कालच सर्फ ची एक जाहिरात बघण्यात आली. (जाहिरातीचे काही डिटेल्स चुकले असले तर सॉरी. नेट वर मिळत नाहीये मला ती अॅड..) दोन म्हातार्या बायका चहा घेत गप्पा मारत असतात, "आमच्यावेळी नोकरी करायला सुरुवात केली तेव्हा ६ रुपये पगार होता. आणि आज माझी सून माझ्या मुलापेक्षा जास्त कमवते. किसने सोचा था औरते इतना आगे चली जाएंगी? आजके जमानेमेंही औरत बनने का मजा है.." मागे सून लॅपटॉपवर काम करत असते. आणि इतक्यात तिचा नवरा खाली येतो आणि विचारतो "मेरी शर्ट धोयी नही क्या?" त्या बोलणार्या दोन्ही बायका चमकून बघतात आणि टॅग लाईन येते, "Is washing just a women's work/job?" आणि मी मनातल्या मनात सुटकेचा निश्वास टाकला, म्हटलं, "Thank God! Finally... Something sensible.. at last.."
एकीकडे काही मूर्ख ढोंगी अभिनेत्रींचे बिनडोक व्हीडीओ व्हायरल होत असताना, ३० सेकंदांमध्ये सांगितलेली ही वस्तुस्थिती खूप मार्मिक आहेच पण जाहीरातींसारखी सेक्सिस्ट इन्डस्ट्री जेंडर रोल ब्रेक करताना दिसतेय ही सुद्धा एक समाधानाची बाब आहे.
मिडीया.. जाहिराती.. चित्रपट.. त्यातही मनोरंजन क्षेत्र आणि मार्केटींग क्षेत्र यांना बर्यापैकी मेडीऑकर रहावं लागतं, मध्यम आणि लोकप्रिय मार्ग स्विकारावे लागतात, किंवा या क्षेत्रातल्या बहुतेक स्ट्रॅटेजीज तरी तशा असतात. लोकांना पचेल रुचेल इतपतच फिलॉसॉफी ते मांडतात कारण कदाचित त्यांच्या पैशाचं गणित त्याच्यावर अवलंबून असतं. चित्रपटांमधल्या स्त्रियांच्या इमेजबद्दल जितकी चर्चा होताना दिसते तितकी जाहिरातीतल्या इमेजबद्दल होत नाही. झालीच तरी ती अंगप्रदर्शनाच्या पुढे जात नाही. पण अंगप्रदर्शनाच्याही पुढे रोजच्या जगण्यातल्या स्त्रीचं चित्रण या जाहिरातीत कसं होतं यावर खोलवर विचार कधी झालाय का? झालाच असेल तर तो जाहिर मांडला/चर्चिला गेलाय का?
जाहिरात या माध्यमाची ताकद तशी आता कोणाला नवीन नाही. कोणी कितीही नाकारायचं ठरवलं तरी त्यांचा प्रभाव आणि परीघ कोणी नाकारु शकत नाही. चित्रपट, मालिका, साहित्यं किंवा इतर कशाहीपेक्षा आपण जाहिरातींना जास्त एक्स्पोज होत असतो. त्यामुळे जाहिराती रोजच्या जगण्याबद्दल काय सांगतायेत हे खूप महत्वाचं ठरतं.
