कालच्या बातम्यात महाराष्ट्रात गोवंश हत्येला बंदी घालण्याच्या विधेयकाला राष्ट्रपती महोदयांनी मंजुरी देऊन आता महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी लागु होईल.
हा कायदा महाराष्ट्रात युती शासन ( भाजप - शिवसेना १९९५ -१९९९ ) काळात पास झाला होता आणि राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी गेला होता. दरम्यान च्या काळात युतीचे शासन जाऊन काँग्रेस- राष्ट्रवादीचे शासन १५ वर्षे सत्तेवर होते.
हा कायदा आमलात येण्यापुर्वी मा. राष्ट्रपती महोदयांनी सांगीतलेल्या काही तांत्रीक बाबीची पुर्तता करण्यास काँग्रेस- राष्ट्रवादीचे शासन धजावले नाही. याचा संबंध मुस्लीम समाजाच्या मताशी असल्याचा काँग्रेस- राष्ट्रवादीचा समज असल्याने त्यांनी चालढकल केली. ह्या उलट २०१४ च्या विधानसभेच्या आधी मुंबईत गोवंश हत्येला परवाना देऊन एकप्रकारे आपले धोरण तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अधोरेखीत केले.
आता महायुतीचे शासन आल्यावर त्यांनी पाठपुरावा करुन हा कायदा अस्तित्वात आणला ह्या बाबत त्यांचे अभिनंदन.
काही मायबोलीकर महाभाग लगेच आता गाय ही उपयुक्त पशु आहे असे स्वा. सावरकरांचे शब्द आठवुन याला वेगळेच वळण देण्याचा प्रयत्न करतील.
ह्या लेखाचा उद्देशही तोच आहे. भाकड झालेला गोवंश शेणखताच्या निर्मीतीसाठी सुध्दा उपयुक्त असतो. या दृष्टीने शेतकरी जर या कडे पाहील तर रासायनीक खते त्याचे दुष्परीणाम , त्याची किंमत आणि उपलब्ध होण्यासाठी करावी लागणारी याता यात पहाता शेणखत कितीतरी चांगला पर्याय निसर्गाने निर्माण केल्याचे लक्षात येईल.
दुसर्या बाजुला मुस्लीम धर्मग्रंथात गोवंश मारुन खावा असे कुठेही लिहलेले नसताना मुस्लीम शासकांनी गोहत्येचा उपयोग त्यांनी भिती निर्माण करणे आणि सैन्याच्या पोटापाण्याची व्यवस्था लावण्यासाठी केला.
आता त्याची री ओढुन कसाई गोवंश खरेदी करुन हत्येसाठी शहरात आणतात. याला परवानगी देणे म्हणजे ग्रामीण शेतीप्रधान अर्थव्यवस्थेला हानी पोचवण्याचे काम तकालीन सरकार करत होते.
यावर सातत्याचे भाजप- सेना सरकारने पाठपुरावा करुन हा कायदा आमलात आणुन चांगले काम केलेल आहे. जर शासन दुष्काळात चारा छावणीसारखे प्रयोग करेल तर कोण शेतकरी ही गोवंश विकायला पुढे येईल ?
इंधनाच्या सर्वोच्चस्तराला
इंधनाच्या सर्वोच्चस्तराला भिडलेल्या किंमती आणि कामधेनू गौ विज्ञान प्रचार प्रसार परीक्षांची बातमी एकाच वेळी वाचली आणि माझ्या बुद्धिमांद्य चढलेल्या डोक्यात सुपीक कल्पना आली( कारण आज मी गायीचे दुध घेतले होते सकाळी) जसे की आता गाई ही सर्व समस्यांवरील रामबाण उपाय आहे हे सिद्ध झाले आहे तर आपण इंधनाची समस्या सुद्धा थोड्या प्रयत्नाने सोडवू शकतो. गोमुत्राचा पेट्रोल-डिझेल साठी आणि पंचगव्याचा इंजिनऑइल साठी उपयोग केला तर इंधनावरील खर्च वाचून भारत लवकरच महासत्ता बनू शकतो. यासाठी स्वतंत्र देशी इंजिन बनवावे लागतील ज्यासाठी अर्थातच मुकेशशेट-अडाणीशेट सढळ हस्ताने मदत करतील. इसरोने लक्ष घातल्यास ह्याचा अंतराळ कार्यक्रमात आणि डीआरडिओने लक्ष घातल्यास क्षेपणास्त्र कार्यक्रमात नक्कीच उपयोग होईल. अजूनही गोजन्य औषधे मार्केट मध्ये जास्त दिसत नाहीत तरी रामदेवबाबाजींनी त्यात लक्ष द्यावे. विदेशी शक्ती आणि बहुराष्ट्रीय कम्पन्या ह्यात खोडा घालतीलच पण आपण सर्व त्यांचा डाव हाणून पाडू या. मोदीजींनी ज्याप्रमाणे पवनचक्कीतून शक करून पाणी समस्या सोडवली तसेच ह्यावरही काम व्हायलाच हवे. चला सर्वानी ह्या स्पर्धेत सहभागी होऊया. जय मोदीजी, जय गोमाता, जय हिंदुराष्ट्र !
