..
मूल्यशिक्षणाचा तास सुरू होता. ईयत्ता आठवीचा वर्ग!.. आज शिक्षक दिन असल्याने नेहमीपेक्षा प्रफुल्लित वातावरण होते. सारे काही शिस्तबद्ध आणि टापटीप. बाहेरून पाहुणे आले होते. पाहुणे कसले, शैक्षणिक अधिकारीच ते! मुलांशी गप्पा मारत त्यांची अभ्यासातील प्रगती जाणून घ्यायचा हेतू होता. पण आज त्यांनी थोडासा वेगळाच प्रकार करायचे ठरवले. शिक्षकांनी काय शिकवले यापेक्षा "मुले काय शिकली", हे जाणून घ्यायचे ठरवले. ते एक शब्द उच्चारणार आणि तो ऐकताच समोरील विद्यार्थ्याच्या मनात जो पहिला शब्द येईल तो त्याने पटकन सांगायचा. एक खेळच जणू....
"गणपतीबाप्पा..."
"मोरया !!" सारे एकस्वरात ओरडले.
खेळाचा श्रीगणेशा करत ते आता एकेका मुलाकडे जाऊ लागले.
"छत्रपती.."
"शिवाजी महाराज" ... अपेक्षित उत्तर आले. पाठोपाठ "छत्रपती शिवाजी महाराज की जय" चा पुकारा झाला. सरांनाही एक अभिमान वाटला. देवाच्या नावाने सुरुवात करत महाराष्ट्राच्या दैवताचे नाव. मुलांना आपण योग्य तेच शिक्षण देत आहोत याचा आनंद झाला.. आणि खेळ पुढे सुरू झाला.
"वातावरण..?"
... ऑक्सिजन
पर्यावरण?
.... झाडे
आकाशगंगा?
.... एलियन
पायथागोरस?
... प्रमेय .. अं.. काटकोन त्रिकोण!
पानिपत?
.... काका, मला वाचवा!!
अर्रेह.... छान छान..
कॉम्प्युटर?
... ईंटरनेट
....... फेसबूक
............ व्हॉटसप
बर्रं बरं ..
"राजा?"
... राणी
राजकुमार?
... दिलीपकुमार ..
मनोरंजन?
... चित्रपट
क्रिकेट?
... आयपीएल
राजकारण?
... ईलेक्शन!
भारतरत्न?
... तेंडुलकर
राष्ट्रीय?
... एकात्मता
सामुदायिक?
....."
"..."
सामुदायिक??
.....
... बलात्कार!
पुढचा मुलगा उत्तरला....
शेजारच्याने खीखी दात काढले. एकदोन मुली रडू लागल्या,
शिक्षकांना काय बोलावे सुचेनासे झाले.
आणि इतक्यात ......
ठण्ण ठण्ण ठण्ण,..
घंटा वाजली!, सारी मुले ताठ, शिस्तीत उभी राहिली..
‘सामुदायिक’ प्रार्थनेला सुरुवात झाली!....
निल्सन , मला ईतकच म्हणायच
निल्सन , मला ईतकच म्हणायच होतं की शिक्षकानी काहितरी शब्द मनात धरून सामुदायिक हा श्ब्द विचारला , तर त्याच चुकीच उत्तर आलं
तसच जर "सामुहिक " शब्द वापरला तर त्यासाठी त्यान्च्या मनात कोणता शब्द असावा याचा मी विचार करत होते .
मी वर म्हटल्याप्रमाणे , ही प्रतिक्षिप्त क्रिया आहे असे मानले तर सामुहिक आणि सामुदायिक या शब्दान्ची गल्लत होउन मुलाने चुकीच श्ब्द वापरला , असे समजू शकतो .
. आता लिखाणाचा स्तर खाली आणु
.
आता लिखाणाचा स्तर खाली आणु नकोस >> +१२३४५.....
अंतर्मुख करणारा छान लेख.
मला हे कळले नाही की ह्या
मला हे कळले नाही की ह्या खेळात शिक्षक "सामुदाईक" किंवा "सामुहिक" हे शब्द वापरतीलच कशाला?
ओढुन ताणुन आणल्या सारखे वाटतय.
टोचा यांच्याशी सहमत. <<
टोचा यांच्याशी सहमत.
<< ह्या खेळात शिक्षक "सामुदाईक" किंवा "सामुहिक" हे शब्द वापरतीलच कशाला?
ओढुन ताणुन आणल्या सारखे वाटतय. >>
मला नेमके हेच म्हणायचे होते.