जन्मापासून मरेपर्यंत लागणार्या प्रत्येक गोष्टीची जाहिरात केली जात असताना त्यात स्त्री ज्याप्रकारे उभी केली जाते ते खरच चिडचिड करणारं आहे. बाळाची काळजी फक्त आईलाच असते का? बापाला नसते? कुछ मांएं डॉक्टर होती है म्हणून त्यांना कळतं बाळासाठी कोणतं डायपर वापरायचं, कोणता साबण वापरायचा, कोणता टीश्यु वापरायचा.. एकाही डायपरच्या अॅडमध्ये बाप का असू नये? पुरुष जेव्हा डॉक्टर असतो तेव्हा तो लॅब मध्ये संशोधन करत असतो किंवा कुठेतरी इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये पेपर वाचत असतो पण बाई जेव्हा डॉक्टर असते तेव्हा ती मुलांच्या डायपरमध्ये, घराच्या निर्जंतुकीकरणात आणि हेल्थ ड्रिंकमध्येच गुंतलेली असते. एकही पुरुष असं म्हणताना दिसला नाहीये की "मै एक बाप भी हुं और डॉक्टर भी.." बाई जेव्हा इंजिनिअर असते तेव्हा तिला घरात कोणती गॅझेट्स वापरायची आणि ऑफिस आणि घर स्मार्टली कसं मॅनेज करायचं हे जास्त चांगलं कळतं. बाई बदाम खाते, स्वतःची काळजी घेते कारण तिला पुढे जाऊन मुलांचा अभ्यास घ्यायचा असतो आणि त्यांच्या बसमागे धावुन डब्बा द्यायचा असतो. असं का? हे असं का दाखवलं जातं? काळजी घेणार्याच्या आणि सेवा देणार्या भूमिकेत कायम बायकाच का असतात? मग ती आई म्हणून केलेली दुधाची काळजी असो, बायको म्हणून गेलेली तेलाची काळजी असो की मुलगी म्हणून केलेली लग्नाची काळजी असो.. बायकांची शैक्षणिक गुणवत्ता ही त्यांच्या करीयरपेक्षा त्यांच्या संसाराला पोषक आणि पूरक ठरणारी आहे असं चित्र का आहे?
जास्त शिकलेली बाई = जास्त चांगला संसार, जास्त गृहकृत्यदक्ष वगैरे...
भिन्नलिंगी आकर्षण आणि लैंगिकता या गोष्टी जाहिरातीत येणं यात काही चुकीचं नाही? पण कुठवर बायका फक्त पर्फ्युमवर आणि गाड्यांवर जीव टाकत रहाणार. Why dont they choose someone with clean kitchen, organized bedroom and hygienic bathroom? कपडे, भांडी, घराची सफाई, टॉयलेट क्लीनर, मुलांच्या गोष्टी, जेवणातले पदार्थ या सगळ्या गोष्टी फक्त बायकांच्याच का? पुरुष फक्त दाढी करतात, पर्फ्युम लावतात, मस्तपैकी बियर किंवा स्कॉच पितात, गाड्यांतून फिरतात आणि त्यांच्या बायकांना डायमंडस गिफ्ट देतात. What the hell is that?
विमा.. पॉलिसी काढणारे पुरुषच दिसतात. बायकांच्या आयुष्याला तशी काही किंमत नाहीच का? एकतर आधीच भारतात विमा असलेले लोक कमी. त्यातही जे आहेत ते पुरुष. हे वास्तव जाहिरातींमधूनही बोलतं.
आणि कॉस्मेटीक्स च्या जाहिरातींविषयी तर न बोललेलच बरं. मूर्खांच्या लक्षणामध्ये यांचा उल्लेख व्हावा इतका मूर्खपणा या जाहिरातींमध्ये भरलेला असतो.
असो, मुद्दा हा आहे की काही जाहिराती तरी आता वेगळी वाट चोखाळण्याचा प्रयत्न करतायेत.
एक जाहिरात पाहिलेली मागे. नवरा-बायको बोलतायेत आणि आज भांडी घासायचा नंबर कोणाचा यावर त्यांची मजा-मस्करी सुरु आहे. नीट आठवत नाही पण " बर्तन चमकायें.. और रिश्ते भी.." अशी टॅग लाईन होती बहुधा. स्कॉच ब्राईट ची नवी जाहिरात पाहिलेली मध्यंतरी. की भांडी घासणं इतकं सोपं आहे की तो मुलगा पैसे नसताना हॉटेलमध्ये जेवत राहतो आणि भांडी घासतो. कालच्या जाहिरातीच्या निमित्ताने मनातली अनेक दिवसांची मळमळ बाहेर पडली.. अशा जेंडर रोल ब्रेक करणार्या अनेक जाहिराती येत्या काळात निघोत आणि त्या जनमानसावर खूप आणि खोलवर परिणाम करोत ही अपेक्षा..
