आपल्याला वर्तमानपत्रं, इंटरनेट इत्यादि माध्यमांतून आपल्या आसपासच्या किंवा अगदी जगाच्या दुसर्या टोकाच्या घडामोडीही घरबसल्या कळू शकतात. पण आपण जिथे राहतो त्या देशाच्या बाहेरच्या जगतात नेमकं काय घडत असतं ते आपण फ़ार लक्षपूर्वक पाहत नाही कारण त्याचा सरळ सरळ आपल्यावर परिणाम होत नसतो. पण आजच्या काळात पृथ्वीच्या गोलावर सगळीकडेच काही ना काही असे घडत असते ज्याचे दूरगामी आणि भौगोलिकदृष्ट्या दूरवरच्या ठिकाणीही परिणाम जाणवू शकतात.
कुठे राजकिय उलथापालथ होत असते, कुठे बंडखोरी होत असते, कुठे एकमेकांवर हल्ले चालू असतात तर कुणा देशांमध्ये महत्वाचे करार होत असतात, कुठे नविन शोध लागत असतात, कुठे प्रगत विज्ञानाच्या गैरवापरातून कुरघोडी होत असते, कुठे रोज नव्या दहशतवादी संघटना निर्माण होऊन जगाला वेठीला धरत असतात. पण आपल्या रोजच्या जगण्यात ह्याचा काहीच संबंध नसल्यामुळे आपल्यासाठी ते नॉट हॅपनिंग असते. पण तरीही कुठेतरी आपला एक डोळा ह्या घडामोडींवर असायला हवा असे वाटते. हे प्रकर्षाने जाणवले ते कालच्या सौदी अरेबियाच्या येमेन वरील हवाई हल्ल्यांमुळे. आखाती युद्धं या आधीही जगाने पाहिली आहेत. आपल्याला आपल्या इतिहासामुळे युद्धाची दोन मुख्य कारणं माहित आहेत...एक म्हणजे भूमी बळकावणे आणि दुसरं अतिशय दुर्दैवी कारण म्हणजे धार्मिक तेढ. पण ह्यापेक्षाही जास्त युद्धांचा भस्मासूर जगाच्या काही भागांमध्ये बेचिराख करत असतो. आणि त्याचं जागतिक कारण म्हणजे एकमेकांवर वर्चस्व गाजवणे. कुणी सरळ सरळ वर्चस्व गाजवण्यासाठी युद्ध करतंय तर कुणी ताकाला जाऊन भांडे लपवल्यासारखं दुसर्या्च कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून तिसर्यााचा बळी घेऊन आपला स्वार्थ साधत असतंय.
कोणे एकेकाळी सुखाने नांदणार्या देशांमध्ये जर आज अराजक, अस्थैर्य असू शकतं तर तेच भारताच्याही नशिबी येऊ नये म्हणून, सावधगिरी म्हणून आंतरराष्ट्रिय घडामोडींकडे थोड्या डोळसपणे पहायला हवं. दहशतवाद तर आपण सोसतो आहोत, तोंड देतोच आहोत. पण समजा सातासमुद्रापलिकडून येऊन कुणी त्यांचं आरमार छुप्या हेतूने आपल्या शेजारी आणून ठिय्या दिला तर ते नक्कीच धोकादायक असेल.
वर्तमानपत्रं, इंटरनेटवर वाचलेल्या अश्या आंतरराष्ट्रीय घडामोडी इथे लिहित गेलं तर कदाचित काही काळाने पुढच्या घटनांची सुत्रं आपल्याला जोडता येतील उदा. तालिबानचा उगम आणि आतापर्यंतचा प्रवास आपण बघत आलो आहोत. उगमाच्या वेळची परिस्थिती आणि त्यात गुंतलेले देश व आताची परिस्थिती व त्या देशांच्या बदलेल्या भुमिका.
धन्यवाद.