जयतु हिंदु राष्ट्रम्
जयतु हिंदु राष्ट्रम्
जिद्दु
जिद्दु![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
'राष्ट्रीय विदुषकाला' फॉलो
'राष्ट्रीय विदुषकाला' फॉलो करणार्यांकडून अश्याच प्रतिसादाची अपेक्षा होती.
![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
शिंगाला दिवटी बांधून
शिंगाला दिवटी बांधून पाकिस्तानवर हल्ला करता येईल
कात्रज ते माहिष्मती , सर्वत्र यशस्वी झालेली युक्ती आहे
......आणि ढगाळ वातावरण असेल
......आणि ढगाळ वातावरण असेल तर अजून उत्तम, पाकिस्तानी रडारांना चकवता येईल.
शिवाय शाखेतले वरणभात खाऊन
शिवाय शाखेतले वरणभात खाऊन टप्पोरे मांसल गुलाबी दंड अन पोटर्या असलेले अन लाठी-काठ्या हाती घेतलेले स्वयंसैन्य राखीव आहेच..!
बीफ खाणाऱ्यांचा तिटकारा
बीफ खाणाऱ्यांचा तिटकारा करण्याची फ्याशन कधीपासून सुरु झाली ? रामायणात तर बीफ खाण्याचे भरपूर उल्लेख आहेत असं वाचून आहे.
अवांतर - बुद्धिमांद्य म्हणजे
अवांतर - बुद्धिमांद्य म्हणजे नक्की काय हे पाहायला गुगलले असता खडीवाले वैद्यांचा “कष्टकऱ्यांकरिता आयुर्वेद” हा लोकसत्तेतला लेख सापडला. चांगला आहे सर्वांसाठी वाचायला
https://www.loksatta.com/aushadhvinaupchar-news/ayurved-8-1161544
गोहत्येबाबत विवेकानंद अधिक
गोहत्येबाबत विवेकानंद अधिक दाहकपणे सांगतात. बेलूर मठात विवेकानंदांना भेटावयास काही गोभक्त आले होते. भाकड गाईंसाठी ते पांजरपोळ चालवत होते. त्यांनी खूप पैसे या कार्यासाठी जमवले होते. विवेकानंद त्यांना म्हणाले, ‘आता गाईंना विसरा! आज मध्य प्रदेशात माणसे भुकेने तडफडून मरताहेत. ते सर्व पैसे तिकडे पाठवा.’ त्यावर ते सनातनी हिंदू विवेकानंदांना म्हणाले, ‘स्वामी, तुम्ही सांगता ते चुकीचे आहे. आमचे धर्मग्रंथ सांगताहेत की, ती माणसे भुकेने तडफडून मरताहेत, कारण त्यांनी गेल्या जन्मात पाप केले होते. आपण त्यांचा विचार करावयाचे काही कारण नाही.’ अस्वस्थ विवेकानंद त्यांना म्हणाले, ‘ही रचना फारच सोपी आहे. मग आता त्या गाईंनाही विसरा! त्यांनीही गेल्या जन्मात पाप केलेले असणार!’ यावर ते गोभक्त म्हणाले, ‘स्वामी, तुम्ही म्हणताय ते खरे! पण आपले धर्मग्रंथ सांगतात, की गाय ही आपली आई आहे. आणि आई कितीही वाईट असली तरी आपण तिचे रक्षण करावयास हवे.’ विवेकानंदातील खटय़ाळ मुलगा आता जागा झाला होता. त्यांनी त्या गोभक्तांना नमस्कार केला. म्हणाले, ‘आता निघा! तुमचे आई-वडील आज मला समजले.’ मात्र अस्वस्थ झालेल्या विवेकानंदांनी खिल्ली उडवून हा प्रश्न सोडलेला नाही. मालमदुरा येथे भाषण देताना त्यांनी सांगितले, ‘या देशात एक काळ असा होता, की गोमांस भक्षण केल्याशिवाय ब्राह्मण हा ब्राह्मण होऊ शकत नव्हता. आणि आपल्या वेदात तर सांगितलंय, की राजा किंवा फार मोठा ब्राह्मण घरी आला तर गाय-बैल कापून त्यांच्या रूचकर मांसाचे जेवण त्याला द्या. मात्र, हा देश शेतीप्रधान आहे. गोवंश वाढला पाहिजे म्हणून आपण ही धर्माज्ञा बदलली. आज परिस्थिती बदलली असेल तर आपण पुन्हा त्यात बदल करावयास हवा.’