-----------------------------------------------------------------------------------
http://merakuchhsaman.blogspot.in/
Thank God..! Finally...
Submitted by मी मुक्ता.. on 1 April, 2015 - 04:18
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खुप मस्त
खुप मस्त
हो ती दोन आज्यांची गोष्ट छान
हो ती दोन आज्यांची गोष्ट छान आहे. यात जाणवणारा दुसरा अर्थ असा की बायका कितीही शिकोत, कमावू लागोत, बिझी होवोत, त्यांच्या वरच्या अपेक्षा अहे तशा आहेत.
सर्वात डोक्यात जाणारी म्हणजे घरातली सर्व मेंबरं नाश्त्याला वेगवेगळे पदार्थ मागतात आणि ती बाई चार चार हात असल्यासारखी एम टी आर मिक्सेस ने चार पदार्थ एकाच दिवशी बनवते ती.
मी मुक्ता...
मी मुक्ता... पर्र्फ़ेक्ट!
<<<एकीकडे काही मूर्ख ढोंगी अभिनेत्रींचे बिनडोक व्हीडीओ व्हायरल होत असताना,>>> +१००
नूयी, कोचर, पिरॅमल, या उच्चपदस्थ, जीद्दी अरुणीमा सिन्हां, झालच तर अपल्या घरी येणार्या मदतनीस आणि स्वाभिमानी बायका यांची मुलखत घ्या म्हणाव, म्हणजे 'खरी' मते कळतील.
समान वागणुक म्हणजे समान-- एकाला वाईट ते दोघान्ना हि वाईट च.
----------
मि_अनु
<<<सर्वात डोक्यात जाणारी म्हणजे घरातली सर्व मेंबरं नाश्त्याला वेगवेगळे पदार्थ मागतात आणि ती बाई चार चार हात असल्यासारखी एम टी आर मिक्सेस ने चार पदार्थ एकाच दिवशी बनवते ती.>>> अगदी अगदी
एक तर वाईट लाड दाखवले आहेत, त्यातुन इतके अन्न वाया, भारता सरख्या गरिब देशात.
.
.
सर्वात डोक्यात जाणारी म्हणजे
सर्वात डोक्यात जाणारी म्हणजे घरातली सर्व मेंबरं नाश्त्याला वेगवेगळे पदार्थ मागतात आणि ती बाई चार चार हात असल्यासारखी एम टी आर मिक्सेस ने चार पदार्थ एकाच दिवशी बनवते ती. >>>
हि जाहिरात माझ्या सुधा डोक्यात जाते. घरातली बाई म्हणजे सगळ्यांची दासी असते का ? दुसरी डोक्यात जाणारी अहिरात म्हणजे खाण्याच्या तेलाची . जाड्या नवर्याला व्यायाम करताना दम लागतो म्हणून ती बाई किती काळजीत पडते . जणू काही नवर्यांच्या health ची जबाबदारी त्यांची नसून बायकोचीच आहे . बाई मात्र सडपातळ आणि सुंदर
हो ती दोन आज्यांची गोष्ट छान
हो ती दोन आज्यांची गोष्ट छान आहे. यात जाणवणारा दुसरा अर्थ असा की बायका कितीही शिकोत, कमावू लागोत, बिझी होवोत, त्यांच्या वरच्या अपेक्षा अहे तशा आहेत. >>> त्याच्यातला अर्थ तसाच आहे .
म्हणूनच त्या सासवा चमकून लेकाकडे बघतात . की याच्या अपेक्शा बायकोने आठवणीने आपले शर्ट धूवून ठेवावे .
याच्या २ नविन जाहीराती आहेत . एक म्हणजे " धोना ,धोना धोना ..धोना फॉर माय शोना " वेगवेगळॅ नवरे आपापल्या बायकाना कपडे धूवायला कशी मदत करतात ते .
