मालिका - असे हे कन्यादान

Submitted by भगवती on 26 January, 2015 - 18:53

नुकतीच झी मराठीवर "असे हे कन्यादान" ही मालिका सुरु झाली आहे. सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७:३० वा सुरु झाली आहे.

बापलेकीच्या नात्याचे सुंदर पैलू आपल्याला बघायला मिळतील. तर ह्या निमित्ताने खुमासदार चर्चेला आता सुरुवात होऊ द्या. म्हणून हा नवीन धागा ….

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्या मालिकेचे टायटल साँग बरे आनि ते प्रत्येक ,वेगवेगळ्या बाप -लेकीची फ्रेम दाखवतात.तेच जरा बरं वाटत पाहायला.बाकी सगळ बोअर..

आशुडी.:हाहा:

माझ्या काकुच्या माहेरी एस्टी स्टॅण्डवर दत्ताचे मन्दिर आहे. काही मुले-मुली देवळात जायचे आहे असे सान्गुन बस पकडुन बाहेरगावी पळुन जायचे असे काकु आणी तिच्या शेजारणी, तसेच कॉलेज मधले प्राध्यापक वर्ग म्हणायचे.:फिदी:

लेकीन मेरेकु बीच बीच मे देखनाहीच पडता है, क्या करे साबु टिव्ही हॉलमे लगाके बैठते है, और् वो हॉल स्वयम्पाक घरके बाजुमे हय. मय ना चाहते हुवे भी बीच बीचमे डोकावती हू.:फिदी:

शेवटी बघितला तो ड्रेस . बाप रे असा ड्रेस खर्या आयुष्यात कधी घातला जाईल. ? आमची पोर रोज आंघोळ करून कॉलेज ला गेली तरी धन्य वाटत .
Record केलेला लई भारी नामक picture बघत होते त्याचं मध्ये मध्ये कन्यादान चालू होत.

डोळे बरे आहेत पण तिचे ओठ असे का आहेत ???

या सिरियलचे संवाद एकूणच भयानक आहेत.
आज चुकून प्रोमो पाहिला, तो हिरो हिर्विणीला सांगतोय "तुला माझ्याशी लग्न करण्यापासून कोणी ही वाचवू शकत नाही."
Angry

"तुला माझ्याशी लग्न करण्यापासून कोणी ही वाचवू शकत नाही." >> धमकी!! तिने म्हणावं 'भगवान के लिए मुझे छोड दो' Wink Rofl

सुप्रिया नि शर्वरी दोघी चांगल्या दिसतात हं..

सुप्रिया नि शर्वरी दोघी चांगल्या दिसतात हं.. अनुमोदन

कामही चांगलं करतात.

sorry कोणाच्या व्यंगाबद्दल बोलू नये पण मला हि मधुरा चकणी वाटायची, कॉमेडीची बुलेट ट्रेनची anchor होती तेव्हा. सिरीयल मी बघत नाही.

"तुला माझ्याशी लग्न करण्यापासून कोणी ही वाचवू शकत नाही.">>> हे असले फालतू डायलॉग यातले होते तर .. च्यायला ते ऐकूनच डोक खराब झाल माझं .. पोळी जळता जळता वाचली आज .. :रागः

>>> "तुला माझ्याशी लग्न करण्यापासून कोणी ही वाचवू शकत नाही.">>> <<<<
भिक्कार** डॉयलॉग... एक मवालीसा दाखवलेला कामधंदा नसलेला गुंड, पोरीची इच्छा नसताना तिच्यावर भावनिक/मानसिक जबरदस्ती करतो असे दाखवून निर्माता/दिग्दर्शक/झी ला नेमक्या कोणत्या वीषाचा प्रसार करायचा आहे?

एक मवालीसा दाखवलेला कामधंदा नसलेला गुंड >> काहीही हं !

तो मुलगा बँक एक्झ्युकिटिव्ह वाटतो , आता फोल्डरम्धून पेपर्स काढून लोन प्लान समजावायला लागेल असा.
मवाली , बबाबिऔ दाखवायची होती तर कोणितरी हंक तरी घ्यायचा ना .

>>>> तो मुलगा बँक एक्झ्युकिटिव्ह वाटतो <<<< काहीही हं Proud
मला तो नोकरीधंदा नसलेला बेकार उनाड बेफिकीर गर्दुला तरुण वाटतो.... आत्ता प्यान्टीच्या खिशातून पुडी काढुन कागदावर घेऊन हुन्गत बसेल की काय असे वाटते.

हो नाऽऽ, कॉलेजातच आहे तिच्या, पण दरवर्षी दोनचार गटांगळ्या खाऊन वयाने थोराड अन कॉलेज पूर्ण नाही, म्हणुन नोकरी नाही- बेकार, असा वाटतोय...

Pages