https://www.loksatta.com/vishesh-news/second-article-on-the-occasion-of-...
भोपाळ: कत्तलीसाठी गोवंशांची
भोपाळ: कत्तलीसाठी गोवंशांची तस्करी करणाऱ्या एका रॅकेटचा मध्य प्रदेश पोलिसांनी पदार्फाश केला आहे. मध्य प्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यात पोलिसांनी कारवाई करत १० जणांना अटक केली आहे. गोवंशांना कत्तलीसाठी नागपूरच्या जिल्ह्यात नेलं जात असताना पोलिसांनी ही कारवाई केली. भारतीय जनता युवा मोर्चाचा सचिव गोतस्करी करणाऱ्या रॅकेटचा म्होरक्या असल्याची प्राथमिक माहिती तपासातून समोर आली आहे. इंडियन एक्सप्रेसनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
https://m.lokmat.com/national/madhya-pradesh-cops-cattle-smuggling-racke...
MP के सरकारी दफ्तर अब गौमूत्र
MP के सरकारी दफ्तर अब गौमूत्र से बने फिनायल से होंगे साफ - https://youtu.be/1blGqrGTOHk
सामान्य जनता ** साफ करायला फिनेल वापरतात पण इथे फिनेल बनवायलाच **वापरणार म्हणतायेत. काय काय बघावे लागणार अजून भविष्यात गोमाताच जाणो.
च्यवनप्राश तयार करताना पण
च्यवनप्राश तयार करताना पण गोमेय टाकून रटरटुन शिजवलेले असते म्हणे.. आता ते नक्की गाईने टाकलेले मेय आहे की अजुन कुणी हे बघायला सुपरवायझर नेमलेला असतो का ते माहीत नै..!!
>>> MP के सरकारी दफ्तर अब
>>> MP के सरकारी दफ्तर अब गौमूत्र से बने फिनायल से होंगे साफ -
तुम्हाला गोनाइल हे प्रॉडक्ट माहित नाहीये का? गेले ५ - ६ वर्ष आमच्या आजूबाजूचे हेच वापरतात फरशी पुसायला, उत्तम आहे. स्वस्त आहे .
नाही, आम्ही संघी एरियात रहात नाही.
