Submitted by समीर चव्हाण on 22 January, 2015 - 02:04
संपली वाट पण देह थांबेचना
चालला जन्म खाईत उमगेचना
खूळ कसलेतरी घेउनी राहिलो
वेड जगलो तरी काय कळलेचना
कोरडे राहिले पात्र डोळ्यांतले
जीव गेला तरी आस ठिबकेचना
एक गुंता तुझा कोठवर सोडवू
मन अताशा मजा घेत अडकेचना
मुक्त येथे कुणी बंधनातून का
आपल्या भोवती हात अपुलेचना
ही निघाली सुसाट्यात गाडी ‘समीर’
लाल सिग्नल कसा काय लागेचना
समीर चव्हाण
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एक गुंता तुझा कोठवर सोडवू मन
एक गुंता तुझा कोठवर सोडवू
मन अताशा मजा घेत अडकेचना
मुक्त येथे कुणी बंधनातून का
आपल्या भोवती हात अपुलेचना<<< व्वा वा
मक्ताही मस्त! समिर केले की उच्चारायला बरे पडेल, पण ते तुला सांगायची गरज नाही.
कोरडे राहिले पात्र
कोरडे राहिले पात्र डोळ्यांतले
जीव गेला तरी आस ठिबकेचना
एक गुंता तुझा कोठवर सोडवू
मन अताशा मजा घेत अडकेचना << हे दोन सर्वाधिक आवडलेत
बाकीचेही छान आहेत
जमीन मुख्यतः ****एचना*** चे रिपीटेशन कानाला फार छान वाटते आहे
आपला तखल्लुसाचा शेर अनेक दिवसानी पाहिला
धन्यवाद
छान
छान
मुक्त येथे कुणी बन्धनातून
मुक्त येथे कुणी बन्धनातून का
आपल्या भोवती हात आपलेच ना ......>>>>>>
मस्त!
एक गुंता तुझा कोठवर सोडवू मन
एक गुंता तुझा कोठवर सोडवू
मन अताशा मजा घेत अडकेचना
मुक्त येथे कुणी बंधनातून का
आपल्या भोवती हात अपुलेचना
वा वा ..आवडले.
गझल आवडली सर, धन्यवाद अनेक
गझल आवडली सर, धन्यवाद

अनेक शेर जितके वेळा वाचतोय तितके जास्त उलगडत आहेत
सगळ्यांचे आभार. दोन-चार लोकं
सगळ्यांचे आभार. दोन-चार लोकं आवर्जून प्रतिसाद देतात, आनंदाची गोष्ट आहे.
समिर केले की उच्चारायला बरे पडेल, ...
बरोबर आहे. समीर केले तर उच्चारायला अवघड आणि समिर केले तर बघायला कसेसे अशी
पंचाईत आहे. तुझ्या मताचा आदर आहेच. माझ्या आवडीन त्यात मी पहिला विकल्प निवडला इतकेच.
धन्यवाद.