आणि दूसरी एक .. एक कपल आहे " मैने कहां काम बांट लेते है " ते दोघेही आवडतात मला
सर्वात डोक्यात जाणारी म्हणजे घरातली सर्व मेंबरं नाश्त्याला वेगवेगळे पदार्थ मागतात आणि ती बाई चार चार हात असल्यामा एम टी आर मिक्सेस ने चार पदार्थ एकाच दिवशी बनवते ती >>>>>>> + १०००००००००००० .
भारी वैताग जाहीरात आहे . उगाचच आपल्या घरातल्या माणसांच्या पण अपेक्शा वाधल्यासारख्या होतात ना !
(तिची पहिली जाहिरात तिच होती
(तिची पहिली जाहिरात तिच होती ना? १००% खात्री नाही...........) >> पहिली जाहिरात तेलाची होती , धारा बहुतेक
.
.
The Badminton champ
The Badminton champ represents Yonex Sportswear, Deccan Chronicle, Airtel, Top Ramen Noodles, Emami Fast Relief, Adani Wilmar’s Fortune Plus, Indian Overseas Bank, Bharat Petroleum Corporation Limited, Iodex, P&G’s Whisper, Vaseline, Sahara India Pariwar, Collectabillia, Herbalife, Jaypee Cement, among others. She has been part of several social awareness campaigns as well such as ‘Meri Beti Meri Shakti’.
थॅक्स ऑल.. खरंच ती MTR ची
थॅक्स ऑल..
खरंच ती MTR ची अॅड फार डोक्यात जाते.
सायनाच्या तेलाच्या अॅड विषयी बोलायचं झालं तर मला ती ठिक वाटलेली अॅड. स्वतःच्या खाण्यापिण्यावर खूप बंधन ठेवावी लागली पण आता हे पर्टीक्युलर तेल हेल्थी असल्यामुळे मी मनसोक्त खाऊ शकते. नॉट बॅड. जाड नवर्यांच्या बारीक बायकांपेक्षा तरी बरंच...
उत्तम लेख, उत्तम विषय. १००
उत्तम लेख, उत्तम विषय. १०० टक्के सहमत
मीडियाकडे समाज प्रबोधनाचे एक उत्तम मध्यम म्हणून पहिले जाते. जाहिरात, मालिकांमधील कित्येक गोष्टी समाज अंगीकारत असतो.
पण मला एक असे वाटतंय की, जाहिराती या समाजाचा आरसाच असाव्यात.
आज समाजातील किती पुरुष डायपर बदलताना दिसतात? किती पुरुष घरातील कपडे धुतात ? किती पुरुष भांडी, घराची सफाई, मुलांच्या गोष्टी, जेवणातले पदार्थ इत्यादी गोष्टींमध्ये लक्ष घालताना दिसतात? actually किती पुरुष equality वर belive करुन त्या प्रकारे behave करताना दिसतात?
जाहिराती बनवणाऱ्यांचे बहुतेक गणित हे समाजावर, समाजातील लोकांवरच अवलंबून असते (तिथे बऱ्यापैकी emotional blackmail लाही स्थान असते)
सो माझ्या मते ही चूक Ad makers ची नसून समाजातील पुरुषांची, पुरुष प्रधान संस्कृतीची आहे.
उत्तम लेख, उत्तम विषय. १००
उत्तम लेख, उत्तम विषय. १०० टक्के सहमत >> +१
लीला पुनावालाबाईंची एक मस्त
लीला पुनावालाबाईंची एक मस्त मुलाखत ऐकली रिसेंटली. त्या म्हणाल्या...मी देखील ह्यातून गेले आहे. करिअरच्या पायर्या चढताना नवर्याचा वेग कमी पडत होता व ही बायको अफाट वेगाने पुढे चालली होती परंतु घरी आल्यावर "तो" पेपर वाचताना चहा करून देण्याचे काम "ह्याच" बायकोचे होते. तिने परिस्थितीशी सामना करायचा असे ठरवले, तेही न भांडता.
तिने त्याला सांगितले, मी तुला आनंदाने चहा करून देइन व तु पेपर वाच. नंतर चहा पिताना मला तूच बातम्या वाचून दाखव किंवा सांग. मग तो खूश झाला. कामाची वाटणी झाली व परस्परांमधे सलोखा राहिला व प्रेमही वाढले.