Gonyle Floor Cleaner असं गूगल करा
कोणत्याही प्राण्याच्या
कोणत्याही प्राण्याच्या मूत्राचा साफसफाईसाठी उपयोग कसा केला जाऊ शकतो अनलेस तो एलिएन वगैरे असेल तर. तसे काही असते तर आतापर्यंत आपल्या पूर्वजांनी तसे काही लिहून ठेवलेच असते अथवा ग्रामीण भागात लोकांनी गोठे गाई निरोगी राहाव्या म्हणून फिनेल न वापरतात त्याच गायांच्या मलमूत्राने साफ केले असते. नेटवर जो फोटो दिसतोय त्यावरूनएक लिटर गोणाईलमध्ये ६०० मिली गोमुत्र, ३५० मिली पाणी फक्त ५०मिली लेमन ग्रास, निलगिरीतेल,पाईन तेल आणि अन्य जडीबुटी लिहिले आहे. तुम्ही गोमुत्र कधी वापरता का नाही माहित नाही पण फार भयानक दर्प असतो त्याला आणि एवढ्या ६००मिली गोमूत्रात फक्त ५०मिली मसाला टाकून तो भयानक वास जात असेल असे वाटत नाही पण प्रोडक्ट तर अजिबात वास मारत नाही आणि एवढे लोक वापरतात म्हणजेच त्यात कुत्रिम सुगंध आणि इतर साफसफाईची केमिकल्स मिसळलेले असणार.यात कुठेही प्रिजर्वेटिव्हस चा उल्लेख नाही म्हणजे म्हणजे यांचे गोमूत्र एवढे भारी आहे की ते डिकंपोज होत नाही बहुतेक. तुम्ही ग्लासभर गोमूत्र घरात ठेवा महिनाभर आणि पहा नंतर उघडून काय होतंय ते. आणि हे अन्य जडीबुटी काय प्रकार आहे. कोणत्याही कमर्शिअल प्रोडक्टला असे अलौड असते का अमुकतमुक लिहायला लेबलवर. जे काय असेल ते स्पष्ट लिहावे लागते ना ? पतंजलीला सूट असेलच म्हणा या नियमांतून. खाली गोणाईल आणि लायझॉलचे फोटो टाकलेत काय फरक असतो कमर्शिअल आणि छपरी प्रोडक्टमधे ते दाखवायला -
![61-Pq-VKu1qd-L-SL1000](https://i.ibb.co/z8dRNDM/61-Pq-VKu1qd-L-SL1000.jpg)
![photo-2020-01-21-10-35-32](https://i.ibb.co/vmN8Zpv/photo-2020-01-21-10-35-32.jpg)
गोणाईलने फरशा साफ होतात कारण त्यात केमिकल्स आहेत नाकी गोमुत्र. ही त्या भोंदूबाबाने आपले दुकान चालवण्यासाठी काढलेली शक्कल आहे बाकी काही नाही. आणि हे होली काउ काय प्रकार आहे ? मग अनहोली काऊ कशी असते ? त्याचे गोणाईल विकत घेउस्तर आठवडी बाजारात तो माणूस असतो बसलेला बाटल्यात ऍसिड घेऊन विकायला त्याच्याकडून स्वस्तात जादा माल मिळेल.
नाही, आम्ही संघी एरियात रहात
नाही, आम्ही संघी एरियात रहात नाही. >>> हे लिहायचे प्रयोजन उमजले नाही. माझ्या पोस्टमध्ये मी काहीही तसे लिहिलेले नाहीये. आणि संघी एरिया काय प्रकार आहे ? की गाईवर फक्त संघाचीच मक्तेदारी आहे असे म्हणायचे आहे का ? सांभाळणारे तर ते सोडून दुसरेच असतात की . असो
(No subject)
(No subject)
तुमचा आणि इतरांचा संघी संघी
तुमचा आणि इतरांचा संघी संघी लिहायचा वेळ वाचावा म्हणून.
मला chemical composition, ingredients माहित आहेत. मी वर 'केमिकल फ्री आहे' असं लिहिलेलं नाही. Cleaner म्हणून अतिशय उत्तम आहे, उग्र वास नाही आणि स्वत आहे.
आम्ही वापरतो, बरेच आजूबाजूचे वापरतात. मप्र सरकारनं ठेवलेलं काही क्रांतीकारी नाही...this is in use since long ..इतकच
शेणाने सारवलेल्या भुईवर
शेणाने सारवलेल्या भुईवर रहाणार्या माणसाने जर ह्या गाईच्या मुताचा सोस करणार्यांच्या प्रतिक्रिया वाचल्या तर ह्या माठ जीवांना रोज गोठ्यात शेणघाण करायला लावावी असं वाटू शकतं.
मी वर 'केमिकल फ्री आहे' असं
मी वर 'केमिकल फ्री आहे' असं लिहिलेलं नाही >>>
खालच्या बातमीत गोणाईलच्या जाहिराती दिल्यात त्यात तो भोंदु स्पष्ट सांगतोय केमिकल नाहीये आणि त्याच्या बाटलीवर तसा उल्लेखही नाही त्याबद्दल काय मत आहे ? अशी फसवणूक मान्य आहे का ?
https://www.firstpost.com/living/spot-the-irony-patanjalis-new-product-g...
अजून एका धाग्यावर तो दुर्मिळ असणारे शिलाजीत रोज टनाने बनवत असतो याबद्दल लिहिले होते मी त्यावरही तुमची प्रतिक्रिया वाचायला आवडेल.
