Submitted by प्रकु on 2 April, 2015 - 13:45
काढून टाकले
काढून टाकले
काढून टाकले
काढून टाकले
काढून टाकले
काढून टाकले
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काढून टाकले
काढून टाकले
काढून टाकले
काढून टाकले
काढून टाकले
काढून टाकले
या लेखाद्वारे कुणाच्या भावना
या लेखाद्वारे कुणाच्या भावना दुखावण्याचा अथवा कुणावर टीका वगेरे करण्याचा हेतू नाही.
जे वाटलं ते लिहिलं. इतकच.
मग आता सगळा पगार अन्नदानावर
मग आता सगळा पगार अन्नदानावर खर्च का
नक्कीच करेन !
नक्कीच करेन !
सधन लोकांना प्रसाद
सधन लोकांना प्रसाद देण्यापेक्षा, भारतासारख्या देशात अन्नदान करण्याने जास्त पुण्य मिळेल कदाचित. >>>
प्रसाद सगळ्यांसाठी असतो . सधन लोकांसोबत गरिबांना सुधा प्रसाद दिला जातोच कि . अन्नदान करण हे अतिशय पुण्याचं काम आहे . पण भारतासारख्या देशात काहीही कामधंदा न करता नुसतं फुकट चं खाणारे काही कमी आहेत का ? मला तरी वाटतं म्हातारे , अपंग ज्यांना शारीरिक कष्ट
झेपणार नाहीत अश्यांना दान करावं . प्रसाद थोडाच दिला जातो . तो सगळ्यांनी घ्यावा . अन्नदानाच्या पंगतीत मात्र सधनांनी स्वताहून जाण टाळावं
सारिका +१०००००
सारिका +१०००००
सारिका १००% सहमत
सारिका १००% सहमत
@ सारिका , अगदी बरोबर . सर्व
@ सारिका , अगदी बरोबर . सर्व मते मान्य .
मंदिरांनी प्रसाद वाटू नये त्याएवजी अन्नदान करावे असे काही माझे मत नाही.
परंतु त्या केळी वाटणाऱ्या काकांनी नक्कीच अन्नदान केलेलं चांगल अस मला वाटत.
हा लेख मी मंदिरातून आल्या आल्या एका बैठकीत लिहिला. त्यावेळीचे मनातले विचार फक्त उमटलेत इतकच. त्यामुळे काही त्रुटी असतील कदाचित. असो..
प्रतीक्रीयांसाठी धन्यवाद ..!
बाय द वे, >>>>>. पण
बाय द वे,
>>>>>. पण भारतासारख्या देशात काहीही कामधंदा न करता नुसतं फुकट चं खाणारे काही कमी आहेत का ? <<<<
हा प्रश्न इतका सरळ नाही बरका . त्यात अनेक गोष्टी आहेत. जसे कि शरीराने धडधाकट दिसणारे असे काही लोक मनोरुग्ण असतात.
दुसर म्हणजे काही मुलांनी लहान पणापासून असच जीवन पाहिलेलं असत. आयुष्य अजून चांगल्या प्रकारे जगता येत हेच त्यांना ठाऊक नसत. त्यांच तारुण्य नकळत व्यसनाच्या जाळ्यात अडकत. ड्रग्ज वगेरेच्या धंद्यात हे मुल वापरले जातात. त्यातून आलेला पैसा ड्रग्ज मधेच जातो. वयाच्या चाळीशी पर्येंत यांचा मेंदू पूर्ण निकामी झालेला असतो. त्या वेळी ते 'शरीराने धडधाकट पण काम न करणारे' दिसू लागतात.
अशा अनेक धक्कादायक गोष्टी आहेत. आपल्याला कल्पनापण करवत नाही.
आता अशा लोकांना नुसते 'आळशी' म्हणून दोष कसा देणार. नाही का.?
खर सांगू का.? तुमच्या आमच्या सारख्या पांढरपेशी लोकांनी अशा गप्पा झोडण्यात काहीच अर्थ नाही. आपण त्यांच्यासाठी काही म्हणजे काहीच करू शकत नाही. बाबा आमटेनसारखा देवदूतच त्यांना वाचवू शकतो.
प्रतिक, तुम्ही ऋन्मेषचे
प्रतिक,
तुम्ही ऋन्मेषचे जवळचे नातेवाईक आहात का ?
@ चक्रम , हो ! तुम्ही कसेकाय
@ चक्रम , हो ! तुम्ही कसेकाय ओळखलेत . भाऊच आहे तो माझा
तुम्ही फार हुशार दिसता , नाव चक्रम का ठेवले ?
<< तुम्ही ऋन्मेषचे जवळचे
<< तुम्ही ऋन्मेषचे जवळचे नातेवाईक आहात का ? >>
<< हो ! तुम्ही कसेकाय ओळखलेत . भाऊच आहे तो माझा >>
अरेच्चा! त्यांच्या आतापर्यंतच्या लिखाणावरून मी त्यांना त्यांच्या आईवडिलांचा एकुलता एक कुलदीपक समजत होतो.
<< आत गेल्यावर माझी दृष्टी मुर्तीवर न स्थिरावता इतरस्त्रच भटकत होती. >>
बरोबर आहे. पुढे स्पष्टीकरण सापडलं.