चहा करणे+ओटा आवरणे+खाणे
चहा करणे+ओटा आवरणे+खाणे काहीतरी करणे+त्याची तयारी हे सर्व == पेपरातल्या बातम्या वाचून दाखवणे?
('चहा करणे' हे काम ८०% वेळा चहा करुन मग येऊन निवांत बसण्यावर थांबत नाही )
उत्तम लिहिलं आहे. लीला
उत्तम लिहिलं आहे. लीला पूनावाल्यांकडून बरंच शिकण्यासारखं आहे.
जाहिराती ह्या कायमच sexist आणि आचरट असतात. मात्र त्यांना स्वतःचा जीव असा नसतो. They are simply a reflection of society, which in our case happens to be unfair to women. जाहिरातीं मुळे चिडचिड करून घेण्यात हशील नाही.
आज नवरा आणि नवरी सारखेच शिकले ले असले तरी बहुतेक वेळा खर्च मुलीकडचेच जास्त करतात. जिकडे खर्च सारखाच वाटून घेतला जातो अशी कित्येक उदाहरणे आहेत मात्र त्याचं कारण "मुलाकडच्यांनीच ती ऑफर दिली" असं असतं. मुलीकडच्यांनी खंबीरपणे उभं राहून हे करून घेतलं अश्या केसेस असतील नक्की पण माझ्या बघण्यात तरी नाहीत. असे बदल आपण सुशिक्षित लोकच करून घेऊ शकू.
जाहिराती काय - आपोआप बदलतील.
एकीकडे काही मूर्ख ढोंगी
एकीकडे काही मूर्ख ढोंगी अभिनेत्रींचे बिनडोक व्हीडीओ व्हायरल होत असताना, ३० सेकंदांमध्ये सांगितलेली ही वस्तुस्थिती खूप मार्मिक आहेच पण जाहीरातींसारखी सेक्सिस्ट इन्डस्ट्री जेंडर रोल ब्रेक करताना दिसतेय ही सुद्धा एक समाधानाची बाब आहे.>>
+१
मागे फॅनी रिलिज होताना टाइमस् चं आणि दिपिकाचं बरंच मोठं प्रकरण झालेलं. आता पिकू का काहितरी येतोय. मला आता हे नुसते Publicity stunt वाटताहेत.
लेख पटला आणि आवडला. आहे खरं
लेख पटला आणि आवडला. आहे खरं असंच चित्र. कधी बदलेल किंवा बदलेल की नाही काही कल्पना नाही.
निरा, इंद्रा नूयीचं उदाहरण अजिबातच नको. मागे तिच्याच व्हिडिओत तिने म्हटलेलं की मी देशाबाहेर बिझनेस ट्रीपवर जरी असले तरी मुलांनी होमवर्क केलाय की नाही, कंप्युटर्/व्हिडिओ गेम्स किती वेळ खेळतायत ह्यावर लक्ष ठेवून असते. देशात, देशाबाहेर बिझनेस ट्रिपवर जाणारे नवरा-बायको एकाच वेळी दोघंही घरी मुलांजवळ नसतील अशा तर्हेने प्लॅन करत नसतील. मग ज्यावेळी इंद्रा नूयी बाहेर असतील त्यावेळी त्यांच्या नवर्याला मॅनेज करता येत नाही? बाईनेच करियर वुमन, सुपरमॉम सगळं एकाच वेळी प्ले करायचा अट्टाहास का? असा प्रश्न तो व्हिडिओ बघून पडला होता.
छान लेख. वेस्टर्न कन्ट्रीज
छान लेख. वेस्टर्न कन्ट्रीज मधे सुद्धा असल्या सेक्सिस्ट अॅड्स असतातच.
