"आदित्य..., ऐ आदित्य, आदित्या....."
"काय आहे ग" laptop वरून लक्ष न हटवता आदित्य बोलला.
नेहा खूप आनंदात स्व:त बनवलेला एक नवा पदाथ घऊन आली होती. आदित्यला प्रेमाने भरवण्यासाठी. पण आदित्यच नीट लक्षच नव्हता. नेहा हिरमुसली.
आदित्य एक software engineer होता. नामांकित कंपनी मध्ये चांगल्या हुद्द्या वर काम करत असलेला. आदित्य नेहा ला वेळ च देऊ शकत नव्हता. घरी सुद्धा तो ऑफिस ची काम करत बसलेला असायचा. नेहाशी त्याच एक वर्षापूवी लग्न झाल होत. पण आजून हि ते दोघे एकमेकांना अपरिचितच होते आणि औपचारिक बोलायचे. आदित्य दिवसभर स्व:ताच्या कामा मध्ये व्यस्त असायचा.
त्या दिवशी नेहा ला अशीच अचानक चक्कर आली. त्याने तिला डॉक्टर कडे नेलं, आदित्यची मावशीच डॉक्टर होती. रिपोर्ट आले तेव्हा त्याला समजलं नेहाला कॅन्सर आहे. जणू त्याचा पायाखालची जमीनच सरकली. मावशी ने त्याला धीर दिला आणि नेहाच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यास सांगितल्या आणि ही गोष्ट तिला समजू देऊ नकोस हे बजावून सांगितले. नेहा च्या सर्व इच्छा पूर्ण करायचा असा त्याने ठरवलं.
आदित्य ने नेहा ला जास्त काम केल्याने चक्कर आली अस सांगितलं तसं हि मध्ये दोन चार दिवस त्यांची कामवाली बाई आली नव्हती. आणि तिच्या इच्छा जाणून घेण्याचा हेतू ने बोलला -
"म्याडम, गेली चार दिवस आपण आपल्या घरी एवडी काम केली कि आपण आजारी पडलात, तर आता बोला कि मी आपली कशी सेवा करू? ........ काय हवं आहे तुला माझ्या कडून"
"मला काहीच नको... आपल्याच घरासाठी तर करतो ना"
"... बक्षीस म्हणून... भरपूर काम केल्याचं"
"हे काय... काहीतरीच"
"बोल न ग, माझ्या साठी, मला बरं वाटेल, मी तुला तुझ्या आवडीचा काही दिला तर"
'मला जे हवं आहे ते तर तुम्ही मला कधीच देत नाही', नेहा पुटपुटली. तरी आदित्य ला ऐकू गेलंच.
"मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करीन, अगदी सर्व, बोल तर तू"
आज आदित्य पहिल्यांदा नेहाशी एवडं मनापासून बोलत होता नाहीतर एरवी ती बोलायची आणि तो हो किवा नाही मध्ये च उत्तर दायाचा. नेहा ला फार मस्त वाटलं.
तिने त्याचा वेळ मागितला. तिला फक्त हवा होता त्याच्या सोबत एकत्र वेळ घालवणं. आदित्यला वाटलं होता ही ची इच्छा एखादा दागिना वैगरे असेल. पण खरचं एक वर्ष जाऊन हि तो तिला ओळखत नव्हता. त्याला कधी कळलंच नाही कि नेहा ला दागिन्याचा सोस नाही फक्त हव आहे त्याचा प्रेम.
दुसऱ्यादिवशी सकाळी दहा वाजता डॉक्टर कडे जायचा होत. नेहा साठी त्याने खास सुट्ट्या काढल्या. डॉक्टर कडे जाण्याआधी आदित्य तिला चौपाटी वर घेऊन गेला. पहिल्यांदा दोघे हातात हात घालून समुद्र किनार्यावर फिरत होते. नेहा खूप खुश झाली. दोघे एकत्रच फिरत होते. फक्त दोघे. त्यात त्या मध्ये त्याच काम न्हवतं. नेहा तर आकाशातच जाऊन पोहोचली. सकाळ ची शुद्ध हवा होती, पक्षी नुकतेच उठून किलबिल करत होते, पायाखाली मवूशीर वाळू आणि त्यांना होणार लाटांचा स्पर्ष. आज तो पहिल्यांदा नेहा ला एवडं खुश न जवळून बघत होता.आज पहिला त्याने तिचा अवखळपणा, तिच्या गालावर पडणारी खळी, तिचा तो बालीशपणा. आणि लग्न नंतर पहिल्यांदा जणू त्याचा बायकोच्या (Love At First Sight) प्रेमात पडला होता. संध्याकाळी सुद्या तो तिला बाहेर फिरायला घेऊन गेला. आणि रात्री कॅन्डेल लाईट डीनरसाठी. आणि त्याने जेव्ह्या नेहाला सांगितलं कि त्याने दोघांसाठी महाबळेश्वरची तिकीट बुक केली आहेत तेव्हा नेहा तर नाचायची बाकी होती. आठवडा भर त्याने ते दिवस फक्त नेहा साठी ठेवले. आणि ऑफिस चा कुठलाच काम केला नाही फक्त ती आणि हे तो सुद्ध्या फार मनापासून करत होता. तो हि प्रेमात पडला होता तिच्या. तो पूर्ण आठवडाभर दोघं जगले एकमेकांसाठी.
