मस्कत सलालाह सहल, भाग २ - सलालाह मधली पांडवलेणी :-)

Submitted by दिनेश. on 2 February, 2015 - 07:48

मस्कत सलालाह सहल - ओळख आणि प्राथमिक माहिती. http://www.maayboli.com/node/52462

मस्कत सलालाह सहल, भाग १ - मस्कतला प्रयाण http://www.maayboli.com/node/52504

सलालाह ला रात्री साडेदहाला पोहोचलो. हमदान प्लाझा या हॉटेलमधे मी बुकिंग केले होते. सलालाह मधे टॅक्सीज कमी आहेत आणि मस्कतच्या तूलनेत त्या महागही आहेत. एअरपोर्टवरून जवळच असलेल्या हॉटेलवर जायला ७ रियाल द्यावे लागले.

ओमानी रियाल ( तसेच बहारिनी दिनार, कुवैती रियाल वगैरे ) हि एक खास करन्सी आहे. या एका रियालमधे
१००० बैसा असतात. सध्या विनिमयाचा दर एका ओमानी रियालला 160 रुपये आहे. पण ओमानमधे फुटकळ
खरेदीसाठी बैसाच वापरतात. सध्या भारतात परदेशी चलनावरची बंधने शिथिल झाली आहेत. पन्नास हजार
भारतीय रुपयांएवढे परकिय चलन, अगदी एअरपोर्टवरही मिळू शकते.

तर आधी आपण सलालाहची प्राथमिक माहिती घेऊ. सलालाह म्हणजे ओमानचे दक्षिण टोक. मस्कत आणि आसपासचा भाग ( कॅपिटल एरिया ) हा ओमानच्या उत्तरेला आहे. आणि तिथपासून सलालाह १,१०० किमी
दक्षिणेला आहे. मधला बराच भाग, काही तुरळक गावे व तेलविहिरी सोडल्यास, वैराण वाळवंट आहे.
मस्कत ते सलालाह उत्तम रस्ता असल्याने हा प्रवास रस्त्यानेही करता येतो. एवढ्या प्रवासाला साधारण १२ तास
लागतात. मधेही काही बघण्यासारखी ठिकाणे आहेत पण बहुतांशी भाग वाळवंटच आहे. इथे गवताचे पातेही
उगवत नाही. वाळवंटातील वाळू देखील मैद्यासारखी मुलायम आहे. ती मुठीत धरता येत नाही.
हा प्रवास मी २००० साली, माझ्या मित्रांबरोबर गाडीने केला आहे ( जून्या मायबोलीवर "सलाम सलालाह" असा
एक लेखही लिहिला होता. ) सध्या या मार्गावर नियमित बससेवा आहे. ती दिवसा व रात्रीही सुरु असते.
बसचा प्रवासही आरामदायी आहे. खर्च वाचवायचा असेल तर विमानाच्या ऐवजी बसनेही सलालाहला
जाता येईल. दिवसा प्रवास केला तर वेगळा निसर्ग दिसेल, रात्री केला तर हॉटेलचाही खर्च वाचेल.

सलालाह मात्र खास जागा आहे. धोफार पर्वतराजीच्या कुशीत सलालाह वसलेले आहे. मस्कतमधील पर्वतांपेक्षा
हे पर्वत वेगळे आहेत. मस्कतमधले पर्वत केवळ दगडाचे आहेत. त्यावर काहिही उगवत नाही. धोफार पर्वत मात्र
तसे नाहीत. त्यावर झाडे आहेत.

मस्कतमधे मार्च ते सप्टेंबर कडक उन्हाळा असतो हे मागच्या भागात लिहिले होतेच. त्या उलट सलालाह मधे
मात्र जुलै ते सप्टेंबर चक्क पावसाळा असतो. भारतीय मौसमी पावसाचीच एक शाखा त्या भागात पाऊस पाडते.
त्यामूळे तो काळ सलालाहला भेट देण्यासाठी सर्वात योग्य असतो. त्या काळात तिथले डोंगर हिरवेगार असतात, तसेच ठिकठिकाणी धबधबे असतात. पण त्याच काळात पावसाळी वातावरण असल्याने पर्वतांवर ढगही असतात.

