मायबोलीवर माझ्या क्रोशे कामाचं वेळोवेळी खूप कौतुक झालं आहे . त्याबद्दल सर्व माबोकरांना परत एकदा धन्यवाद. ही आहे माझ्या क्रोशेकामाची कहाणी.
लेकीच्या लग्नानंतरचा पहिला अधिक महिना होता आणि माझी जावयांना वाण द्यायच्या तयारीची लगबग सुरु होती. आता तुम्ही म्हणाल की माझ्या क्रोशेचा अधिक महिन्याच्या वाणाशी काय संबंध? पण आहे..... वाचा तर खरं !!
ताट, निरांजन, अनारसे, लेकीला साडी, दोघांच्या आवडीचा मेन्यु असं सगळं मस्त प्लॅनिंग चाललं होतं.
वाण द्यायचा दिवस ही नक्की झाला होता. कन्या आणि जावयांना अधिक महिन्यात लक्ष्मी- नारायणाचा मान असतो म्हणून कार्यक्रमात काही कमी राहु नये यासाठी माझी धडपड चालली होती आणि त्यात मला खूप मजा ही येत होती.
सगळी तयारी झाली पण बाकी रहिला होता तो वाणावर घालायचा जाळीचा रुमाल !! तो काय अधिक महिन्यात बाजारात गेलं की नक्की मिळेल या खात्रीने तो आणायला मी बाजारात गेले खरी. पण हाय.... पांढरा शुभ्र, नाजुक विणीचा, जाळीदार रुमाल बाजारात उपलब्ध नव्हताच. होते ते जाडे भरडे आणि भडक रंगाचे. त्या वेळी मी मायबोलीची वाचक होते पण सभासद नव्हते त्यामुळे वि.पु. वगैरे मला काही माहित नव्हतं , नाहीतर मायबोलीवर एकसे एक क्रोशे एक्सपर्ट आहेत त्यांना केली असती विनंती मला रुमाल करुन देण्याची. निराश होऊन मी घरी यायला निघाले पण रस्त्यात मला एक आयडिया सुचली आणि त्याच क्षणी माझ्या क्रोशेकामाच्या छंदाचा जन्म झाला. रुमाला ऐवजी भरतकामाचं सामान मिळत त्या दुकानातुन मी एक खूप जाडा दोर्याचा गुंडा आणि क्रोशेकामाची सुई आणि मॅजेस्टिक मधुन एक दोर्याच्या विणकामाच पुस्तक घेऊन घरी आले. नेट आणि यु टुय्ब होतचं जोडीला.
मला तर हातात सुई कशी धरायची हे ही माहित नव्हतं पण यु ट्युबचा फार उपयोग झाला. खूप परिश्रमाने दोनचार दिवसांनंतर काही साखळ्या घालण्यात मी यशस्वी झाले तेव्हा मला खूप म्हणजे खूप आनंद झाला. कोणी शिकवणारे असेल तर हे काही फार कठीण नाहीये पण मी स्वतःची स्वतःच शिकले म्हणुन जास्त झाला असावा. आता या पुढची पायरी म्हणजे छोटस फुल ( क्रोशेच्या भाषेत मोटिफ ) वगैरे तयार करणे. नेट वर फ्री मधे खूप पॅटर्न होते पण यासाठी पॅटर्न वाचायला शिकणे आवश्यक होते. पॅटर्न नाही वाचता आला तर डिझाईन नीट नाही जमतं. तिथे ही मला नेट चा खूप फायदा झाला. हळूहळु चेन, स्लिप . एस्सी डीसी, मॅजिक रिंग, शेल, पिकॉट , म्हणजे काय ते मला समजायला लागलं आणि एक छोटस फुल करण्यात मी यशस्वी झाले. तो होता एक अगदीच छोटा चार ओळीचाच पॅटर्न पण माझ्यासाठी ती फार मोठी अचिवमेंट होती. त्या काळात क्रोशे माझ्या अंगात भिनलं होतं अगदी. सतत मनात त्याचाच विचार असे.