पण त्याला आता त्याचे प्रेम गवसले होते आणि तिच्या निरोपाची वेळ झाली होती. फार कठीण होते त्याच्या साठी. दिवसभर तिच्या सोबत आनंदी राहून मनातून तो फार तुटत होता. आपराधीपणाची भावना हि त्याला बोचत होती. महाबळेश्वर वरून आल्यावर नेहा स्वयंपाक घरात काही तरी करत होती, आदित्य बाहेर नेहा चा विचार करत बसला होता. आणि अचानक काही तरी पडण्य चा आवाज आला. आदित्य ने स्वयंपाक घरात धाव घेतली, नेहा पडली होती, तिच्या डोकातून रक्त येत होतं. ती बेशुद्ध झाली होती. आदित्य ने तिला डॉक्टर कडे नेलं.
आदित्य इस्पितळाच्या बाहेर बाकड्यावर बसून अश्रू ढळत होता. त्याची मावशी त्याचा जवळ आली. प्रेमाने त्याचा डोक्यावरून तिने हात फिरवला. आदित्य ढसाढसा रडू लागला, त्याने मावशी जवळ आपले दु:ख व्यक्त केले आणि कबुल केले कि, पहिले नेहा ची इच्छा असून त्याने तिला कधी वेळ दिला नाही आणि आता त्याला तो द्यायचा आहे तर नेहा कडे वेळ नाही. आदित्य फार तुटून गेला. नेहा समोर खुश राहण्याचा मुखवटा मावशी जवळ गळून गेला. आदित्य चे दु:ख पाहून मावशी फार कष्टी झाली. आणि म्हणाली,
"मला कल्पना होती तुमच्या आधी असलेल्या नात्याची,..... आता तू जेवढा दुखी आहेस तशी नेहा पण दुखी होती. तू तिला वेळ देऊ शकत नव्हता ..........आदित्य, आपण जे काही कमावतो ते आपल्या आनंद साठी चा ना. काम करणं गरजेच आहे, पण म्हणून आपण आपले जीवन हरवून बसून काम करणं कितपत योग्य आहे. यशस्वी बनण्यासाठी, काहीतरी हासील करण्यासाठी आपण जीव तोडून जरून काम कराव, पण म्हणून आपण आपले आनदांचे क्षण व्यर्थ घालू नये. कामासाठी आपण नसतो आपल्यासाठी काम असतं. देवाने हे सुंदर आयुष्य आपल्याला आनंदाने जगण्यासाठी दिले आहे. आनंदाने जगावे आणि दुसर्यांना च्या जीवनात पण आनंद द्यावा.......... माझा फक्त हाच हेतू होता कि........ तुम्ही दोघा आनंदाने जगाव. मला माफ कर आदित्य..... पण मी..... खोटं बोलली तुझ्याशी........ नेहा ला कॅन्सर नाहीये. तिला पहिल्यांदा नॉर्मल चक्कर आली होती, स्ट्रेस मुळे, तू तिला वेळ देत नाही त्या स्ट्रेस मुळे आणि नंतर हि चक्कर आली ती स्वयंपाक घरात पाण्यावरून तिचा पाय घसरला आणि ती टेबल वर आपटली म्हणून तिच्या डोक्यातून रक्त आलं खरतर काळजी करण्यासारखा सुद्धा काहीच नाही. ती ठीक आहे."
हे ऐकून आदित्यला खूप आनंद झाला त्याच्या डोळ्यातून अश्रुचा पूर वाहू लागला. त्याला मावशी चा मुळीच राग आला नाही. तो खूप आनंदाला. कारण हि तसच होत एक तर नेहा त्याला सोडून कुठे चा जाणार नव्हती, आणि मावशी वर राग येण्याचा प्रश्नच न्हवता. मावशी ने अस केल नसते तर आज हि तो आणि नेहा एकमेकांना उपरे च असते. त्याने मावशी चे खुप खूप आभार मानले.
मावशी ने त्याला सांगितले, "नात्या मध्ये नेहमी असच होतं, काही अनपेक्षित घटना घडली कि ते नात जास्त खुलत. जोडीदाराला हवी असते फक्त साथ. या धकाधकी च्या जीवनात आपण खूप काही गोष्टी मिस करतो. आपलं प्रेम आपल्या जवळ चा असत पण आपल्याला ते बघण्यची गरज असते."
सुरेख . कथा आवडली.
सुरेख . कथा आवडली.
खुप आवडली खरच खुप खुप आवडली
खुप आवडली
खरच खुप खुप आवडली
खुप छान.
खुप छान.
धन्यवाद
धन्यवाद
आवडली....
आवडली....
मस्त!
मस्त!
सहिच
सहिच