तो काळ सोडला तरी सलालाह मधे अनेक छोट्या छोट्या नद्या वर्षभर वहात असतात. तिथे पाण्याच्या उपलब्धतेमूळे बरीच फळे होतात. केळी, पपया, संत्री, अननस, अवाकाडो, सिताफळे तर होतातच पण खास करून
नारळ जास्त होतात. या कारणामूळे त्या भागाचे आपल्या केरळशी साम्य वाटते.
तसेही तिथे केरळी समाज खुप आहे, एवढेच नव्हे तर केरळहून सलालाह ला जायला थेट विमानसेवाही आहे. सलालाहला दोहा, दुबई व अबु धाबीहूनही थेट विमानसेवा आहे. इतालीमधून चार्टर सेवाही आहे.

सलालाहच्या आजूबाजूला बघण्यासारखे बरेच काही आहे. मला धबधबे बघता आले नाहीत पण वाद्या आणि इतर ठिकाणे बघितलीच.

सलालाह प्रसिद्ध आहे ते धूपाच्या झाडासाठी. ही झाडे तिथल्या पर्वतांवर विपूल आहेत. त्यांच्यापासून मिळणारा धूप आणि त्याचे अत्तर ओमानी लोकांत खुपच लोकप्रिय आहे. हे अत्तर ते विपुल प्रमाणात वापरतात. या धूपाची धुरी वैयक्तीक स्वच्छतेसाठी पण वापरतात. पण विशेष म्हणजे, मस्कतला पावलापावलावर दिसणारी खजूराची
झाडे मात्र इथे नाहीत.

सलालाहमधे बर्याच गुहाही आहेत, तसेच काही आर्किओलॉजिकल साईट्स पण आहेत. इनक्रेडीबल ह्यूमन जर्नीज, अशी एक मालिका यू ट्यूबवर आहे. त्यात उल्लेख केल्याप्रमाणे, इथिओपियातून ज्यावेळी मानव इतर खंडाकडे गेला, त्यावेळी त्याने सलालाह मार्फत प्रवास केला.

थोडे विषयांतर करतो.. इथिओपियातून वर सरकायचे तर रेड सी पार करायला हवा. सध्याही तो फारसा रुंद नाही
आणि त्या काळात तर आजच्यापेक्षा अरुंद होता. त्यामूळे त्याकाळच्या अप्रगत मानवाला तो पार करणे कठीण गेले नसणार. त्यानंतर एडन ( येमेन ) व सालालाह इथे वास्तव्य करून पुढे तो ओमानच्या पूर्व किनार्यावरून पुढे उत्तरेकडे गेला.

या पुर्व किनार्यावर सध्या फारशी वस्ती नाही कारण इथे गोडे पाणी नाही. पण त्या काळात समुद्राची पातळी
कमी होती आणि ठराविक अंतरावर गोड्या पाण्याचे झरे होते. त्या पाण्याचा वापर करतच मानव पुढे सरकला.
सध्या ते झरे, समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्याने समुद्राखाली गेले आहेत, पण ते आहेत.

समुद्राच्या खाली गोड्या पाण्याचे झरे असणे यावर माझा आधी विश्वास नव्हता पण तसे असू शकतात. कतार
रसकारची निर्मिती असलेल्या, "ब्लॅक गोल्ड" या चित्रपटात त्याचे चित्रीकरण आहे.

असो, तर परत वर्तमान काळात येऊ.

आम्ही २००० साली तिथे गेलो होतो तेव्हा १४ जण होतो. आमच्यासोबत मिसेस नायर म्हणून एक बाई होत्या. आमच्या बॅचलर ग्रुपमधे ते सहज मिसळून गेल्या होत्या. त्या या जागी आल्यावर एकदम ओरडल्याच, अरे वो देखो पांडवलेणी....!

१) ही हमदान प्लाझा मधली प्रशस्त रुम

२) ३ स्टार असूनही ५ स्टार सोयी होत्या. चक्क सिटींग रुम होती आणि दोन्ही रुममधे टिव्ही होता.

३) प्रति केरळ !

४)

५)

६) हे एक ट्राफिक आयलंड आहे

७) हे सलालाहचे आदीवासी, कुठेही आणि कधीही दिसतात. मला एका उंच डोंगरावर उंट दिसला. ड्रायव्हरला विचारले, तिकडे कशाला गेलाय तो ? तर तो म्हणाला, उंट आहे म्हणून गेला.

8) सलालाह हे अशा धोफार पर्वतराजीच्या कुशीत वसलेय.

9) याला म्हणायचे वादी आणि जो बांधीव छोटा पाट आहे तो फलाज. आजूबाजूच्या खेड्यांचा तो पाण्याचा प्रश्न सोडवतो. त्याच्यातील पाण्याची पातळी बघून, त्याचा वापर कसा करायचा याचे नियम परंपरेने ठरलेले आहेत.
फलाजमधले पाणी स्वच्छ राहील याची काळजी घेतली जाते. या पाण्यावरच शेती पण होते.

