मस्कत सलालाह सहल - ओळख आणि प्राथमिक माहिती. http://www.maayboli.com/node/52462
जून्या मायबोलीवर मी मस्कतबद्दल भरभरून लिहिले होते. त्यावेळी फोटो द्यायची सोय नव्हती आणि असती तरी
देण्यासारखे फोटोही माझ्याकडे नव्हते. ( मी ज्या काळात मस्कतमधे होतो त्या काळात डिजीटल कॅमेरा नव्हता. )
७ वर्षांपुर्वी तिथे गेलेला मायबोलीकर मित ( अमित ) याने ते वाचून माझी विचारपूसही केली होती. मस्कतला परत
यायचे आहे हे मी त्याला बोललो होतो आणि तो अधून मधून मला त्याची आठवणही करून देत असे. मागच्यावेळी
अबु धाबी ला गेलो होतो त्यावेळी तांत्रिक दृष्ट्या ओमानच्या हद्दीत प्रवेशही केला होता.
यावेळेस हाताशी चारच दिवस होते, त्यातही मस्कत आणि सलालाह असे दोन्ही करायचे होते. मस्कत हा गल्फचाच
भाग असल्याने मार्च ते सप्टेंबर तिथे कडक उन्हाळा असतो. त्यामूळे ते महिने टाळायचेच. जानेवारी महिना असल्याने
हवामान सुखद असणार होते.
एकदा बेत ठरल्यावर मी थॉमस कूकशी संपर्क साधला. एअरलाइन्स, हॉटेल्स ची निवड मीच केली होती. व्हीसाची
व्यवस्था ते करणार होते. पण भेट द्यायची ठिकाणे मात्र माझी मीच निवडली होती.
माझ्या पुर्वीच्या वास्तव्यात माझ्या मित्रमंडळींसोबत आणि कामानिमित्तही मी ओमान उभा आडवा भटकलेलो आहे.
तिथल्या सुंदर रस्त्यावरून नुसता प्रवासच करणेही मला आनंददायी वाटायचे. सकाळीच एक बस पकडून ५ तास
प्रवास करून परत त्याच बसने येणे, असले उद्योगही मी करायचो. दर गुरुवारी हमखास सिनेमा बघायचो आणि शुक्रवारी सकाळीच पायी पायी भटकायचो. ते सगळे भाग परत एकदा बघायचे होतेच.
शक्यतो कुठल्याही देशात जाताना मी टॅक्सी आधीच बूक करतो. बहुदा हॉटेललाच एअरपोर्ट पिक अप करायला सांगतो.पण मस्कतला जाताना तशी गरज वाटली नव्हती. ओमानच्या व्हीसाची आपल्याला फक्त कॉपी मिळते. त्याची मूळ प्रत तिथल्या एअरपोर्ट वरच ठेवलेली असते. आपण तिथे उतरल्यावर ती आपण घ्यायची आणि पुढचे सोपस्कार करायचे अशी पद्धत आहे.
१६ जानेवारीला सकाळच्या ओमान एअरच्या विमानाने मी मस्कतला जाणार होतो. दिवसभर मस्कतमधे भटकून रात्रीच्या विमानाने सलालाहला जाणार होतो. त्या दिवशी मला मस्कत फिरवायची जबाबदारी अमितने घेतली होती.
आदल्या दिवशी संध्याकाळी वर्षूकडे गप्पा मारायला गेलो, त्यानंतर डोळ्यांच्या डॉक्टरकडे जाऊन आलो. रात्री उशीराच निघालो. माझ्याकडे काहीच सामान नव्हते त्यामूळे रिक्षानेच गेलो. ( मुंबईच्या नवीन विमानतळावर रिक्षांना डिपार्चर एरियात प्रवेश नाही. ) त्यामूळे एक नवीन शोध लागला. या नव्या विमानतळाचा अरायव्हल विभाग मस्त सजवलाय. तिथेच सोबत्यांना बसायची सोय आहे. चहापानाची पण सोय आहे. डिपार्चर एरियातला व्हीजीटर्स लाऊंज मात्र अजून वापरात नाही.
रात्री २ वाजेपर्यंत तिथेच टाईमपास केला. ओमान एअरचा काऊंटर उघडल्याबरोबर पहिला नंबर लावला.
