(डिस्क्लेमर: हे मनातले विचार आहेत आणि ते असंबद्ध, अतीरंजीत, चक्रम, अतार्किक,दुष्ट इ.इ वाटू शकतील.)
काम करता करता हेडफोन वर आवडती गाणी ऐकत होते. मनात भरपूर विचार चालू होते.आणि ऐकत असलेली गाणी कामाबद्दल लिहीलेली आहेत असं वाटायला लागलं.
"जपत किनारा शीड सोडणे ... नामंजूर.. अन वार्याची वाट पाहाणे नामंजूर..
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची..येईल त्या लाटेवर डुलणे.. नामंजूर .."
(बराय गाण्याचा नायक...साहेबाला रेफरल म्हणून सुचवायचा का? "तुम्ही गोष्टी ड्राईव्ह करा!! गोष्टी घडण्याची वाट पाहू नका..घडवून आणा" म्हणत असतो ना? हा गाण्यातला काल्पनीक प्राणी कसा छान गो- गेटर वाटतोय.)
"माझ्या हाती विनाश माझा कारण मी! मोहासाठी देह ठेवतो तारण मी ..
सुंदरतेवर होवो जगणे चक्काचूर..मज आब्रुचे थिटे बहाणे नामंजूर"
(अरे बापरे नको रे बाबा हा रेफर करायला..घोळाचं प्रकरण दिसतंय.. एचाव्ही बीचाय्व्ही होणार्या जागी जाण्याबद्दल बोलतोय की काय??)
कायतरी चक्रम सारखे विचार चालू.. गाणं बदल.
हरीहरन चं
"जब कभी बोलना वक्त पर बोलना.. मुद्दतो सोचना मुख्त्सर बोलना.."
(हे नक्कीच आमच्या साहेबाने लिहीलंय. टारगेट डेट कमिट करताना नेहमी सांगत असतो त्याऐवजी एक गाणं प्ले करणार असेल यावेळी.)
"चलना है तो कुछ दूर तक.. साथ चलके परख..
फिर मुझे हमसफर..ह्मसफर बोलना.."
(अच्छा म्हणजे "आधी आमच्या प्रॉडक्ट ची फ्री ट्रायल घेऊन मग पर्चेस आणि ए एम सी साईन करा" म्हणतोय ना?कसला प्रामाणिक सेल्स वाला आहे राव! )
गाणं बदल..
"खुद को पढता हूं, छोड देता हूं..
एक परत रोज मोड देता हूं.."
(छ्या! खूप धरसोड वृत्तीचा प्राणी आहे. याला नको घ्यायला टिम मध्ये. )
"इस कदर जख्म है निगाहों मे.. रोज एक आईना तोड देता हूं.."
(झालं म्हणजे डिप्रेशन वाला गडी दिसतोय. आणि खर्चिक पण.)
परत संदिप सलील.
"नसतेस घरी तू जेव्हा.. जीव तुटका तुटका होतो
जगण्याचे विरती धागे.. संसार फाटका होतो"
"ना झालो अजूनि मोठा.. ना स्वतंत्र अजूनि झालो"
(मला कळत का नाहीये ? गाणं आईबद्दल आहे का बायको बद्दल? या स्वतंत्र वाल्या ओळी काढल्या तर पूर्ण गाणं बायकोला ऐकवून खूष करता येईल आणि या ओळी टाकून बायको घरी नसताना आईला.हुशार आहे माणूस .याला म्हणतात रियुसेबिलिटी. छोट्या डेव्हलपर बारक्यांना कोड युजेबिलिटी चे एक्झांपल म्हणून ऐकवायला पाहिजे.)
गाणं बदल
"मी मोर्च नेला नाही, मी संपही केला नाही..
मी निषेध सुद्धा साधा, कधी नोंदवलेला नाही"
(फारच नॉन अॅसर्टिव्ह पाणी आहे.)
"भवताली संगर चाले तो विस्फारून बघताना
कुणी पोटातून चिडताना कुणी रक्ताळून लढताना
मी दगड होऊनि थिजलो रस्त्याच्या बाजूस जेव्हा
तो मारायाला देखिल मज कुणी उचलले नाही"
(तसा बरा वाटतोय.. आपल्याला त्या चिडक्या परदेश्याशी रोज डील करायला असाच थंड माणूस पाहिजेय ना? हा उगीच अप्रेझलला भांडत पण बसणार नाही.)
मुद्दतो सोचना मुख्त्सर बोलना
मुद्दतो सोचना मुख्त्सर बोलना
ही गाण्याचे असे अर्थ
ही गाण्याचे असे अर्थ काढण्याची आयडिया आवडली! लेख सार्वजनिक करणार का? म्हणजे सगळ्यांना वाचता येईल!
मी_अनु... मस्त लिहीलंय. आता
मी_अनु... मस्त लिहीलंय. आता हे वाचून नकळत माझाही असा अर्थ काढण्याचा उद्योग चालू झाला
मी_अनु... मस्त लिहीलंय. आता
मी_अनु... मस्त लिहीलंय. आता हे वाचून नकळत माझाही असा अर्थ काढण्याचा उद्योग चालू झाला फिदीफिदी <<< होना
bhari
bhari
"जब कभी बोलना वक्त पर बोलना..
"जब कभी बोलना वक्त पर बोलना.. मुद्दतो सोचना मुख्त्सर बोलना"
Estimation meeting मध्ये चिकटवायला ही line चांगलीय!
मजेशीर लिहिलंय,
मजेशीर लिहिलंय,
रच्याक,
संदीप खरे प्राण्यात पेंडुलम पर्सनॅलिटी जाणवते
कधी एकदम "जपत किनारा शिड सोडणे नामंजूर"
तर कधी दुसरे टोक " मी मनात सुद्धा माझ्या कधी दंगा केला नाही"
जबरदस्त ... हा सेंस ऑफ ह्युमर
जबरदस्त ... हा सेंस ऑफ ह्युमर फक्त तुमच्याकडेच असू शकतो...
छान लिहिलंय अनु .
छान लिहिलंय अनु .
माझा फेव्हरेट: जेव्हा documents खरडायची असतात.
आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो चाकोरीचे खरडून कागद सहीस पाठवतो
माझं आवडतं गाणं दर 2 वर्षाने
माझं आवडतं गाणं दर 2 वर्षाने नोकरी स्विच करून कुठेतरी आवडतं काम मिळेल अशी आशा धरणाऱ्या लोकांसाठी
नादान परिंदे घर आजा..क्यो देश विदेश फिरे मारा क्यो हाल बेहाल थका हारा
इमॅजिन करा:
इमॅजिन करा:
Interviewee: (मनातल्या मनात)
तु होगा ज़रा पागल तूने मुझको है चुना
कैसे तूने अनकहा, तूने अनकहा सब सुना
Interviewer: (मनातल्या मनातच)
के तेरी झूठी बातें मैं सारी मान लूँ
आँखों से तेरे सच सभी, सब कुछ अभी जान लूँ
मस्त. त्यात "... तूने मुझको
मस्त. त्यात "... तूने मुझको है चुना (लगाया - हे मनातल्या मनातल्या मनात)" ही अॅडिशन!