१०) हिच ती सलालाहची प्रसिद्ध पांडवलेणी. ( मिसेस नायर नाशिकला राहिलेल्या होत्या. कुठल्याही गुहांना
पांडवलेणी म्हणायचे असे त्यांना वाटत असे. )

11)

12)

13)
या पाण्याने माझी कशी फजिती झाली होती ते लिहीलेच पाहिजे. मागच्या भेटीत मिसेस नायर म्हणाल्या या लिलिज मिळाल्या तर किती छान. मी म्हणालो, मी देतो आणुन. स्वच्छ पाण्यामूळे खोलीचा अंदाज आला नाही. ढोपरभर वाटलेले पाणी चांगले कंबरभर खोल होते. फुले मी आणली पण कपडे बदलण्यासाठी एका गुहेत जावे लागले होते.

14) पाय सोडून जळात बसल...

15) गुहेतील आतला भाग अगदी स्वच्छ राखलेला आहे. चांदण्या रात्री शेकोटी भोवती कोंडाळे करून मित्रमंडळींशी गप्पा मारायला काय बहार येईल. ( ही सर्व ठिकाणे सुरक्षित आहेत. )

16)

17) गुहेकडे जायचा रस्ता.

18) या बिचार्‍याला काय माहीत, मला पक्ष्यांचे फोटो काढता येत नाहीत ते !

19)

20)

21)

22)

23)

24) स्थिर भासत असले तरी हे पाणी वाहते आहे.

25)

26) या वादीच्या काठाने तूम्ही निवांत चालू शकता ( काठ बांधून काढलेले आहेत. )

27) हवं तर एखाद्या झाडाखाली निवांत बसा.

28) किंवा एखादे टेकाड चढून जा.

29)

30)

31)

32) एखादा रानमेवाही मिळू शकतो.

33)

34)

35) हे डोंगर रुक्ष वाटत असले तरी यांच्या पोटातूनच पाणी सतत पाझरत असते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक विचारायचं राह्यलंच! त्या झर्‍याच्या काठाशी जे खडक आहेत, त्यांच्यावर टेक्श्चरिंग मुद्दाम केलंय की नैसर्गिक आहे? (फोटो क्र. २३ ते २६)
आणि ती बोरं आहेत की भोकरं? मला ती बोरं वाटली, पण त्या झाडाच्या पानांवरून जरा शंका आली.

शांकली, हे मुद्दाम केलेले बांधकाम आहे. एका बाजूला नैसर्गिक खडक आहे तर दुसर्‍या बाजूला असे केलेय. ( पण हे अलिकडेच केलेय. आम्ही २००० साली गेलो होतो, तेव्हा नव्हते ) चालायला सोपे जाते त्याने.
ती बोरेच आहेत. चवीला छान आंबटगोड होती. मस्कतमधे भोकराची झाडे पण आहेत. तिथले एक भोकराचे झाड २५ वर्षे बघतोय ! ओमानमधे खजूरासोबतच लिंबू, विलायती चिंचे, बोरे आणि बाभूळ हि झाडे नैसर्गिकरित्या वाढलेली दिसतात.

झब्बू Happy

नारियल पानी

1346395862136.jpg

सलाला मधल्या गल्ली बोळातले काही फोटो.

1346395861278.jpg1346395861105.jpg

केळी/नारळाच्या बागा. खाऊच्या पानाचे वेल झाडांवर चढवलेले ठिकठिकाणी दिसतात

1346395861756.jpg

मित, पुर्वी रुवीला पाटी होती " यहाँ पान बेचना, खाना और थूकना मना है ! " ती आहे का अजून ? सलालाह मधे पण चोरुनच खावे लागले होते.

कित्ती भारी फोटोज! इथे वॉट्स अ‍ॅप सारखी डोळ्यात बदाम असलेली बाहुली हवी होती. अगदी तशी कंडिशन झाली कारण फोटो बघताना! Happy

पाटी आहे अजूनही. पानं मात्र आता मिळत नाहीत पूर्वीसारखी. ठराविक १-२ दुकानांतच मिळतात आणि तीही रेशनिंग केल्यासारखी (माणशी १० वगैरे) पूजेसाठी पाहिजे असं सांगून घ्यावी लागतात Happy

Pages