तुमचा आणि इतरांचा संघी संघी
तुमचा आणि इतरांचा संघी संघी लिहायचा वेळ वाचावा म्हणून. >> बऱ्याच महिन्यांपासून माझ्या एकाही पोस्टमध्ये संघाचा उल्लेख केलेला नाहीये मी कुठे कारण मला वाद घालण्यात शून्य इंटरेस्ट आहे. मी इथे विरंगुळा म्हणून येतो झोंब्या खेळायला नाही. तरीही संघी एरिया, संघीसंघी लिहिण्याची संधी हे उल्लेख पाहता आता म्याटर लक्षात आला. गोणाईलला विरोध म्हणजे संघाला विरोध म्हणजे भाजपला विरोध म्हणजे देशविरोधी, देशद्रोही, गुलाम वगैरे असा फंडा आहे काय ? तरीच मागे एकाने माझ्यासारख्या देशविरोधी आयडीवर कारवाई करावी अशी प्रशासकांना विनंती केली होती. तसे काही असेल तर प्रशासकांनी स्पष्ट करावे म्हणजे मी रोज इथे येऊन कीबोर्ड बडवायचे थांबवतो.
तुम्हाला काय समजायचं ते समजा.
तुम्हाला काय समजायचं ते समजा. तुम्ही विरंगुळा म्हणून येता की कसे मला काय करायचंय. मी तुम्हाला काहीही म्हटलं नाही . मी माझ्या एरियाबद्दल लिहिलंय त्यावर तुमचा त्रागा ..उगाचच.
इथे डीएनए, जिन्स, रक्त, पिठमागे, भिकारी असे मस्त शब्द प्रत्येक ओळीत वाचायची सवय आहे आणि ते डायरेक्ट उद्देशून म्हटलेले असतात...
जे वर लिहिलंय ते माझ्या शेजा-यांबद्दल आहे, ज्यांचा काही संबंध नाही इथे..त्यांचा इतक्या विशेषणाने सत्कार होऊ नये म्हणून लिहिलंय. ..
आणि सारवलेल्या जमिनी आमच्याही होत्या , अशा जमिनी, अंगण सुटलं आमचं, नाही आता ते आमच्याकडे , त्यामुळेही असेल कदाचित पण आम्हाला आवडतं गोनाइल
पतंजली ची बिस्किटे आणि नुडल्स सोडून सगळी प्रॉडक्ट आवडतात,
पतंजली ची बिस्किटे आणि नुडल्स
पतंजली ची बिस्किटे आणि नुडल्स
त्यात पण गोशेण असतं का???
माहित नाही, अतिशय वाईट
माहित नाही, अतिशय वाईट लागतात चवीला..
ब्रिटानिया / पार्ले ची
ब्रिटानिया / पार्ले ची बिस्किटं अन मॅगीची नुडल्स लहानपणापासून खात असल्याने तसं होत असावं..!
असेल कदाचित ..पण वा ई ट
असेल कदाचित ..पण वा ई ट म्ह्ण्जे वाईट लागतात. म्हणे ग्व्हाची असतात ( मैद्या ऐवजी)
मारी,पारले जी, मोनॅको, क्रॅक्जॅक.. हीच खरी बिस्कीटं
मॅगी मसाला इज द बेस्ट
गव्हाच्या पीठाचीही बिस्किट्स
गव्हाच्या पीठाचीही बिस्किट्स चवीला छान असतात. मॅक-व्हिटीज या ब्रिटनस्थित कंपनीची मॅक-व्हिटीज डायजेस्टिव नावाची गव्हाच्या पिठाची बिस्किट्स अन कुकीज डी-मार्ट मधे मिळतात. मला ती चवीला अतिशय टेस्टी वाटतात. डी-मार्टच्या फेरीत बरेच पॅक घेतो. लॉकडाऊन च्या काळात ही बिस्किट्स खूप मिस् केली.
कर्नाटक सरकार ने आता असा
कर्नाटक सरकार ने आता असा कायदा पास केला आहे. विधान परिषदेत बहुमत नसल्याने वटहुकुम काढून कायदा केला आहे. त्यात तर गोरक्षकांना कारावीपासून संरक्षण दिलेले आहे.
सदाशिव पेठेबाहेर न पडलेले चिन्मय तन्मय शेतकर्यांनी भाकड गाई शेणासाठी पाळाव्यात व सेंद्रिय शेती करावी असा सल्ला देताना बघून हसावे कि रडावे कळेना.
Pages