हणणं पडलं
लले, नीर डोसे फुळकवणी पिठाचेच
लले, नीर डोसे फुळकवणी पिठाचेच करायचे असतात. आई तांदुळाचे आयते करायची ते पण असेच पळीवाढ्या पिठाचे करायची.
दावणगिरी मी ४-५ वर्षांपुर्वी ठाण्यातील सुप्रसिद्ध साईकृपामध्ये खाल्ला होता. माझीही तुझ्या घरातल्या पब्लिकसारखीच रिअॅक्शन होती.
मृणाल१, मंजूडी, ल-प्री
मृणाल१, मंजूडी, ल-प्री धन्यवाद ट्राय करून ईथे लिहिल्याबद्दल.
लले, तलावपाळीवर बोटींगच्या
लले, तलावपाळीवर बोटींगच्या प्रवेशद्वारावर संध्याकाळी दावणगिरी दोशाची गाडी लागते. भारी असतो त्याच्याकडचा दोसा. पावसाळ्यात असते की नाही ते बघावे लागेल.
Dosa rice n ukada tandul
Dosa rice n ukada tandul ekach ki vegvegle? Ani pohe jad ki barik ghyayche?
रोचीन, डोसा राईस म्हणजे
रोचीन, डोसा राईस म्हणजे कोणताही तांदूळ (रॉ राईस) तुम्ही वापरु शकता. उकडा तांदूळ (बॉइल्ड राईस) दोन्ही वेगळे आहेत. पोहे जाड किंवा पातळ, लाल पोहे सुद्धा चालतील.
सेट डोसा / स्पंज डोसा मी करुन
सेट डोसा / स्पंज डोसा मी करुन बघितला. छान झाला होता. धन्यवाद आरती.
आमच्याकडे एकजण आंबोळ्या विकतात त्यांची चव व या डोश्याची चव सारखीच वाटली. मी पोहे टाकायला विसरते पण. काही फरक पडतो का त्याने?
आज नाश्त्याला स्पाँज डोसा
आज नाश्त्याला स्पाँज डोसा केला होता. अप्रतिम झाला होता. घरात उकडा तांदूळ होता तोच वापरला.
उपयुक्त धागा, धन्यवाद,
उपयुक्त धागा, धन्यवाद,
घरात नाचणीच्या पिठाऐवजी
घरात नाचणीच्या पिठाऐवजी भाकरीचे ज्वारी, बाजरी, नाचणी आणि अजून एकदोन धान्ये असे पीठ आहे. तसेच मिक्स घावणाचे पीठही आहे.
नाचणी डोश्याच्या कृतीमधे नाचणीच्या पिठाऐवजी यातले एखादे पीठ वापरल्यास कसे काय? बरे लागेल का? आणि डोसे होतील का?
नी, ते नाचणीचे 'डोसे' असले
नी, ते नाचणीचे 'डोसे' असले तरी ते 'डोसे' होत नाहीत, आंबोळ्या, घावन, धिरडं सदृश एक पदार्थ तयार होतो. ह्यात नाचणीऐवजी ज्वारी/ बाजरी/ घावन पीठ घातलंस तरी ते तसंच होईल.
मंजू, मी एरवीही डोसे म्हणून
मंजू, मी एरवीही डोसे म्हणून जे करते तेही अजून घावन ते धिरडं यातलंच होतं त्यामुळे...
पण ते तितपत तरी होईल ना?
नीरजा, कुठल्याही पिठाचं धिरडं
नीरजा, कुठल्याही पिठाचं धिरडं होतंच. बिन्धास्त कर. तू तिखट मिठ कसं घालतेस, इतपत तव्यावर ठेवतेस, कितपत जाड घालतेस त्यावर ते कसं लागेल ते ठरेल. पहिलं धिरडं बरोबर नाही वाटलं तर पिठात योग्य ती वस्तू घालून घेणे हे तू नेहमी करत असशीलच.
अगं धिरडी नाही गं मी आंबवून
अगं धिरडी नाही गं मी आंबवून करायच्या पिठाबद्दल विचारत होते.
धिरडी काय अर्धा तास भिजवूनही मस्त होतात.
असो डब्यात द्यायला नाचणी डोसा ठिक लागणार नाही त्यामुळे साधेच भिजवलेय.
पण धिरड्याची आठवण फारच झालीये त्यामुळे आता लवकरच मस्त आलं, लसूण, मिरची घालून धिरडी करावीच लागणार.
हेहे.... होईल होईल. आपण एक
हेहे.... होईल होईल.
आपण एक डोसा गटग करूया.. मी नुकताच एक निर्लेपचा अंडाकृती आकाराचा नॉन स्टिक तवा घेतला आहे. (तो नवा असल्याने) त्यावर फारच सुंदर डोसे होत आहेत.
मी हल्ली धिरडी, आंबोळ्या नामक
मी हल्ली धिरडी, आंबोळ्या नामक मराठी डोसेही नॉनस्टिकवर करते एक थेंबही तेल न घालता.
चालेल. मी येईन ठाण्याला!
चालेल. मी येईन ठाण्याला!
मैं साधेवाले डोसे करने मे
मैं साधेवाले डोसे करने मे एक्ष्पर्ट हूं! आओ यहां.. डोसा गटग करेंगे. और उत्तप्पा भी करके खाएंगे!
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/23504
अगदी मस्त डोश्यासारखा डोसा होतो..धिरडे नाही होत.
हे मी केलेले सेट डोसे.. मस्त
हे मी केलेले सेट डोसे.. मस्त फ्लपी झालेत..पिठ अजिबात फर्मेंट केलं नाही .. फक्त २ तास ठेव्लं होतं अर्धा चमचा तेल टाकुन!
चनस, ग्रेट दोन तास ठेवून मस्त
चनस, ग्रेट दोन तास ठेवून मस्त जाळी पडली आहे. तुझ्याकडे ग्राइंडर आहे का? कि मिक्सरवर ग्राइंड केल.
मिक्सरवर ग्राइंड केल
मिक्सरवर ग्राइंड केल
चनस गंsssssssssssssss! मला पण
चनस गंsssssssssssssss! मला पण हवेत आता ते डोसे
कसलेच यम्मी दिसतायेत
रीया, चनसच्या घरी पळ लवकर.
रीया, चनसच्या घरी पळ लवकर. चनस, सुगरण आहे.
ए मी पण मी पण येणार चनसकडे
ए मी पण मी पण येणार चनसकडे डोसे खायला...
नको गं ती बिचारी
नको गं ती बिचारी गणेशोत्सवाच्या तयारीत बिझी आहे.
मीच जाऊन एक दोन डोसे करून देईन तिला
रीया .. इतकी पण नाही ..
रीया .. इतकी पण नाही .. तुझ्यासाठी कायपण.. :फिदी:.. घरी ये फक्त आधी फोन करुन म्हणजे पीठ तयार ठेवेन मी
Yatil "Sadha Dosa" kuthla?
Yatil "Sadha Dosa" kuthla? Jyachya ghadit masala na ghalta sambar & chutney sobat khatat? Yat nasel tar plz recipe dyal ka tyachi?
Pages