ती दीपिका ची फिल्म पाहिली तेव्हाच मला वाटलं होतं की काहीतरी सिनेमा वगैरे येत असणार. बायांनी पब्लिसिटी स्टन्ट साठी वीमेन एम्पॉवारमेन्ट इ. आयडिया वापरून घेणे हे नविन फॅड आहे आपल्याकडे. तसेही ती फिल्म आचरटच आहे .मागे पण एका टिव्ही अभिनेत्रीचे "लेटर टु मोदी" गाजलं होतं पण लगेच तिची एक नविन सिरियल लाँच झाली हा योगायोग मी तरी मानणार नाही.
बै बै , किती तो इस्त्री
बै बै , किती तो इस्त्री जातीवर अन्याव
याचा विरोध व्हायलाच हवा
प्रशू, बरोबर आहे तुमचं
प्रशू,
बरोबर आहे तुमचं म्हणणं. जाहिराती समाजाचाच आरसा असतात. पण जाहिराती आणि एकूणच मार्केटींग क्षेत्र टकल्या माणसाला पण कंगवा विकत घ्यायला लावतात हे ही खरंच आहे. समाजाचा आरसा असूनही जाहीरातींत कल्पनाविलासाचा आणि अतिशयोक्तीचा भाग असतोच. So I would rather choose equality illusion over super-woman illusion. तुमचा मुद्दा बरोबरच आहे हे मात्र खरं.
सुमेधाव्ही,
ह्म्म.. प्राप्त परिस्थितीत शांतपणे आणि डिप्लोमॅटीकली सिच्युएशन हाताळणे हे शहाणपणाच लक्षण आहेच. पण इथे शहाणपणापेक्षा तार्किकीयदृष्ट्या काही मुद्दे मांडले आहेत. आणि लीला पुनावालांच्या नवर्याने दाखवल्याही बातम्या वाचून, चर्चाही केल्या असतील बरोबरीने, पण तुला काय कळतय त्यातलं (राजकारण, क्रिडा वगैरे) असं म्हणणारे महाभागही कमी नाहीत.
बाकी, पब्लिसिटीसाठी करत असाल कॅम्पेन तरी हरकत नाही पण तुम्ही काय बोलताय, त्याचा काय अर्थ होतोय याचं भान हवं.
बाईनेच करियर वुमन, सुपरमॉम सगळं एकाच वेळी प्ले करायचा अट्टाहास का? >> अनुमोदन..
अनुमोदन. मध्यंतरी पाहिलेली
अनुमोदन.
मध्यंतरी पाहिलेली एक कॉफीमेकरची जाहिरात याच कारणासाठी आवडली होती. मुलगी 'बघायला' आलेली सासू-टु-बी परदेशात राहणार्या मुलाला साधी कॉफी प्यायची तरी बाहेर जावं लागतं म्हणून आम्ही त्याला लग्नाची घाई करतो आहोत असं म्हणते. त्यावर ती मुलगी आतून कॉफीमेकर आणून 'याच्याशीच लग्न लावा मुलाचं' म्हणून ठणकावते.
स्पष्ट आणि थेट.
लेख आवडला. अगदी बरोबर मांडलं
लेख आवडला. अगदी बरोबर मांडलं आहे !
छान लिहिलं आहे. अशा जेंडर
छान लिहिलं आहे.
अशा जेंडर रोल ब्रेक करणार्या अनेक जाहिराती येत्या काळात निघोत आणि त्या जनमानसावर खूप आणि खोलवर परिणाम करोत ही अपेक्षा.. >>> +१
मुक्ता, अनू, बरोबर आहे तुमचे
मुक्ता, अनू, बरोबर आहे तुमचे पण तरी पूनावालाबाईंचा विचार जरा वेगळा वाटला खरा ...नाहीतर कितीही आव आणला तरी असमानता अनेक किलोमीटर्स रुजली आहे...अनेक वर्षे जावी लागतीलच..पण निदान सुरुवात......
मस्त लिहीलंय, मुक्ता. लेख
मस्त लिहीलंय, मुक्ता. लेख आवडला.
लेख आवडला. स्वाती, त्या
लेख आवडला.