================================================
NATO : NORTH ATLANTIC TREATY ORGANIZATION
UN : UNITED NATIONS
IAEA : INTERNATIONAL ATOMIC ENERGY AUTHORITY
UNHCR : UNITED NATIONS HIGH COMMISSIONER FOR REFUGEES
IMF : INTERNATIONAL MONETARY FUND
CTBTO : COMPREHENSIVE NUCLEAR-TEST-BAN TREATY ORGANIZATION
INTERPOL : INTERNATIONAL CRIMINAL POLICE ORGANIZATION
EU : EUROPEAN UNION
WEC : WORLD ENERGY COUNCIL
SAARC : SOUTH ASIAN ASSOCIATION FOR REGIONAL CO-OPERATION
ASEAN : ASSOCIATION OF SOUTH EAST ASIAN NATIONS
AIIB : ASIAN INFRASTRUCTURE INVESTMENT BANK
FBI : FEDERAL BUREAU OF INVESTIGATION
CBDR : COMMON BUT DIFFERENTIATED RESPONSIBILITIES
UNFCCC : UN FRAMEWORK ON CLIMATE CHANGE
COP : CONFERENCE OF PARTIES
ISA : INTERNATIONAL SOLAR ALLIANCE
MTCR : MISSILE TECHNOLOGY CONTROL REGIME
NSG : NUCLEAR SUPPLIERS GROUP
माद्रिद, स्पेन येथे
माद्रिद, स्पेन येथे होलोग्राफिक निदर्शने - स्पेनमध्ये १ जून पासून 'नागरी सुरक्षा कायदा' लागू करण्यात येणार आहे. ह्या कायद्यानुसार स्पेनच्या सरकारी वास्तूंसमोर परवानगी न घेता निदर्शने करणार्यांना ६ लाख युरो, पोलिसांचा अनादर करणार्या निदर्शकांना ६०० युरो, पोलिसांचे फोटो/व्हिडिओ घेणार्यांना ३० हजार युरो दंड लावला जाईल. इतर युरोपिय देशांप्रमाणेच स्पेनची जनताही सरकारच्या आर्थिक धोरणावर नाराजी व्यक्त करण्यासाठी वेळोवेळी रस्त्यावर उतरत आहे.
ह्या कायद्याच्या निषेधार्थ 'होलोग्राम्स फॉर फ्रिडम' ह्या गटाने माद्रिद संसदेच्या दिशेने अंदाजे २००० निदर्शकांचया प्रतिमा निदर्शने करीत पुढे नेल्या. ह्या भासमान प्रतिमांना निदर्शनांचे स्वातंत्र्य मिळू शकते, मात्र खर्याखुर्या नागरिकांना मात्र हे स्वातंत्र्य नाही अश्या शब्दांत ह्या गटाने टीका केली. नागरिकांना मुक्तपणे मत मांडायचा अधिकार नसेल तर त्यांच्या 'होलोग्राफिक प्रतिमेद्वारे' मत मांडण्यावाचून दुसरा पर्याय नाही असे ह्या गटाचे प्रवक्ते कार्लोस इस्कानो ह्यांनी म्हटले आहे.
-----
टेक्नॉलॉजीचा असाही उपयोग.....
पाकिस्तानने आज त्यांच्या नविन
पाकिस्तानने आज त्यांच्या नविन मध्यम पल्ल्याच्या घोरी बॅलेस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी घेतली. ही मिसाईल्स १३०० किमी पर्यंत पारंपारिक अस्त्रे व अण्वस्त्रे वाहून नेऊ शकतात. ह्या रेंजमध्ये कित्येक भारतीय शहरे कव्हर होतात.
ह्या आधी ८ मार्चला पाकिस्तानने शाहिन III ह्या पारंपारिक अस्त्रं व अण्वस्त्र वाहून नेणार्या २७५० किमी पल्ला असणार्या बॅलेस्टिक मिसाईलची चाचणी केली.
कोणालाही युद्ध परवडणार नाही
कोणालाही युद्ध परवडणार नाही अश्या जगात सगळेजण शस्त्रास्त्रे जमा करत आहेत.
