Submitted by वैवकु रीटर्न्स on 26 March, 2015 - 13:31
आज आहे उभा मी जिथे ती मला वाखरी वाटते
जेथुनी चार कोसांवरी ती तुझी पंढरी लागते
का मला नीज येते अशी की जिला नीज मानू नये
का मला वाटते रात्रभर आत कोणीतरी जागते
ना कळे मी कशी नेमकी ओळ रचतो तुझ्यावर पुन्हा
आणि दुनिया तिच्याहीमधे एक कादंबरी वाचते
त्या तुझ्या खोल गर्तेमधे प्राण झोकून देताक्षणी
वेदनांचा अमल संपतो मन नवी पायरी गाठते
एक सिग्रेट प्यावी तशी आठवण ओढतो मी तुझी
आणि प्रत्येक श्वासातुनी एक जादूगरी वाहते
__________________________________________
अवांतर शेर :
राबते हात घेऊन तू काय करतोस रे विठ्ठला
बाप वारीत जातो तुझ्या माय माधूकरी मागते
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वेलकम ब्याक ! -गा.पै.
वेलकम ब्याक !
-गा.पै.
व्वा व्वा. गझल फार बढिया झाली
व्वा व्वा. गझल फार बढिया झाली आहे.
आवडली.
पंढरीचा शेर
पंढरीचा शेर सुरुवातीलाच---
व्वा
आवडली गझल
लय - सुंदर! गझल मस्त!
लय - सुंदर! गझल मस्त!
सिग्रेट आणि कादंबरी बेस्ट!!!!!
धन्यवाद!!!
-जयदीप
त्या तुझ्या खोल गर्तेमधे
त्या तुझ्या खोल गर्तेमधे प्राण झोकून देताक्षणी
वेदनांचा अंमल संपतो मन नवी पायरी गाठते......व्वाह
अंमल ऐवजी अमल असेही चालावे बहुधा...त्याने वृत्तभंगही टळेल.
गझल आवडली हे वे सां न ल
एक सिग्रेट प्यावी तशी आठवण
एक सिग्रेट प्यावी तशी आठवण ओढतो मी तुझी
आणि प्रत्येक श्वासातुनी एक जादूगरी वाहते<<<
व्वा व्वा
अंमलबाबत कैलासरावांशी सहमत!
संपूर्ण गझल आवडली.
जुलकाफिया गझल आहे ही! ह्यात दोन दोन काफिये आहेत.
संपूर्ण गझल आवडली एक सिग्रेट
संपूर्ण गझल आवडली
एक सिग्रेट प्यावी तशी आठवण ओढतो मी तुझी
आणि प्रत्येक श्वासातुनी एक जादूगरी वाहते
हा जास्त आवडला
गामाजी समीरजी अरविंदजी
गामाजी समीरजी अरविंदजी जयदीपराव डॉ.साहेब बेफीजी इंद्रजीत सर्वांचे अंतःकरणपूर्वक आभार
अंमल हा टायपो आहे बदल करत आहे सूचनेसाठी विशेष आभार डॉ . साहेब
जुलकाफिया गझल आहे ही! ह्यात दोन दोन काफिये आहेत.
<<<< आपल्या तीव्र निरीक्षणशक्तीचा मला कोण अभिमान वाटत आहे म्हणून सांगू !!
आणिक एक आवर्जून सांगण्यासारखी गम्मत म्हणजे, बरका बेफीजी ..ही गझल मुसल्सलही आहे ...सगळे शेर विठ्ठलावर आहेत !! 
(गम्मत केली बरका बेफीजी सॉरी !!मुसल्सल-विठ्ठल ... आहे हे मात्र सीरीयसली सांगीतले आहे )
सुंदरच, ताजीतवानी लय.
सुंदरच, ताजीतवानी लय.
धन्यवाद भारतीताई
धन्यवाद भारतीताई
सुंदर... सगळे शेर मस्त !!
सुंदर... सगळे शेर मस्त !!
राबते हात घेऊन तू काय करतोस
राबते हात घेऊन तू काय करतोस रे विठ्ठला
बाप वारीत जातो तुझ्या माय माधूकरी मागते.....
वाह वाह.....खुबसुरत....लय खुप सुंदर....आवडली खुप
शामजी आणि वाटपाडे साहेब खूप
शामजी आणि वाटपाडे साहेब खूप खूप धन्स