बाहेर आल्यावर कसा बसा रडत रडतच मला फोन केला. फोनवर तिचा रडका आवाज ऐकला आणि म्हणालो काय झाले ते मला सांग. सगळी कहाणी ऐकल्यावर तिला म्हटले थांब तिथे येतो लगेच. बरे झाले काही फार काम नव्हते. तिला घरी घेऊन गेलो. जर शांत ठिकाणी समजवावे म्हणून तिला सोफ्यावर बसवले. घरी कोणी नव्हते. तिला पाणी प्यायला दिले आणि शांत व्हायला सांगितले. जरा स्थिर झाल्यावर चहा टाकावा म्हणून उठलो. पाणी उकळायला ठेवले तेवढ्यात परत हुंदक्यांचा आवाज सुरु झाला. पाणी बंद करून बाहेर आलो तर अनुष्काचे रडणे पुन्हा सुरु झाले होते.
तिच्या शेजारी जावून बसलो. तिच्या पाठीवर थापटून तिचे सांत्वन करत होतो तर ती माझ्या गळ्यात पडूनच रडायला लागली. दोन तीन महिन्यातला सगळा प्रोफेसर बद्दलचा राग आणि घरापासून प्रथमच दूर असलेल्यामुळे आलेला होमसिकनेसमुळे ती बोलत होती. आणि मी आपला ऐकून घेत होतो. थोडा थोडा सावरण्याचा प्रयत्न करत होतो . पण असे रडता रडता थकून ती माझ्या मिठीत झोपून गेली. मी तसाच अवघडल्यासरखा बसून राहिलो. जर हालचाल केली तर ही उठायची आणि परत रडणे सुरु व्हायचे अशी भीती होतीच.
काल रात्री काम केल्यामुळे मला पण डुलकी लागली आणि तसेच तिच्या मिठीत झोपून गेलो. अचानक थोड्या वेळानी जाग आली तर ती तशीच मला बिलगून बसली होती. माझा हात जो तिच्या अंगाखाली होता त्याला आता मुंग्या आल्या होत्या. तो जर हलवला तर तिला जाग आली. पण मिठीतून दूर न होता ती मला अजूनच बिलगली. माझ्या गळ्यात हात टाकून मला Thank you म्हणाली. आम्ही दोघेही काही न बोलत तसेच खूप वेळ बसून होतो. किती उशीर झाला काही कळलेच नाही. पण मला तिला तसे सोडून उठायचे नव्हते आणि तिचीही माझ्यापासून दूर होण्याची इच्छा दिसत नव्हती.
बराच अंधार पडायला लागला होता त्यामुळे मी अखेर उठून दिवा लावतो म्हणालो. तर तिने मला सोडलेच नाही. असेच बस म्हणाली. खूप बरे वाटते आहे आता असे म्हणून परत आपल्या हातांचा विळखा माझ्या गळ्यात टाकला. मला कवटाळून म्हणाली तू मला खुप आवडायला लागला आहेस. आणि आपला चेहरा माझ्या छातीत लपवला.
थोड्या वेळानी मात्र मला भूक अनावर झाली. शेवटी तिला कसे बसे दूर करून उठलो. मगाचा राहिलेला चहा उकळायला टाकला. फ्रीज उघडून काही खायला आहे का ते पहिले तर तो सुद्धा पूर्ण रिकामा होता. मग पटकन पिझ्झा वाल्याला फोन करून एक पिझ्झा मागवला. तो येईपर्यंत चहा पिउन झाला होता. काही तरी वेगळेच वाटत होते. असे काही होईल हे माझ्या स्वप्नातही नव्हते. खाऊन झाल्यावर सोफ्यावर बसून टी व्ही वर काही तरी पाहत बसलो. अनुष्का परत माझा हात हातात घेऊन बसली होती. तिला तशीच झोप लागते आहे असे वाटले. शेवटी तिला उचलून पलंगावर झोपवले आणि मी सोफ्यावर पथारी पसरली.
सकाळी सकाळी सवयीने जाग आली. आवरून चहा करायला सुरुवात केली तर अचानक गालावर थंड हात लागले. दचकुन मागे वळून पहिले तर अनुष्का हसत हसत उभी होती. विस्कटलेले केस आणि चेहऱ्यावर निर्मळ हसू, जणू काही सुंदर स्वप्नच दिवसात होती. मला राहवले नाही. तिला ओढून आणि मिठी मारली. माझ्या अशा अचानक पुढाकाराने ती थोडी शहारली मात्र परत हसायला लागली. मग काय एकमेकांच्या मिठीतच चहा घेतला.
काम करायची तर इच्छा नव्हती पण प्रोफेसरांनी एक डेडलाईन दिल्यामुळे काम करावेच लागणार होते. तिला सोडण्याचा अजिबात इरादा नव्हता पण तिलाही तिच्या class ला जाणे भाग होते. शेवटी नाईलाजाने तिला तिच्या घरी आवरायला सोडले. सोडताना तिचा हात हातात घेतला आणि माझा गाल पुढे केला. तर चुंबन द्यायचे सोडून खट्याळ पणे तिने माझ्या गालावर टिचकी मारली. मग मात्र मी तिला ओढून तिच्या ओठांवर ओठ टेकवले. अचानक मला मागे सारून ती आत पळून गेली.