युद्ध नको ही अक्कल आली पाहिजे
युद्ध नको ही अक्कल आली पाहिजे ना! सगळीच इनसिक्युरिटी. एकमेकांच्या सार्वभौमत्वाला थ्रेट निर्माण होइल असं वागायचं, एका राष्ट्राने स्वत:च्या राक्षसी महत्वाकांक्षेपायी दुसर्या राष्ट्राचा घास गिळू पहायचा, दुसर्या देशात जाउन नाक खुपसायचं, दहशतवादाला खतपाणी घालायचं, गरीबाकडे विष खायलाही पैसे नाहीत आणि अश्या गरिबाच्या लेकरांना अमिषं दाखवून मिलिटंट बनवायचं.....हे जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत insecurity असणारच.
भारत कॅनडाकडून सिव्हिल
भारत कॅनडाकडून सिव्हिल न्युक्लिअर पॉवर प्लांट्ससाठी युरेनियम घेणार.
http://zeenews.india.com/news/india/live-india-to-procure-uranium-from-c...
++++भारत कॅनडाकडून सिव्हिल
++++भारत कॅनडाकडून सिव्हिल न्युक्लिअर पॉवर प्लांट्ससाठी युरेनियम घेणार.++++
अरेच्च्या !! गरज त्यांना आहे ना युरेनियम विकायची मग मोदींना देश सोडुन जायची गरजच काय ?
आता आपटार्ड्सना मोदी बॅशींगसाठी नविन एक कारण मिळेल.
रॅफेल विमान विकत घेतली, देशासाठी युरेनियम विकत घेतल, ते ही एका दौर्यात ?
प्लिज अजिंक्य, ह्या धाग्यावर
प्लिज अजिंक्य, ह्या धाग्यावर ते सगळ नको.
OK AGREED !!
OK AGREED !!
Thanks.
Thanks.
अजिंक्य <<< गूड मोदी जगभरात
अजिंक्य <<< गूड
मोदी जगभरात फिरत आहेत. काही आंतरराष्ट्रीय घडामोडी मोदींच्या दौर्यामुळेही होतील. पण तुम्ही केश्विनींचे म्हणणे मान्य करून देशीय राजकारण ह्यात न आणण्याचा निर्णय घेतलात हे मस्तच!
काही जण इथे फक्त तमाशा
काही जण इथे फक्त तमाशा करतात
तु मारल्यासारखे कर मी ओरडण्यासारखे
मागील वेळेस परदेशी दौरे करून तेल किंमती कमी केले होते आता काय चमत्कार करणार?
रौल कॅस्ट्रोंच्या भेटीनंतर
रौल कॅस्ट्रोंच्या भेटीनंतर ओबामांनी क्युबाला टेरर लिस्ट मधून काढण्याचा निर्णय घेतला आहे. ह्या निर्णयाला रद्दबातल ठरवण्यासाठी यू.एस. लॉ मेकर्सना ४५ दिवसांचा अवधी आहे. अमेरिकी आणि क्युबन डिप्लोमॅट्समध्ये दोन्ही राष्ट्रांतील संबंध सुधारण्याच्या दृष्टीने चर्चेच्या फेर्या चालू आहेत.
http://www.washingtonpost.com/world/the_americas/next-move-in-us-cuba-th...
विरोधी पक्षात असताना
विरोधी पक्षात असताना तामिळनाडू जैतापूर इ. बराच विरोध केला होता.
आता अणूभट्टी लावणार कुठे? सगळ्यांचे तर कान फुंकून ठेवले आहेत
छान छान
डोक्यात गोळी खाणे (मग
डोक्यात गोळी खाणे (मग धमक्यांना न घाबरता शाळेत जाणारच या निर्धारापायी का असेना) हा शांततेचे नोबेल मिळण्याचा निकष असू शकतो हे अतर्क्य आहे.
---- ओबामान्नी कुठलेही दैदिप्यमान काम न करता त्यान्ना शान्ततेचा नोबेल अॅडवान्स मधे मिळाला होता...
मलाला ओव्हर रेटेड आहे याच्याशी सहमत... पण तरुण पिढीसाठी कुणीतरी आदर्ष डोळ्यासमोरे असायला हवे ना ? असा आदर्ष त्यान्च्यामधुनच आला तर तो जास्त परिणामकारक ठरेल अशी तिला पुढे करणार्या देशान्ची अपेक्षा असावी.