कारण इतका नैसर्गिक रीत्या प्रतिक्षिप्त क्रियेसारखा तो शब्द सामुहिक नंतर मनात (अगदी आठवीच्या मुलांच्याही) येत असेल तर त्या शाळा तपासणीसांच्या मनात येणार नाही का? आणि मग ते सामुहिक / सामुदायिक हा शब्द या खेळात कशाला वापरतील?
म्हणूनच सामुहिक पेक्षा
म्हणूनच सामुहिक पेक्षा सामुदायिक बरोबर आहे .
सामुदायिक शिक्षण नावाचा एक विषय असल्याचं आठवतय
<< कारण त्यानंतर लगेच
<< कारण त्यानंतर लगेच सामुदायिक प्रार्थना होणार होती >>
तर मग उत्तरात देखील प्रार्थनाच शब्द येणे अपेक्षित. मुद्दामच वेगळे उत्तर देणारा विद्यार्थी व्रात्य असणार.
रून्मेष, लेख आवडला. वर अनेक
रून्मेष, लेख आवडला.
वर अनेक जणांनी इथुन पुढे सांगितल्याप्रमाणे सकस लेखन अपेक्षीत आहे तुमच्याकडुन.
पुलेशु...
चांगला लेख! विचारात पाडणारा.
चांगला लेख! विचारात पाडणारा.
म्हणूनच सामुहिक पेक्षा
म्हणूनच सामुहिक पेक्षा सामुदायिक बरोबर आहे.
सामुदायिक शिक्षण नावाचा एक विषय असल्याचं आठवतय.
>>>
प्लस सेव्हन एटी सिक्स.. सामुदायिक वरून मलाही लेखातील त्या शब्दाव्यतिरीक्त सामुदायिक प्रार्थना तसेच सामुदायिक शिक्षण हेच दोन शब्द सर्वप्रथम आठवले. आणि त्यातील सामुदायिक प्रार्थना मुद्दाम नंतरच्या वाक्यात नमूद करायचा हेतू निव्वळ पंच टाकणे नसून त्या शैक्षणिक अधिकार्यांना काय प्रकारचे अपेक्षित होते आणि काय ऊत्तर आले हे दाखवायचे होते.
प्रतिक्षिप्त क्रिया >>> येस्स! यावरून आठवलेला एक किस्सा सांगतो माझा शाळेतला.. (चेतनजी आपण नक्की वाचा.)
नववीत असतानाची गोष्ट, शारीरीक शिक्षणाच्या बाई उंच उडीची परीक्षा घेत होत्या. एकेक जण येऊन उडी मारत होता आणि बाई त्या उडीची उंची मोजत होत्या. त्यावेळी बाकीचे सारे विद्यार्थी प्रेक्षकाच्या भुमिकेत. थोड्यावेळाने मी या प्रकाराला बोअर झालो आणि तिथे लक्ष न देता आपला वेगळाच टाईमपास करू लागलो. थोड्यावेळाने गोंगाट झाला म्हणून मी चौकशी केली तर समजले की कोणीतरी भन्नाट उंच उडी मारली होती. तो आकडा ऐकून माझ्या तोंडून "अबब या अर्थाचा" एक अपशब्द प्रतिक्षिप्त क्रिया होत बाहेर पडला. प्रतिक्षिप्त क्रियाच, कारण त्या वयात माझ्या तोंडात शिव्या बसल्या होत्या पण त्या कुठे द्यायच्या किंबहुना कुठे द्यायच्या नाहीत याचे भान मला असायचे. पण इथे ते भान गंडले. गंमत म्हणजे तेव्हा इतरांची उत्सुकता ओसरून अचानक गोंगाट शांत झाल्याने माझ्या तोंडून तो शब्द या कोपर्यापासून त्या कोपर्यावरच्या मुलालाही स्पष्ट ऐकू जाईल इतपत मोठ्या आवाजात आला. जवळपास सर्वच मुलांनी दात काढले. (अगदी आजही त्या किस्श्याची हसून आठवण काढतात). बाईंनी तो शब्द नक्कीच ऐकला असावा पण तरी त्यांना यावर काय रिअॅक्ट करावे हे न सुचल्याने त्यांनी तो न ऐकल्यासारखे दाखवत "काय बोल्ला रे ऋन्मेष" अशी मुलांकडे विचारणा करू लागल्या. मुलांनी अर्थातच सांगितले नाही. आणि त्यांनीही जास्त ताणून चौकशी न करता मला वर्गाबाहेर उभे केले. माझी परीक्षाही सर्वात शेवटी घेतली.. घेतली हेच माझे नशीब! असो,!.. बाकी आमची मुलांची शाळा वेगळी असल्याने मुली आमच्या वर्गात नव्हत्या. त्यामुळे त्या कश्या रिअॅक्ट झाल्या असत्या हे सांगू शकत नाही. पण दहावीला क्लासमध्ये दोन मुलांचे शिवीगाळ करत छोटेसे भांडण झालेले तेव्हा दोनचार मुली घाबरून रडलेल्या आठवतेय. तर मॉरल ऑफ द स्टोरी अमुकतमुकच घडायला हवे होते, आणि असे घडल्यावर इतरांनी असेच रिअॅक्ट व्हायला हवे होते असे कोणीही ठामपणे नाही सांगू शकत. आपले अनुभव म्हणजेच जग नसते. अर्थात हे मलाही लागू आहेच. त्यामुळे आपल्या अनुभवाच्या जीवावर तर्काच्या कसोट्या लावत शंका उपस्थित करण्याऐवजी यातला आशय लक्षात घेऊन पुढे जाऊया ना. अर्थात तो ही सर्वांनाच पटला, रुचला पाहिजे असा आग्रह नाहीच, पण त्यावर चर्चा करणे जास्त संयुक्तिक राहील ना.