स्वाती, त्या जाहिरातीतलं कॉफिमेकर हॅवेल्स कंपनीचं आहे. त्यांच्या इतर अप्लायन्सेसच्या जाहिरातीपण अश्याच मस्तं आहेत. 'हॅवेल्स अप्लायन्सेस.. रिस्पेक्ट विमेन!' ही त्यांची टॅगलाइन आहे. (जाहिरातींसाठी 'टॅगलाइन' बरोबर शब्द आहे का? की स्लोगन? )
>>जन्मापासून मरेपर्यंत लागणार्या प्रत्येक गोष्टीची जाहिरात केली जात असताना त्यात स्त्री ज्याप्रकारे उभी केली जाते ते खरच चिडचिड करणारं आहे.
चिडचिड होऊन उपयोग नाही. यासाठी काही अंशी बायकाही कारणीभूत आहेत. काही बायकांना घरी सगळी मरमर स्वतःच करायची हौस असते. 'मी घरी नसले की कसं सगळ्यांचं अडतं. चहा आणि टोस्ट करणंदेखिल नवर्याला जमतच नाही.' असली बावळट कौतुकं असतात. 'माझ्यावाचून अडतं' हा विचार बहुतेक इगो सुखावून जातो. काही ठिकाणी कामांची जबाबदारी वाटून न घेता नवर्याकडून, मुलांकडून मदत केली गेली तरी त्याचं तुडुंब कौतुक असतं. दुर्दैवानं तेच जाहिरातींमध्ये वापरून घेतलं जातं.
छान आहे लेख आणि जाहिराती पण
छान आहे लेख आणि जाहिराती पण मस्त आहेत लेखात आणि अभिप्रायात नोंदवलेल्या. मी तर २० वर्षांपासून टिव्हीपासून अलिप्त आहे. क्वचित अगदी. त्यामुळे पुर्वी दुरदर्शन रोज त्याच त्याच अनेकवेळा जशा जाहिराती बघायला मिळत तसे आता होत नाही. उलट तूनळीवर फक्त पाच सेकंदाची अॅड असते ती मला धमछाक करणारी वाटते. कारण अॅड च्या अगदी सुरवातीलाच एकदम कर्शश लाउड संगीत सुरु असते.
छान लेख! आवडला!
छान लेख! आवडला!
लेख उत्तम. लेखाचा विषयसुद्धा
लेख उत्तम. लेखाचा विषयसुद्धा आवडला.
स्त्रीयांबद्दलचा समाजाचा द्रुष्टीकोण बदलणे आणि त्याचा प्रचार होणे गरजेचे आहेच. जाहीरात हे प्रभावी माध्यम ठरावे.
पण जाहीरातींचा मूळ हेतू समाजप्रबोधन करणे नसून आपले प्रॉडक्ट जनमाणसात पोचवणे हेच असते. त्यासाठी ते जनरली दोन फंडे वापरतात. एक म्हणजे लोकांशी रिलेट होणारे आणि त्यांना चटकन आपलेसे वाटणारे कन्सेप्ट निवडतात आणि घराघरांत पोहोचतात तर दुसरे म्हणजे हटके काहीतरी दाखवत लक्षवेधी बनायचा प्रयत्न करतात.
वर उल्लेखलेल्या जाहिराती या दुसर्या प्रकारात मोडतात. या लक्षवेधी बनतात पण हे हटके प्रकरण आहे या शिक्क्यासहच लक्षात राहतात.
उदाहरणार्थ लेखात उल्लेखलेली जाहीरात ज्यात तिचे प्रॉडक्ट वापरून भांडी घासणे इतके सोपे आहे की तो मुलगा हॉटेलात जाऊन जेवतो आणि पैश्याचा मोबदल्यात भांडी घासतो वगैरे.. यातही हेच हायलाईट होते की "भांडी घासणे हे मुलांचे काम नसूनही" त्या प्रॉडक्टमुळे सोपे होऊन त्यांना ते जमते..
>>> पण कुठवर बायका फक्त
>>> पण कुठवर बायका फक्त पर्फ्युमवर आणि गाड्यांवर जीव टाकत रहाणार.>>> +१
लेख आवडलाच.
Pages