उदय +1 ------ इस्लामिक
उदय +1
------
इस्लामिक स्टेटने इराकच्या रमादी प्रांताजवळील भाग आज पुन्हा ताब्यात घेतला. इराकी सिक्युरिटी फोर्सेस व शिया पॅरामिलिटरी फोर्सेसना त्यानी हुसकावून लावले. तिथले नागरिक आपली गावं सोडून गेले आहेत. अधिक माहिती व त्यांच्या प्रतिक्रिया इथे वाचायला मिळतील. http://m.ndtv.com/world-news/islamic-state-seizes-village-in-iraqs-anbar...
कुठे कुठे आसरा घेतलाय लोकानी पोराबाळांसकट http://m.smh.com.au/world/islamic-state-seizes-ramadi-in-iraq-planting-b...
इराणसह झालेल्या
इराणसह झालेल्या अणुकरारासंदर्भात ओबामांच्या समोरील आव्हानांत वाढ
अमेरिकन काँग्रेसमध्ये ओबामा यांचे विरोधक- रिपब्लिकन पक्षाचे प्राबल्य आहे.त्यांनी ओबामा प्रशासनाने इराणसह वाटाघाटी करु नयेत अशी आग्रही भूमिका घेतली होती व इराणवर निर्बंध वाढवावेत अशी सुचना केली होती.पण ओबामा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करुन अणुकराराचा निर्णय घेतला आहे.
अमेरिकेच्या फॉरेन रिलेशन कमिटीने (FRC) घेतलेल्या बैठकीत या अणुकराराबाबतचे सारे अधिकार काँग्रेसकडे असल्याचे जाहीर केले आहे व सर्व १९ सदस्यांनी या निर्णयाला बिनविरोध समर्थन दिले आहे. या निर्णयानुसार अणूकरार झाल्यानंतरच्या पहिल्या ३० दिवसांत या करारातील सर्व मुद्दे अमेरिकन काँग्रेससमोर सादर करण्याची जबाबदारी व्हाइट हाऊसची असेल. या महिन्याभरात अमेरिकन काँग्रेस या अणूकराराला विरोध करु शकते वा पारित करु शकते. तसेच यात ओबमा प्रशासनाने इराणचे संशयित अणुप्रकल्प, बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची संख्या व इराणच्या दहशतवादविरोधी धोरणांचा अहवाला सादर करणे अपेक्षित आहे. अमेरिकन काँग्रेसमध्ये विरोधी पक्षात असलेल्या रिपब्लिकन पार्टीचे वर्चस्व असल्यामुळे या ३० दिवसांत ओबामा प्रशासनास हा अणूकरार पारित करुन घेणे अवघड असल्याचे बोलले जात आहे.
चीनच्या AIIB (Asian
चीनच्या AIIB (Asian Infrastructure Investment Bank) मध्ये रशियाचा सहभाग निश्चित झाला. बुधवारी चीनच्या अर्थ विभागाने सादर केलेल्या यादीनुसार AIIB मध्ये १६ युरोपिय देश, 'आसियन'चे सर्व सदस्य देश, 'ब्रिक्स'मधील सदस्य देश, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, इस्रायल, आखाती/मिडल इस्ट मधील देश ह्यांचा समावेश आहे.
उत्तर कोरियाला व्यवहार पारदर्शी नसल्याच्या कारणावरुन आणि तैवानला चीनच्या परराष्ट्र धोरणावरुन वगळण्यात आले आहे.
आपल्या युआन चलनाचा आंतरराष्ट्रिय स्तरावरील वापर वाढवण्यासाठी चीनने आखाती देशातील व्यवहारांसाठी कतारमध्ये आपले पहिले विशेष केंद्र उघडले आहे.
MH ३७० च्या शोधाचा परिघ
MH ३७० च्या शोधाचा परिघ वाढवणार.
http://www.independent.co.uk/news/world/australasia/mh370-search-area-fo...
सौदी अरेबियाने येमेनमध्ये
सौदी अरेबियाने येमेनमध्ये छेडलेल्या बेकायदेशीर आणि गुन्हेगारी स्वरूपाच्या युद्धात सौदीचा एक मेजर जनरल मारला गेला : http://english.farsnews.com/newstext.aspx?nn=13940125000246
येमेनचा भस्मासुर आता सौदी अरेबियावरच उलटत आहे.
