मूल्यशिक्षण !

Submitted by ऋन्मेऽऽष on 2 March, 2015 - 13:38

..

मूल्यशिक्षणाचा तास सुरू होता. ईयत्ता आठवीचा वर्ग!.. आज शिक्षक दिन असल्याने नेहमीपेक्षा प्रफुल्लित वातावरण होते. सारे काही शिस्तबद्ध आणि टापटीप. बाहेरून पाहुणे आले होते. पाहुणे कसले, शैक्षणिक अधिकारीच ते! मुलांशी गप्पा मारत त्यांची अभ्यासातील प्रगती जाणून घ्यायचा हेतू होता. पण आज त्यांनी थोडासा वेगळाच प्रकार करायचे ठरवले. शिक्षकांनी काय शिकवले यापेक्षा "मुले काय शिकली", हे जाणून घ्यायचे ठरवले. ते एक शब्द उच्चारणार आणि तो ऐकताच समोरील विद्यार्थ्याच्या मनात जो पहिला शब्द येईल तो त्याने पटकन सांगायचा. एक खेळच जणू....

"गणपतीबाप्पा..."

"मोरया !!" सारे एकस्वरात ओरडले.

खेळाचा श्रीगणेशा करत ते आता एकेका मुलाकडे जाऊ लागले.

"छत्रपती.."

"शिवाजी महाराज" ... अपेक्षित उत्तर आले. पाठोपाठ "छत्रपती शिवाजी महाराज की जय" चा पुकारा झाला. सरांनाही एक अभिमान वाटला. देवाच्या नावाने सुरुवात करत महाराष्ट्राच्या दैवताचे नाव. मुलांना आपण योग्य तेच शिक्षण देत आहोत याचा आनंद झाला.. आणि खेळ पुढे सुरू झाला.

"वातावरण..?"
... ऑक्सिजन

पर्यावरण?
.... झाडे

आकाशगंगा?
.... एलियन

पायथागोरस?
... प्रमेय .. अं.. काटकोन त्रिकोण!

पानिपत?
.... काका, मला वाचवा!!
अर्रेह.... छान छान..

कॉम्प्युटर?
... ईंटरनेट
....... फेसबूक
............ व्हॉटसप
बर्रं बरं ..

"राजा?"
... राणी

राजकुमार?
... दिलीपकुमार ..

मनोरंजन?
... चित्रपट

क्रिकेट?
... आयपीएल

राजकारण?
... ईलेक्शन!

भारतरत्न?
... तेंडुलकर

राष्ट्रीय?
... एकात्मता

सामुदायिक?
....."

"..."

सामुदायिक??
.....

... बलात्कार!
पुढचा मुलगा उत्तरला....

शेजारच्याने खीखी दात काढले. एकदोन मुली रडू लागल्या,
शिक्षकांना काय बोलावे सुचेनासे झाले.

आणि इतक्यात ......

ठण्ण ठण्ण ठण्ण,..
घंटा वाजली!, सारी मुले ताठ, शिस्तीत उभी राहिली..

सामुदायिक प्रार्थनेला सुरुवात झाली!....

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋन्मेऽऽष, अंतर्मुख करायला लावणारी कथा.
(चांगली किंवा छान म्हणता येत नाहिये कारण खरच गंभीर विषय आहे आणि प्रसंग पटकन डोळ्यासमोर आला). उत्तम लिखाण मित्रा, पु ले शु.

स्स्स्स्स्स्स्स्स्स ! Sad

तुझी लिहिण्याची क्वालीटी जरा वधारत चालली आहे, असे वाटते. >>>> आशु + १००००००००

ऋ , उत्तरोत्तर चांगले धागे काढावेस , हीच शुभेच्छा आणि आता लिखाणाचा स्तर खाली आणु नकोस हा सज्जड दम !

उत्तम लिखाण. यावरील प्रतिसादांमध्ये देखिल उचित गांभिर्य असावं ही अपेक्षा.

ब्रेक लागला, थांबले, अडकले...सुन्न करणारा लेख आहे.. Sad
शब्द इतका कॉमन आहे का?
पाव म्हणल की भाजी, गणपति म्हणल की मोरया सारखा?
'शाळे' मधे जर ही कथा असेल तर मग का वाईट वाटुन घेता..त्या 'आईने' दार उघडेच ठेवायला सांगीतले तर?
हो वाटते मला भीती... आई असण्याची..त्यातुन.. जरा जास्तच 'मुलीची' आई असण्याची..
'हेच' जर 'मुल्य' असेल तर नको असले शिक्षण..
फ़िरुन परत म्हणावे लागेल बरे होते ते 'संस्कारीत अडाणीपण'

ऋन्मेऽऽष,
लेख पटला नाही तसेच आवडला देखील नाही. आठवीचे विद्यार्थी असे काही उत्तर देतील यावर विश्वास बसत नाही. या वयापर्यंत समज आलेली असते. त्यांना शब्दांचे अर्थ चांगलेच कळत असतात. बरीच मुले व्रात्य / वाईट आहेत / असतात. परंतु ती केवळ आपसात बोलतानाच असे अथवा याहून जास्त वाईट बोलतात आणि हे आजचे नाही पूर्वीपासूनचे आहे. शिक्षकांसमोर आणि त्याहूनही शाळा तपासणीसासमोर मात्र ती आपण साळसूद असल्याचाच आव आणतात. तसेच मुलींनी रडण्याचे कारण कळले नाही. आजकालच्या मुली रडणार नाहीत उलट अशा मुलांना शिक्षा व्हावी असा आग्रह नक्कीच धरतील.