आता बर्फ वितळून वातावरणातील गारवा कमी झाला होता. झाडेही हिरवीगार दिसायला सुरुवात झाली होती. अनुष्काच्या सहवासात दिवस कसे जात होते काही कळत नव्हते. दिवसभर काम मग संध्याकाळी तिच्याबरोबर जेवण आणि उशिरापर्यंत गप्पा. कधी लांबवर हातात हात घेऊन फिरायला जाणे. तर कधी सायकली घेऊन जवळच्या नदीच्या पुलावर जाऊन बसणे. दोघांनाही स्वयंपाकाची आवड असल्यामुळे नवनवीन पदार्थ करून पाहणेही चालू होते.
सगळे सुरळीत चालू होते आणि आईने अचानक बॉम्ब टाकला की ती आणि बाबा जून महिन्यात माझ्याकडे दोन महिने राहायला येणार आहेत. मागे एक चक्कर होऊन गेल्यामुळे वीसा वगैरेचा प्रश्न नव्हता. दोघेही रिटायर असल्यामुळे मोकळेच होते. आता आई बाबा येणार म्हणजे अनुष्काला जास्ती भेटता येणार नाही असे वाटले. मग तिला घेऊन कुठे तरी चक्कर मारून येण्याची कल्पना निघाली. उन्हाळ्याची सुट्टी सुरु झाल्यामुळे तसे काही फार काम किंवा अभ्यास नव्हता. तिची परीक्षा झाल्या झाल्या तिला घेऊन निघालो.
गाडीत आम्ही दोघेच होतो. मस्तपैकी गाण्यांच्या भेंड्या खेळत वेळ चालला होता. मी मुद्दामच हरत होतो आणि तिच्या चेहऱ्यावरच्या हास्याचा आस्वाद घेत होतो. डोंगराजवळ तळ्याकाठी एक लाकडी घर मिळाले होते. दोन तीन दिवस मुक्काम होता. सगळ्या गडबड गोंधळापासून दूर मस्त आराम केला. तळ्यात एक लाकडी धक्का केला होता नाव लावायला. त्याच्यावर बसून पाण्यात पाय सोडून संध्याकाळी घालवल्या. दिवस उशिरा उठून अभयारण्यात फिरून येणे आणि संध्याकाळी परत तळ्याकाठी. तिच्याबरोबर बसून भरपूर गप्पा मारल्या आणि कधी कधी काहीही न बोलत नुसते तिच्या डोळ्यात पाहत रात्री उशिरापर्यंत बसलो.
आई बाबांना तिच्याबद्दल काहीच कल्पना दिली नसल्याने गाठ कधी घालून द्यावी असा प्रश्न पडला होता. तिने मात्र विमानतळावर येण्याचा हट्ट धरला. तिच्या त्या हट्टापुढे माझे काहीच चालले नाही. तिला घेऊनच विमानतळावर गेलो. आई बाबा बाहेर आल्यावर हिने पुढे होऊन त्यांना नमस्कार केला. मी हादरलोच पण आई बाबांनी काही दाखवले नाही. चौकशी इकडच्या तिकडच्या गप्पा होईपर्यंत घर आले. घरी तिने सगळा स्वयंपाक करून ठेवला होता. लगेच आवरून सगळे जेवायला बसलो. ती एकदम सराईतासारखी काय हवे काय नको ते पाहत होती. माझ्या छातीतील धडधड आता वाढत होती. आई बाबा असे शांत कसे? माझ्याबरोबर एकही मुलीला पाहताच डोळे मोठे करणारे बाबाही इतके मवाळ कसे? अनेक प्रश्न मला पडायला लागले होते. जेवण होऊन जर स्थिरस्थावर झाल्यावर आईने तिची bag उघडली आणि एक डबा काढून अनुष्काच्या हातात दिला. आता मात्र अती झाले. मी विचारले हे काय? तर आई म्हणाली "अरे तिच्या आईने तिच्यासाठी लाडू दिलेत." आणि मी जोरात "काय?" ओरडलो. मला असा चकीत होताना पाहून तिघेही हसायला लागले.
हसणे कमी झाल्यावर आईने सांगायला सुरुवात केली. मी सारखे लग्न नको नको म्हणत असल्यामुळे या सगळ्यांनी डाव रचला होता. आई बाबांना अनुष्का खूप आवडली होती. मग तिला माझ्या university मध्ये प्रवेश घेऊन माझ्याशी ओळख करून घ्यायला सांगितले होते आणि मग इकडे येउन मला राजी करायची कामगिरी सोपवली होती. आणि मी अलगदपणे त्यांच्या जाळ्यात येउन अडकलो होतो. अर्थात हे जाळेही हवेहवेसे होते त्यामुळे मीही त्यांच्या हसण्यात सामील झालो. असा "अनपेक्षित" पण सुंदर धक्का मिळाल्यावर सगळ्यांची परवानगी आहे हे जाणून अनुष्काला मिठीत घेतले.
(समाप्त)
धन्यु रेना चे काय झाले ती
धन्यु
रेना चे काय झाले ती मिस्टरी आहे त्यासाठी नविन कथा लिहावी लागेल
एकदम क्युट कथा पुलेशु
एकदम क्युट कथा
पुलेशु
क्युट.आवडल..शेवट आधीच माहीत
क्युट.आवडल..शेवट आधीच माहीत होता तरी आवडल.
क्युट आहे गोष्ट.
क्युट आहे गोष्ट.
Pages