पाकिस्तानने युद्धापासून दूर राहायचा घेतलेला निर्णय शहाणपणाचा आहे. झाकली मूठ सव्वा लाखाची!
-गा.पै.
<< पाकिस्तानने युद्धापासून
<< पाकिस्तानने युद्धापासून दूर राहायचा घेतलेला निर्णय शहाणपणाचा आहे. झाकली मूठ सव्वा लाखाची! >>
------ सौदीमुळेच नवाज शरिफ आणि परिवार मुशरफ यान्च्या लोखन्डी पन्जामधुन सहिसलामत वाचले. ते व्यक्तीगत कर्ज शरिफान्वर आहे...
पाकसाठी सौदी मोठा आर्थिक आधार आहे, मोक्याच्या क्षणी दुखावणे परवडणारे नाही आहे.
पेंटॅगॉन - अमेरिकेचा संरक्षण
पेंटॅगॉन - अमेरिकेचा संरक्षण विभाग त्याच्या सायबर कमांड अंतर्गत सायबर मिशन फोर्सची उभारणी करत आहे. हा फोर्स २०१८ पर्यंत पुर्ण कार्यरत होईल. त्यात १३३ टीम्स व सहा हजाराहून जास्त सदस्य असतील. एक भाग 'सर्ज फोर्स' म्हणून तयार करण्यात येत आहे. त्यात लष्करातील रिझर्व्ह तसेच नॅशनल गार्डच्या २००० जवानांचा समावेश असेल.
संरक्षण विभागाच्या संगणकयंत्रणेत सतत घुसखोरीचे प्रयत्न होत आहेत. ह्या यंत्रणांचा अमेरिकेच्या मोहिमांसाठी वापर केला जातो. आपत्कालात ही घुसखोरी महत्वाच्या यंत्रणा नष्ट करु शकते. अमेरिकेवर होणार्या सायबर हल्ल्यांमध्ये रशिया, चीन व इराणचा मोठा सहभाग आहे.
अमेरिका व इस्रायलने इराणच्या अणुप्रकल्पावर केलेल्या 'स्टक्सनेट' सायबर हल्ल्यानंतर इराणने प्रत्युत्तर म्हणून सायबरहल्ले सुरु केले आहेत असा नॉर्सचा अहवाल आहे.
सिरियामध्ये केमिकल वेपन्सचा
सिरियामध्ये केमिकल वेपन्सचा वापर केला गेल्याचा संशय आहे. मार्च महिन्यात इद्लिब शहरावर बॅरल बॉम्ब टाकण्यात आले. त्यातून मुलांना क्लोरीन विषबाधा झाली. डॉक्टर्स क्लोरीन ॲटॅक झालेल्यांवर उपचार करत आहेत.
ह्या संदर्भातल्या काही व्हिडिओ फिल्म्स बघितल्यावर U.N. सिक्युरिटी कौंसिल मेम्बर्स देखिल हेलावून गेले. आपद्ग्रस्त भागात 'नो फ्लाय' झोन घोषित करत आहेत.
The no-fly zone against helicopters would also stop the regime from dropping "barrel bombs" – metal cylinders filled with explosives, that are illegal in international law and have caused tens of thousands of civilian deaths in the conflict.
http://www.telegraph.co.uk/news/worldnews/middleeast/syria/11545036/UN-m...
------------
प्रत्येक पेटलेल्या राष्ट्रात नक्की काय साध्य केलं जातंय?राष्ट्र म्हणजे राष्ट्रातील माणसं, आणि त्या भौगोलिक परिसरातील साधन संपत्ती असा माझा समज आहे. पण जर नागरिकांनाच जिवाचं भय असेल आणि रिसोर्सेस देखिल नाश पावत असतील तर हे सगळं कशासाठी?
