Submitted by आशूडी on 20 January, 2015 - 04:26
तुझ्या डोळ्यांत खोल खोल बुडत असताना
अचानक वर येऊन जेव्हा मी तुझा स्वेटर मागितला
साहजिकच अनपेक्षित मागणीने तू गडबडलास, गोंधळलास
पुढच्याच क्षणी सावरून, गळ्यातला मोत्यांचा कंठा
बहाल करावा अशा थाटात तू तो देऊही केलास..
तुला नक्की ठाऊक होतं या परीक्षेचं कारण
कळूनही न कळल्याचं दाखवण तुझं नेहमीचंच धोरण
मग, लगेचच नंतर लक्षात आल्या तुझ्या काही फुटकळ बाबी
शेवटच्या धुलाईचा दिवस, मळकटलेला रंग आणि लोकर जाडी
'ड्रायक्लिन कर आणि मग वापर' असा साळसूद सल्लाही.
वेडा. मग माझा स्वेटर काय वाईट होता?
सतत हवाहवासा वाटणारा तुझा प्रेमळ ऊबदार स्पर्श
प्रफुल्लित सेंटच्या दरवळात बेमालूम मिसळलेला तुझ्या कष्टांचा गंध
आणि तुझ्या अगदी जवळ असण्याची सुखद जाणीव
बस्स एवढंच हवं होतं मला. स्वेटर नाही काही.
........ हेच ऐकायचं होतं ना तुला?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अविनाश, तुम्ही एकदम नवाच
अविनाश, तुम्ही एकदम नवाच विचार दिलात. मी लिहीताना अशी कल्पनाही केली नव्हती. पुन्हा एकदा वाचून पाहिल्यावर असाही अर्थ निघू शकतो हे पटलंच. विशेष धन्यवाद!
साजिरा, दम कसला रे, सरप्राईज होतं हे माझ्यासाठी.
हे जे सुचलं तसं लिहीलंय..कुठलाच फॉर्म नव्हता त्याला. कविता लिहायचं धाडस नाही म्हणून ललितात टाकलं इतकंच. धन्यवाद सर्वांना.
सुंदर.
सुंदर.
कविता लिहायचं धाडस नाही
कविता लिहायचं धाडस नाही म्हणून ललितात टाकलं इतकंच. >>>>
मस्त!
मस्त!
आवडली.
आवडली.
प्रफुल्लित सेंटच्या दरवळात
प्रफुल्लित सेंटच्या दरवळात बेमालूम मिसळलेला तुझ्या कष्टांचा गंध >> मला हा कष्टांचा गंध हे दोन शब्द फारच आवडले.
आवडली!
आवडली!
Pages