<< एका कोपऱ्यात एक तरुणी हात जोडून डोळे मिटून स्तब्ध उभी होती. तिचा चेहरा शांत होता. >>
<< आत्मीयतेने नमस्कार करणारी ती तरुणी, भलतेच विचार करून नमस्कारच न करता बाहेर आलेलो मी >>
<< परंतु आस्तिक असणे म्हणजे मंदिरात जाणे अथवा देवाला सारखे नमस्कार करत राहणे आहे असे मला वाटत नाही. म्हणून मी जात नाही. आज मित्रासोबत सहज फिरायला गेलो असताना मंदिर दिसलं. योगायोगाने आज त्याच देवाचा वार होता, काहीतरी छान प्रसाद असेल म्हणून आत गेलो. >>
मंदिरात जाण्याकरिता असा उद्देश ठेवण्यापेक्षा नास्तिक असलेलं बरं..
देवाला साकडे घालत त्याच्याकडे
देवाला साकडे घालत त्याच्याकडे काही ना काही मागणारे आणि प्रसादाच्या अपेक्षेत असलेल्या त्या आजीबाई यांच्यात फरक तो काय?
त्या आजींची गरज अन्न आहे तर इतर भक्तांची आणखी काही असेल.. सगळेच तर तिथे काही ना काही अपेक्षेने गेलेले याचक आहेत ..
जर देव काहीतरी देतो वा देण्याची क्षमता बाळगून आहे असे नसते (असा विश्वास नसता) तर देव केवळ एक चांगले व्यक्तीमत्व आहे ईतक्यावर कोण त्याची पूजा करायला गेले असते
अवांतर ० मी एकुलता एकच आहे.
यावर हव तर वेगळा धागा कधीतरी काढेन, जेणेकरून लोकांच्या कायमचे लक्षात राहील.
@ चेतन , तसे म्हणा हव तर !
@ चेतन ,
तसे म्हणा हव तर ! काहीच हरकत नाही
मी समोर आलेल्या गरजू ला जास्तीत जास्त मदत करतो. लोकांशी चांगला वागतो. हीच माझी देवपूजा आहे.
आणि भाऊ म्हणजे सख्खाच हवा का .?
कोणताही असू शकतो. मानलेला बंधू , चुलतबंधू , आडनाव बंधू , लेखन बंधू इ.
<< आणि भाऊ म्हणजे सख्खाच हवा
<< आणि भाऊ म्हणजे सख्खाच हवा का .?
कोणताही असू शकतो. मानलेला बंधू >>
मान ना मान; मै तेरा भाईजान?
प्रतिक तुमचा लेख आवडला मला
प्रतिक तुमचा लेख आवडला मला असं नाही म्हणता येणार. नक्की काय म्हणायचय असा विचार करीत असता,
<<त्या सद्गृहस्थांच म्हणन बरोबर होतं. तो मुलगा आणि आजीही बरोबर होते. तबला वाजवणारे गृहस्थ चांगले होते. स्पीकर सुद्धा देवाचेच गाणे गात होते. साष्टांग नमस्कार घालणाऱ्या बाईंची काही चूक नव्हती. गुरुजींचेपण बरोबर होते. कमी अधिक वेळ नमस्कार करणारे सगळे, आत्मीयतेने नमस्कार करणारी ती तरुणी, भलतेच विचार करून नमस्कारच न करता बाहेर आलेलो मी, सगळेच बरोबर होते. आणि सगळेच चांगले होते. तरीसुद्धा काहीतरी चुकत होतं.>>
हा परिच्छेद आला वाचनात... आणि माझ्यासाठी लेख किंवा विचार इथे सुरू झाला... अन संपलाही.
तो शेवटचा परिच्छेद नसता तर बरं असंही वाटून गेलं. थोड्या व्यापक विचाराला एकदम बांधून घातल्यासारखं.
प्रत्येकाची 'त्या' शक्तीशी संधान बांधण्याची, संवादण्याची गरज वेगळी. त्या शक्तीशी आपल्याला जमेल त्या पद्धतीनं जमेल त्या भाषेत संवादण्याची 'सोय' करून ठेवली आहे. जिथे सोय असते तिथेच 'गैर' सोयही जन्मं घेते.
हा लेख एक विचार म्हणून किंवा एका विचार मंथनाची सुरुवात म्हणून मला आवडला.
@ दाद, प्रतिसाद दिल्याबद्दल
@ दाद, प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.__/\__
माझ्यासाठी लेख किंवा विचार इथे सुरू झाला... अन संपलाही. >>> तुमचे म्हणणे बरोबर आहे. मला हे त्यावेळी जाणवल नाही. तुमचा अभिप्राय वाचल्यावर जाणवल.
त्याक्षणी याबाबद लिहिताना माझं मन लिखाणात न राहता कोणाच्या भावना वगेरे दुखावल्या जातील कि काय इ इ मध्ये जायला लागलं. त्यामुळे माझ्याकडून लेख आवरता घेतला गेला. असो. पुढे काही लिहिताना मी तुम्ही म्हणालात त्या दृष्टीने विचार करून परिपूर्ण लेख लिहिण्याचा प्रयत्न करीन.
धन्यवाद..
>>>>>> प्रत्येकाची 'त्या' शक्तीशी संधान बांधण्याची, संवादण्याची गरज वेगळी. त्या शक्तीशी आपल्याला जमेल त्या पद्धतीनं जमेल त्या भाषेत संवादण्याची 'सोय' करून ठेवली आहे. जिथे सोय असते तिथेच 'गैर' सोयही जन्मं घेते. <<<<<<<
हे तर खरेच आहे. परंतु मला जरा वेगळीकडे लक्ष वेधायचे होते.
संत महात्म्यांची 'माणसात देव आहे' हि शिकवण आपण विसरत चाललो आहोत. हे मला सांगायचे होते.
धन्यवाद..!