नवीन विमानतळावर छान दुकाने आहेत. अगदी गुजराथी थाळी मिळायची पण सोय आहे . ( नमोनमा )
विमान वेळेवर सुटले आणि वेळेवर म्हणजे तिथल्या सात वाजताच मस्कतला पोहोचले.
२५ वर्षांपुर्वी ज्या विमानतळावर उतरलो होतो, तो अजून तसाच आहे. ( नव्याचे बांधकाम चालू आहे. ) पण धावपट्टी मात्र नवीन झालीय. त्यामूळे विमान उतरल्यावरही बराच वेळ टॅक्सी करत राहिले.
सामान नसल्याने मला पटकन बाहेर पडता आले. ( शिवाय माझा व्हीसाही मला कलेक्ट करावा लागला नाही. तो आधीच इमिग्रेशनकाऊंटरवर ठेवला होता ) मस्कतमधे नव्याने एक सुंदर ऑपेरा हाऊस बांधले आहे. सकाळच्या वेळी तो आगंतूक प्रेक्षकांना आतून बघता येतो. ( कार्यक्रमाच्या वेळी मात्र ड्रेस कोड आहे. ) तिथे सकाळी ८.१५ पोहोचले तर अशी सोय आहे, असे अमितने मला कळवले होते. पण मला जरा उशीर झाला. ( आणि ती संधी
आज चुकली असे वाटल्याने ) मी अमितला फोन करून एका ठिकाणी म्हणजे कुरुमला बोलावले. ( ते ऑपेरा हाऊस आपण नंतर बघणार आहोत. )
कुरुम माझ्या अगदी परिचयाचा भाग असा माझा समज होता, पण तो भाग सध्या खुपच बदलला आहे. तरीपण शुक्रवार म्हणजे तिथल्या साप्ताहीक सुट्टीचा दिवस असल्याने रस्त्यावर फारशी गर्दी नव्हती. अमितला मला गाठायला फारसे प्रयास पडले नाहीत.
आणि मग झाला आमचा डाऊन द मेमरी लेन प्रवास. पहिल्यांदाच भेटत होतो तरी ओळख होतीच. माझी जुनी घरे, ऑफिसेस तर बघितलीच पण ज्या रस्त्यावरुन मी निरुद्देश भटकत असे त्या रस्त्यांवरुनही त्याने मला फिरवले.
माझ्यासाठी तो अविस्मरणीय अनुभव होता. त्याने मला जेवढे फिरवले तेवढे फिरणे मला एकट्याला जमलेच नसते, शिवाय एवढे अपडेट्स इतर कुणाकडून मिळाले नसते.
मग आम्ही जोशी यांच्या खानावळीत जाऊन सुग्रास जेवलो. अमितने माझ्यासाठी बराच वेळ दिला पण मला त्याच्या बेट्याला भेटायची ईच्छा होती. आम्ही त्याच्या घरी गेलो.
चि. मल्हारने लहानपणापासून ( त्याच्या नाही, माझ्या ) ओळख असल्यागत माझ्याशी गप्पा मारल्या. त्या नादात वेळ कसा गेला ते कळलेच नाही. अमितनेच मला एअरपोर्टवर सोडले. आणि मी सलालाह च्या विमानाची वाट बघत बसलो.
१) मुंबईच्या विमानतळावरचे काही फोटो
२)
३)
५)
६)
७)
८)
10)
12) Peacock lounge
13)
14) Beautiful Roads of Muscat
15)
16)
17)
18) Muscat Sea front
19)
20)
21)
22) प्रत्यक्ष मस्कत हे जरा लहानसेच गाव आहे. डोंगराच्या कुशीत असल्याने फारशी नवीन बांधकामे नाहीत. सुलतान काबूस यांचा राजवाडा इथे आहे. तसेच स्वयंभू शिवलिंग असणारे एक शिवालयही आहे. तिथे महाशिवरात्रीला खुप गर्दी असते. ( भरपूर ठंडाई मिळते )
23)
24) Park facing seashore
25) मस्कत, खास करुन तिथल्या जून्या बंदराजवळचा म्हणजेच कोर्निशजवळचा समुद्र असाच कायम शांत असतो. त्यात फारश्या लाटा उठत नाहीत. पाणी नितळ असल्याने रंगही सुंदर दिसतो. इथे अगदी मोठे मासे किनार्याजवळ पोहताना मी बघितले आहेत. इथेच काही बागा आहेत. समुद्राच्या पाण्याचा वापर करून केलेले कृत्रिम धबधबे आहेत.