इकडे वाण द्यायचा दिवस पण जवळ येत होता, हातात वेळ कमी होता पण तरीही रात्री जागून वगैरे मी तीन छोटे छोटे रुमाल विणलेच वाणावर घालण्यासाठी. मी स्वतः विणलेल्या पांढर्या शुभ्र जाळीदार रुमालानी झाकलेले वाण जावयांना दिले तेव्हा माझ्या डोळ्यात होता आनंद आणि मुलीच्या डोळ्यात होते आश्चर्य !! मी स्वतःच शिकुन स्वतः विणले याचे तिला नवल आणि कौतुक वाटले होते. मुलीच्या चेहर्यावरचे ते भाव पाहुन मला माझ्या सार्या कष्टांचे चीज झाल्यासारखे वाटले.
आता क्रोशेकाम हा माझा विरंगुळा झाला आहे. अशी ही माझी क्रोशेकामाची साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफल संपूर्ण.
हे आहेत मी केलेले काही नमुने
हे काही सुरवातीचे
१)
From mayboli
२)From mayboli
३)
From mayboli
हे सरावानंतरचे
४) पायनॅपल आणि पीकॉक पॅटर्न
From mayboli
५)
From mayboli
६) आणि हा अलीकडे विणलेला खूप मोठा ( ४' बाय ३' मापाचा )
From mayboli
धन्यवाद सर्वांना धाग्याची
धन्यवाद सर्वांना धाग्याची दखल घेतलीत म्हणून.
खूपच छान ! मायबोलीवर खरच खूपच
खूपच छान !
मायबोलीवर खरच खूपच गुणी लोक आहेत .
तुमच्या आणि चिकाटीचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे .
अरेव्वा.. खुपच नाजुक आणि
अरेव्वा.. खुपच नाजुक आणि सुन्दर.. अशा स्वत: केलेल्या वस्तु भेट देताना किती आनंद होतो ना..
खूप सुंदर! शेवटचा तर अप्रतिम
खूप सुंदर! शेवटचा तर अप्रतिम आहे.
अतीशय सुन्दर.
अतीशय सुन्दर.
मला नं. ३ पण खुप आवडला.
मला नं. ३ पण खुप आवडला.
खुप सुंदर... अशी जिद्द
खुप सुंदर... अशी जिद्द पाहिजे.
अगदी सहज विचारतो, साधारण किती वेळ द्यावा लागतो एवढ्या विणकामाला ?
आभार सर्वांचे. माणिक मोती ,
आभार सर्वांचे.
माणिक मोती , बरोबर आहे अशी स्वत: केलेली वस्तु भेट म्हणून देताना खूप छान वाटत.
दिनेश , आता सराव वाढलाय त्यामुळे स्पीड वाढलाय.
तो मोठा ( शेवटचा) रुमाल बाकी इतर व्यवधान संभाळुन अडीच तीन महिन्यात पूर्ण केला.
सुंदर! चिकाटीला सलाम _/\_
सुंदर! चिकाटीला सलाम _/\_
किती सुंदर विणकाम >>+११११
किती सुंदर विणकाम >>+११११
sundar
sundar
farach chaan.
farach chaan.
फारच अप्रतिम!! स्वतःचं स्वतः
फारच अप्रतिम!! स्वतःचं स्वतः शिकणे हे खरंच अवघड आहे. त्यासाठी तुम्हाला खरंच __/\__
खूप मस्त. कधीकाळी क्रोशे करत
खूप मस्त. कधीकाळी क्रोशे करत होते आणि विणात असलेल्या पांढर्या रुमालाची बांग देतात त्या ठिकाणी जाताना घालतात तशी जाळीची गोल टोपी व्हायला लागल्यावर सोडून दिले ते आठवले.
एकदम सुबक काम जमलेय. सर्व सुंदर दिसतायेत.
आभार परत एकदा सर्वांचे.
