Submitted by करकोचा on 7 March, 2015 - 09:45
कुणी वचने विसरला अन् कुणी चळला
तिच्या रूपात जेव्हा मोह अवतरला
तिची वर्दी मला देताच डोळ्यांनी
फुलांचा गालिचा हृदयात अंथरला
इथे नाचीत तालावर तिच्या सारे
तिथे दरबार इंद्राचा सुना पडला
जसे घोंघावते वारे उरी भरले
तसा पदराबरोबर तोल ढासळला
स्वत:वर ठेवता आला न मज ताबा
तिचाही पाय थोडा वाकडा पडला
दिवे मिष्किल उजळले नेमक्या वेळी
तिने अंगावरी संकोच पांघरला
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>जसे घोंघावते वारे उरी
>>जसे घोंघावते वारे उरी भरले
तसा पदराबरोबर तोल ढासळला
स्वत:वर ठेवता आला न मज ताबा
तिचाही पाय थोडा वाकडा पडला
दिवे मिष्किल उजळले नेमक्या वेळी
तिने अंगावरी संकोच पांघरला<<<
चांगले शेर!
तिची वर्दी मला देताच
तिची वर्दी मला देताच डोळ्यांनी
फुलांचा गालिचा हृदयात अंथरला>>>>> हे मस्तच आहे!
वाकडा पाय ---मस्त
वाकडा पाय ---मस्त
>>>वाकडा पाय ---मस्त<<<
>>>वाकडा पाय ---मस्त<<<
सर्व शेर आवडले अनेक दिवसांनी
सर्व शेर आवडले अनेक दिवसांनी आपण एक गझल दिलीत ह्याचा सर्वाधिक आनंद झाला
धन्यवाद
पाय वाकडा ---मस्त <<<