<< शिक्षकांना काय बोलावे सुचेनासे झाले. >>

हेदेखील अशक्यच. उलट चांगलेच फोडून काढतील, कदाचित निलंबन देखील होऊ शकेल. निदान पालकांना बोलावुन त्यांच्या कानावर तरी टाकतील. असो.

mi_anu यांचा प्रतिसाद पटला. सामुहिक हाच शब्द त्या निषिद्ध कृतीच्या आधी वापरला जातो. सामुदायिक म्हंटले की सामुदायिक शिक्षण, सामुदायिक जीवन किंवा फार तर सामुदायिक विवाह हेच शब्द आठवतील. त्यातही सामुदायिक विवाह मुले सहसा लाजेखातर उच्चारणार नाहीत.

चेतनजी,
लेख पटला नाही तसेच आवडला देखील नाही. ,,,,,,, अशा मुलांना शिक्षा व्हावी असा आग्रह नक्कीच धरतील. >>>
लेख आवडला नाही तर ठिक आहे कारण प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. पण पटला नाही आणि त्यावर जे कारण दिलय ते मला पटलं नाही. आजकाल दर दुसर्या दिवशी पेपरमध्ये/बातम्यांमध्ये सामुहिक बलात्कार हा शब्द कानावर पडतो किंवा वाचला जातो. त्यामुळे जेव्हा असा खेळ "ऑटो आन्सर" जेव्हा खेळला गेला असेल तेव्हा मुलांच्या मनात सामुहिक या शब्दाला बलात्कार हा जोडशब्द पटकन क्लिक होणे हे साहजिकच आहे. ( ऋन्मेऽऽषने सामुदायिक हा शब्द वापरला असला तरी तिथे सामुहिक हाच शब्द योग्य आहे)

हेदेखील अशक्यच. उलट चांगलेच फोडून काढतील, कदाचित निलंबन देखील होऊ शकेल. निदान पालकांना बोलावुन त्यांच्या कानावर तरी टाकतील. असो. >>> यावरही असे म्हणेन की इथे ही हा लेख वाचल्यावर बरेच जण सुन्न झाले त्यामुळे शिक्षकांनाही काय बोलावे सुचेनासे झाले असेल तर चुकीचे नाही.

ऋन्मेऽऽष, खरच अंतर्मुख करायला लावणारी कथा.
ब्रेक लागला, थांबले, अडकले...सुन्न करणारा लेख आहे + १

फक्त तो सामुदायिक शब्द बदलुन सामुहिक करणार का?

फक्त तो सामुदायिक शब्द बदलुन सामुहिक करणार का? >>> मग सामुहिकच ऑटो आन्सर काय ?

चेतनजीच काही अन्शी पटलं .

"शेजारच्याने खीखी दात काढले. एकदोन मुली रडू लागल्या,"
जर ही दोन वाक्य नसतील तर हे उत्तर प्रतिक्शिप्त क्रियेसारख वाटत आणि शिक्षकांच हतबल होणं जास्त पटतं.

अर्थात पहिल्या मुलाची ही प्रतिक्शिप्त क्रिया असेल आणि दूसर्याचा व्रात्यपणा

सामुदायिक सामूहिक बद्दल सहमत. माझे मराठी तसे कच्चेच आहे,अश्या बाबतीत गोंधळ उडतोच, जो शब्द पटकन आठवला ते लिहिले. अर्थात अजूनही गोंधळ आहेच, किमान चार लोक खात्रीने सांगतील तेव्हाच दूर होईल.
बाकी इथे त्या मुलाचेही मराठी कच्चे असल्याचा बेनेफिट ऑफ डाऊट देऊया.

चेतनजी,
तुम्ही असे असेल आणि तसे असेल या गृहीतकावर बोलत आहात,
मी रात्री घरून एक प्रत्यक्ष माझ्याशी घडलेला किस्साच सांगतो.
मग यावर बोलूया

फक्त तो सामुदायिक शब्द बदलुन सामुहिक करणार का? >>> मग सामुहिकच ऑटो आन्सर काय ? >>>
>>>> चेतनजींनी म्हंटल्याप्रमाणे सामुदायिक म्हंटले की सामुदायिक शिक्षण, सामुदायिक जीवन किंवा फार तर सामुदायिक विवाह हेच शब्द आठवतात आणि बलात्कारासाठी सामुहिक हा शब्द योग्य वाटतोय म्हणुन मी बोलले तरिही तुमची हरकत असेल तर राहु दे सामुदायिक, माझी काही हरकत नाही.

Pages