26) या देवळाच्या कट्ट्यावर मी कित्येक शुक्रवारच्या सकाळच्या वेळा घालवल्या आहेत. हे कृष्णाचे देऊळ आहे. हवेली पद्धतीचे असल्याने त्यात दर्शनाच्या ठराविक वेळा असतात. पुर्वी चांदीचा असणारा देव्हारा आता सोन्याचा आहे. याच्या बाजूला देवी आणि गणेशाची देवळे पण आहेत. तसेच मागे एक सभागृह आहे. मस्कत मराठी मित्र मंडळाचा गणेशोस्तव इथे.दणक्यात साजरा होत असे.
इथला प्रसाद ( दाणे, साखर, सुका मेवा ) कबुतरांना देऊ नका, अशा सूचना आहे सध्या इथे.
27) जोश्यांकडची थाळी, शुक्रवारची खास स्वीट डीश असते. बा़किचे पदार्थ घरगुति चवीचे असतात. पाण्यासोबत ताकही मुबलक मिळते. ( तिथल्या उन्हाळ्यात असे थंडगार ताक पिणे फार सुखकारक असते. )
28) Little Africa
29)
30) कुरुम बीच.. संक्रांतीच्या आसपासचा दिवस असल्याने पब्लिक पतंग उडवत होते.
31) मस्कत विमानतळावरच इडली नावाचे हॉटेल आहे. तिथे घेतलेली इडली-पोडी. अगदी अस्सल चव !
मस्तच.
मस्तच.
रॉहू, १/४ नाही, approx १/६
रॉहू, १/४ नाही, approx १/६ होईल वजन चंद्रावर गेलं तर.
मस्त फोटो अन वर्णन
मस्त फोटो अन वर्णन
दिनेश दा सुदंर फोटो व वर्णन
दिनेश दा सुदंर फोटो व वर्णन अस वाटत्त की स्वतःच फिरत आहे.जबरदस्त...
आभार दोस्तांनो....
आभार दोस्तांनो.... नेहमीप्रमाणेच भरपूर फोटो ( ८०० च्या वर ) आहेत. निवडकच टाकेन इथे.. दर आठवड्याला टाकायचा प्रयत्न करतो.
सुन्दर फोटो... आणि सुरेख
सुन्दर फोटो... आणि सुरेख प्रवास वर्णन !!!!
दिनेशजी सुदंर फोटो व वर्णन अस
दिनेशजी सुदंर फोटो व वर्णन अस वाटत्त की स्वतःच फिरत आहे...>>>>महेश कुमारना अनुमोदन.
मस्त वाटल ......
अर्र्र्रर्र्र्र.... चुकुन
अर्र्र्रर्र्र्र.... चुकुन दोनदा ...............माफ करा
मस्त वर्णन .फोटो सुरेख.
मस्त वर्णन .फोटो सुरेख. कृष्णाच मंदिर किती छान आहे. आणि जोश्यांची थाळी सुद्धा

फोटोमधून खरच छान दिसतंय मस्कत
मस्त वर्णन आणि फोटो!
मस्त वर्णन आणि फोटो!
फोटो आणि वर्णन दोन्ही
फोटो आणि वर्णन दोन्ही सुरेख.
थाळी आणि इडली बघून भूक लागली. आता रात्री २ वाजता काय खाऊ
वाचते आहे ही सिरीज..सुपर्ब
वाचते आहे ही सिरीज..सुपर्ब फोटोज...मस्कतची सैरच होते आहे आमची
खुप सुंदर फोटो.
खुप सुंदर फोटो.
कसलं भारीय! मला ओम्मान
कसलं भारीय! मला ओम्मान म्हणजे वाळ्वंट , काय असणार तिकडे असुन असुन. उंटावर बसुन खजुर तोडणारी माणसं असं वाटयचं, आता मात्र स्वतःच्या आडाणीपणाची लाजच वाटतीय. कीती मस्त आहे हे. एकदा जायला हवंय!
वा ! वा!! फारच सुंदर.
वा ! वा!! फारच सुंदर.
Pages