....त्याच काय झालं हा प्रश्न
तुम्हाला पडला असेल . त्याच तुम्हाला उत्तर
नक्की मिळेल . पण आता कथा दुस-या ठिकाणी दुस-
या पात्रांसोबत पुढे जाते आहे . पुढे त्याच काय झाल
याचही उत्तर मिळेल . तोपर्यंत वाचकांनी धीर धरावा .
कथा.... भाग ३
खरी सुरुवात
मंजू आणि सुयश एक सुखी जोडप होत. त्यांचा संसार सुखा समाधानान चालला होता . त्यांच्या संसारात
सुखाची आणखी भर पडली . त्यांच्या संसार वेलीवर एक
नवी कळी उमलली होती . तिला पाहून दोघांनाही आभाळ
ठेंगण झालं होतं . तिचा जन्म रात्री झाला होता म्हणून तिचं
नाव ठेवलं होतं निशा. त्यांच्या आयुष्यात हिच रात्र नविन
सुख घेऊन आली होती .
तिला खेळवता खेळवता दोघांना दिवस पुरत
नसे. असेच दिवस चालले होते . तिचे ते बोबडे बोल ,तिचं ते
दुडूदुडू चालन सारच फार छान होत . एखाद्या स्वप्नातच
आहोत आपण असं त्यांना वाटत होतं .
आज निशा शाळेला निघाली होती . ती आपल्या आठवणीने किती रडेल आणि किती दंगा करेल याने मंजूचा जीव तुटत होता . पण झालं वेगळच निशाला शाळा फार
आवडली . ती कधी रडली नाही शाळेत जायला . तिचा शाळेत
जायचा उत्साह फार असायचा . त्यामुळे मंजूचा मात्र
पळापळ करावी लागे . शाळेतून माघारी आल्यावर निशान
मारलेल्या मिठीत मंजूचा दिवसभराचा थकवा अगदी दूर
व्हायचा .
निशा जन्मतःच हुशार होती व कोणतीही गोष्ट
पटकन शिकायची . तिला कामाचीही भारी हौस . उगाचच
काहीतरी भांडं घेऊन आईसारख त्याला घासण्याचा प्रयत्न
करायची . त्यातुन ते भांडं काही स्वच्छ व्हायचं नाही . ते मंजूलाच स्वच्छ करावं लागे पण त्यामुळं
आजुबाजुच्या बायका कौतुक करायच्या ,मंजू लेक लवकर
कामाला हातभार लावू लागली हो . त्या बोलण्यानं
मंजूला फार सुखावायच.
..... क्रमशः