>>>प्रत्येक पेटलेल्या
>>>प्रत्येक पेटलेल्या राष्ट्रात नक्की काय साध्य केलं जातंय?राष्ट्र म्हणजे राष्ट्रातील माणसं, आणि त्या भौगोलिक परिसरातील साधन संपत्ती असा माझा समज आहे. पण जर नागरिकांनाच जिवाचं भय असेल आणि रिसोर्सेस देखिल नाश पावत असतील तर हे सगळं कशासाठी?<<<
नेत्यांच्या अहंकाराची पूर्तता
थोडेसे तेल , शस्त्रास्त्र
थोडेसे तेल , शस्त्रास्त्र तयार करणाऱ्या कंपन्यांचा प्रचंड फायदा आणि नेत्यांचा अहंकार …
२६/११ चा मुख्य सूत्रधार हफीझ
२६/११ चा मुख्य सूत्रधार हफीझ सईद मेला म्हणे?
http://www.ibtimes.com/isis-pakistan-leader-killed-hafiz-muhammad-saeed-...
-गा.पै.
अफगाणिस्तानात जलालाबाद येथे
अफगाणिस्तानात जलालाबाद येथे एका बॅंकेच्या बाहेर आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यात त्या बॅंकेबाहेर पगारासाठी लाईन लावून उभे असलेले ३३ लोक ठार झाले आणि १०० च्या वर जखमी झाले. लोकांची पळापळ झाल्यावर अजून एका बॉम्बचा स्फोट झाला आणि नंतर तिसरा बॉम्ब निष्प्रभ केला गेला.
तालिबानने ह्या स्फोटाची जबाबदारी नाकारली आहे.
http://www.telegraph.co.uk/news/worldnews/asia/afghanistan/11547051/Jala...
केश्विनी, >> तालिबानने ह्या
केश्विनी,
>> तालिबानने ह्या स्फोटाची जबाबदारी नाकारली आहे.
कोणी केलाय स्फोट ते उघड झालेलं दिसंत नाहीये!
आ.न.,
-गा.पै.
मिळते काय असे निरर्थक
मिळते काय असे निरर्थक बॉम्बस्फोट घडवुन? जे निरपराधी अशा हल्ल्यात बळी जातात त्यान्च्या जाण्यातुन काय मिळवतात ह्या अतिरेकी सन्घटना?
भारतातही (विशेषत: मुम्बईत) असे अनेक साखळी स्फोट झाले आहे. निव्वळ प्रसिद्धी म्हणजे वृत्तपत्रात झळकत रहायचे, लोकान्ना सन्घटनेच्या अस्तित्वाची जाण करुन द्यायची या शिवाय अजुन काय साधतात?
उदय, >> मिळते काय असे निरर्थक
उदय,
>> मिळते काय असे निरर्थक बॉम्बस्फोट घडवुन? जे निरपराधी अशा हल्ल्यात बळी जातात त्यान्च्या जाण्यातुन काय
>> मिळवतात ह्या अतिरेकी सन्घटना?
औरंगजेब मरतांना पश्चात्तापाने उद्गारला की मी अनेक वाईट अपराध केले आहेत. अल्ला मला माफ करो. अशीच गत या अतिरेक्यांची होते शेवटी.
आ.न.,
-गा.पै.
इस्लामिक स्टेट अफगाणिस्तानात
इस्लामिक स्टेट अफगाणिस्तानात मुळं रोवायला बघतंय? प्रेसिडेंट अश्रफ घनी ह्यानी अफगाणी नागरिकांना एकजुटीने रहायचे व तालिबानला काबूलशी हातमिळवणी करायचे आवाहन केले आहे.
http://www.theglobeandmail.com/news/world/scores-dead-in-islamic-state-s...
-----
मी धाग्याच्या हेडरमध्ये म्हटल्याप्रमाणे... तालिबानची गणितं बदलत आहेत का? जास्त वरचढ असलेल्या इस्लामिक स्टेटपेक्षा तालिबान परवडतोय का काबूलला? दगडापेक्षा वीट मऊ?
इस्लामिक स्टेट अजून पुर्वेला सरकतंय का? भारतात त्यांचे छुपे उद्योग चालू असतील का? असतील तर त्याचे भयानक परिणाम दिसेपर्यंत आपण झोपलेले असू का?
Pages