आभार परत एकदा सर्वांचे. त्यात मी डावखुरी असल्याने माझ्यासाठी ते सगळे विडीओ उलटेच वाटत होते पण अखेर साधलं
कधीकाळी क्रोशे करत होते आणि विणात असलेल्या पांढर्या रुमालाची बांग देतात त्या ठिकाणी जाताना घालतात तशी जाळीची गोल टोपी व्हायला लागल्यावर सोडून दिले ते आठवले.>> अनु, तुझ्या लिखाणातला नेहमीच जाणवणारा मिस्कीलपणा इथेही दिसला आणि खुदकन हसु आले.
हेमा ताई ------ /\
हेमा ताई ------ /\ -------
मस्त काहाणी आ णि कlaa कुस र...
खूपच सुंदर!किती नाजुक झा ले
खूपच सुंदर!किती नाजुक झा ले आहेत!स्वत:च नेटवर बघून केले हे कौतुकच आहे.लिखाणहि मस्त आहे.एकाच धाग्यात किती कला दिसल्या ममो;क्रोशे;लिखाण;तंत्रद्न्यानाशी मैत्री व प्रकाशचित्रण.खूप कौतुक.
सुरुवातीच्या काळातील आणि
सुरुवातीच्या काळातील आणि लेटेस्ट.. चढता आलेख स्पष्ट जाणवतोय .. अर्थात आपली सुरुवात शून्यातूनच झालेली.. आवडीची गोष्ट आवडीखातर शिकली तर जमलीच पाहिजे
सुंदर आहे सर्व. हे असलं
सुंदर आहे सर्व. हे असलं डोळ्यांना किचकट काम आपणहुन शिकुन इतकी प्रगती करणे हे फारच कौतुकास्पद आहे.
मीरा खुप सुरेख प्रतिसाद....
मीरा खुप सुरेख प्रतिसाद....
खुपच कौतुक करायला हवे गं
खुपच कौतुक करायला हवे गं तुझे. तो शेवटचा मोठा रुमाल करणे हे साधे काम नक्कीच नाही. तु स्वतःचे स्वतः शिकुन हे सगळे केलेस. कमाल आहे तुझी.
धन्यवाद सायली.
धन्यवाद सायली.
आणि ही साखळीटाक्यांची
आणि ही साखळीटाक्यांची गाठीगाठींची क्रोशेकामाची कहाणी सुफळ संपूर्ण!
मस्त! या क्रोशेकामापुढे मी हात टेकले आहेत. "अवल" जाणे आणि इन्टरनेट जाणे!
आभार सर्वांचे मीरा , तुझा
आभार सर्वांचे
मीरा , तुझा प्रतिसाद खूप आवडला. एका धाग्यात किती गोष्टी शोधल्यास ! ग्रेट आहेस !
मानुषी , क्रोशे जरा ही कठीण नाहीये. चेन आणि खांब हे दोनच टाके आहेत आणि ते ही सोपेच आहेत. तुला नक्की जमेल.
____________/\______________
____________/\______________ बास.
भारीच आहे. तुमच्या
भारीच आहे. तुमच्या इच्छाशक्तीला दंडवत!
प०हिले नमुने बिगरीतले अजिबात वाटत नाहीयेत.
फारच छान. तुमच्या मेहनतीला
फारच छान. तुमच्या मेहनतीला सलाम. माला क्रओशा फार आवडते. पण हा आपला प्रान्त नव्हेच असे वाटे. पण तुमची स्टोरी वाचुन अता हातात सुई ध्रउन तरी पहावी असे वाटते आहे.
___/\___ सही!
___/\___ सही!
सर्वांना धन्यवाद. सुभाषिणी,
सर्वांना धन्यवाद.
सुभाषिणी, तुला नक्की जमेल. ट्राय कर. आणि केलेस की इथे फोटो टाक.
सुरेख! मानलं तुम्हाला!
सुरेख! मानलं तुम्हाला!
Pages