माझ्या आणि माझ्या लिखाणाच्या सर्वच हितचिंतकांचे मनापासून आभार
फक्त नुकताच डोक्यात एक मस्त आचरट विषय आलेला त्यावर काही लिहायची इच्छा होती ती तेवढी डळमळीत झाली
फक्त नुकताच डोक्यात एक मस्त
फक्त नुकताच डोक्यात एक मस्त आचरट विषय आलेला त्यावर काही लिहायची इच्छा होती ती तेवढी डळमळीत झाली डोळा मारा >> ऋन्मेऽऽष लिह रे तु, आवडते मला तुझे लेखन :स्मितः
निल्सन, हो नक्कीच. लिखाण
निल्सन, हो नक्कीच.
लिखाण स्वांतसुखाय असावे, जे मनात येईल ते लिहावे.
पण मायबोलीवर प्रकाशित करताना मात्र ते कोणाला आवडतेय का नाही हे बघूनच करावे.
आणि एकाला जरी आवडत असेल तरी नक्कीच करावे
मलाही आवडते तुमचे लेखन. फक्त
मलाही आवडते तुमचे लेखन. फक्त प्रत्येक लेखाला वेळेअभावी प्रतिसाद देता येत नाही. पण आवर्जून वाचते तुमचे लेख.
ऋऽऽन्मेष, माझ्याही मनात तोच
ऋऽऽन्मेष,
माझ्याही मनात तोच शब्द आला. शहरात हल्ली समूहाने करण्यासारख्या बऱ्याच कमी गोष्टी उरल्यात. जो तो आपापल्या विश्वात मग्न असतो. गावाकडचं माहीत नाही.
आ.न.,
-गा.पै.
चांगलं लिहिलंय.
चांगलं लिहिलंय.
मस्त.
मस्त.
धन्यवाद ! निधी, इथले मी
धन्यवाद !
निधी, इथले मी ऑलमोस्ट सारेच वाचतो.. (क्रमशः दिर्घकथा आणि पद्यसाहित्य वगळता)
पण प्रतिसाद वेळेअभावी, ऑफिसमध्ये असल्याकारणाने, वा मोबाईवर असल्यास मलाही देणे जमतेच असे नाही.. तर आपल्या या एका प्रतिसादातच सारे प्रतिसाद पोचले.
ऋ मानलं रे तुला मित्रा.
ऋ
मानलं रे तुला मित्रा.
मनाला सुन्न करणारी कथा...
मनाला सुन्न करणारी कथा...
लेख आवडला.
लेख आवडला.
लेख आवडला ऋन्मेष.. इट्स द
लेख आवडला ऋन्मेष.. इट्स द अगली ट्रुथ !!!
वा रुन्म्या
वा रुन्म्या
नव्याने आलेले प्रतिसाद
नव्याने आलेले प्रतिसाद धन्यवाद
एकदम सुन्न झाले.. तुमच अस
एकदम सुन्न झाले..
तुमच अस लिखाण पहिल्यांदाच वाचल.
हे हि आवडलं.
फेसबुक पेजवर शेअर करेन.. चालेल का?
मयुरी प्रतिसादाबद्दल
मयुरी प्रतिसादाबद्दल धन्यवाद..
आपल्याला इच्छा असेल तर कुठेही शेअर करा.. नो प्रॉब्लेम
Pages