मंगेशी, म्हाळसा व शांतादुर्गा !

Submitted by Yo.Rocks on 3 February, 2015 - 03:50

# मंगेशीं मंदीर :
प्रचि १:

प्रचि २:

प्रचि ३:

प्रचि ४:

प्रचि ५ :
# म्हाळसा मंदीर :
प्रचि ६:

प्रचि ७:

प्रचि ८:

प्रचि ९:

प्रचि १०:

प्रचि ११:

प्रचि १२:
# शांतादुर्गा मंदीर :

प्रचि १३:

प्रचि १४:

प्रचि १५:

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच सुंदर आले आहेत फोटो. मंदिराच्या बॅकग्राउंडला आकाशही मस्त आलंय. माणसं खूप कमी (जवळजवळ नाहीतच) दिसत आहेत. उत्सवाच्यावेळी फुलून जात असेल परिसर.

मी फक्त मंगेशीचे मंदीर पाहिले. तिथले जेवण स्वस्त आणि मस्त आहे. बाहेर झाडाच्या पानावर वेगवेगळी कापलेली फळे मिळतात ती मस्त लागतात.

शांतादुर्गेचं मंदीर फक्त दुरुनच पाहिलं.

मंगेश माझे माहेरचे कुलदैवत. आज माघी पूर्णिमेचा फार मोठा उत्सव अस्तो तिथे. आजच्या दिवशीच हे फोटो बघून काय मस्त वाटलं! खूप खूप आभार!

बाय द वे... देवीचं नाव 'महालसा' आहे. म्हाळसा नव्हे... माझ्या मते.

सुन्दरच आहेत फोटो. तिथे नेहमीच अशी स्वच्छता राखलेली असते. खर्‍या अर्थाने "देऊळ"पण जपलेले असते.
काहि फोटो, नागेश्वर देवळाचे ना ?
फोंड्याचे बालाजी मंदीर बघितले का ? तेही सुंदर आहे.

देवीचं नाव 'महालसा' आहे.>>+१
पण श्री म्हाळसा देवी/ म्हाळसा नारायणी असेही म्हणतात..

नेहमीप्रमाणेच खुप सुंदर फोटोज.

बहुतेक भल्या पहाटे फोटो काढले गेले असावेत, नाहीतर पर्यटकांनी आणि भाविकांनी सर्व परिसर एकदम गजबजलेला असतो.

http://en.wikipedia.org/wiki/Mahalasa

खूप छान वाटले मन्दिर बघुन. जायचे आहे योग आला की. मन्दिरान्वर पण पोर्तुगीज छाप जाणवली. प्रचि १२ अगदी आमच्या अम्बाबाईच्या ( कोल्हापूर) देवळा सारखेच वाटतेय.

मस्त फोटो, आईच्या माहेरची , साबांच्या माहेरची अन आम्ची कुलदेवता त्यमुळे ह्या तिन्ही देवळात दरसाल चक्कर होतेच.
शांतादुर्गेला आर्श्यांच्या सहाय्यानी किरणाभिषेक करतात त्याचा फोटो नाही का मिळाअला?

मस्त ..

धन्यवाद.. हे फोटो सकाळच्या वेळचे आहेत.. सप्टेंबरचा महीना असल्यामुळे आकाश मस्त मिळाले..

दुधसागरच्या निमित्ताने गोवा गाठले होते तेव्हा मित्राने सुचवले म्हणून धावती भेट दिली.. नाहीतर मला या मंदिराबाबत काहीच माहिती नव्हती. पण प्रत्यक्षात जेव्हा गेलो बस्स मन एकदम प्रसन्न झाले !

शांतादुर्गेला आर्श्यांच्या सहाय्यानी किरणाभिषेक करतात त्याचा फोटो नाही का मिळाअला?>>> तो सोहळा फ़क्त डोळ्यांनी पहावा Happy
माझ्यासाठी ते क्षण कायम स्मरणात राहतील.. तसेही कुठल्याही मंदीरात फोटोग्राफीस परवानगी नाही.

दिनेशदा.. बालाजी मंदिर मात्र बघायचे राहून गेले

हर्पेन.. शेवटचा फोटो मोबाइलमधून पॅनोरामा मोड़ वापरून काढलाय

फारच सुंदर योग्या !! तुझे फोटो म्हणजे डोळ्याचे पारणेच फिटते. माझं म्हाळसा मंदिरात जायचं राहिलं. मंदिर खूपच देखणं दिसतयं Happy

तुझे फोटो म्हणजे डोळ्याचे पारणेच फिटते>>>>+१०० Happy
९ वा फोटो खूपच आवडला.
ही अशी स्वच्छ मंदिरं बघितली की ही नक्की भारतातच आहेत का असा प्रश्न पडतो!

अप्रतिम फोटो. विशेषत: प्रचि ९ त्यातील कोनान्मुळे आवडला .शिवाय प्रचि १३ मंदिराच्या रचनेमुळे छन वाटतो....मस्त!!!

Pages