Submitted by वैभव फाटक on 20 January, 2015 - 22:52
भेटवस्तूत तोलली आहे
होय, श्रद्धा महागली आहे
ठेव विश्वास आज त्याच्यावर
आज हातात बाटली आहे
गुंफ शेरास तू शिताफीने
तोकडी ही लगावली आहे
तू तिथे गाळलेस अश्रू अन
वीज येथे कडाडली आहे
आजवर जी पहातही नव्हती
आज ती चक्क लाजली आहे
वैभव फाटक, वापी ( ०७-०१-२०१५)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ठेव विश्वास आज त्याच्यावर आज
ठेव विश्वास आज त्याच्यावर
आज हातात बाटली आहे
वा.
सर्व शेर उत्तम आहेत
सर्व शेर उत्तम आहेत
आजवर जी पहातही नव्हती आज ती
आजवर जी पहातही नव्हती
आज ती चक्क लाजली आहे<<< थेट उर्दू ढंगाचा. आवडला.
ठेव विश्वास आज त्याच्यावर
आज हातात बाटली आहे<<< हाही तस्साच, हाही आवडल
आवडली
आवडली
धन्यवाद…
धन्यवाद…
सुंदर गझल वैभव!!!
सुंदर गझल वैभव!!! आवडली!!!!
धन्यवाद
क्या बात है ....
क्या बात है ....