Submitted by आशूडी on 20 January, 2015 - 04:26
तुझ्या डोळ्यांत खोल खोल बुडत असताना
अचानक वर येऊन जेव्हा मी तुझा स्वेटर मागितला
साहजिकच अनपेक्षित मागणीने तू गडबडलास, गोंधळलास
पुढच्याच क्षणी सावरून, गळ्यातला मोत्यांचा कंठा
बहाल करावा अशा थाटात तू तो देऊही केलास..
तुला नक्की ठाऊक होतं या परीक्षेचं कारण
कळूनही न कळल्याचं दाखवण तुझं नेहमीचंच धोरण
मग, लगेचच नंतर लक्षात आल्या तुझ्या काही फुटकळ बाबी
शेवटच्या धुलाईचा दिवस, मळकटलेला रंग आणि लोकर जाडी
'ड्रायक्लिन कर आणि मग वापर' असा साळसूद सल्लाही.
वेडा. मग माझा स्वेटर काय वाईट होता?
सतत हवाहवासा वाटणारा तुझा प्रेमळ ऊबदार स्पर्श
प्रफुल्लित सेंटच्या दरवळात बेमालूम मिसळलेला तुझ्या कष्टांचा गंध
आणि तुझ्या अगदी जवळ असण्याची सुखद जाणीव
बस्स एवढंच हवं होतं मला. स्वेटर नाही काही.
........ हेच ऐकायचं होतं ना तुला?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त
मस्त
(No subject)
आवडली आणि खूप रिलेट झाली.
आवडली आणि खूप रिलेट झाली.
मस्त!!!
मस्त!!!
व्वा, मस्त खूप आवडली.
व्वा, मस्त खूप आवडली.
हाउ रोमॅन्टिक पोयम!!!! मस्त
हाउ रोमॅन्टिक पोयम!!!! मस्त जमली आहे.
खूप क्वचित लिहितेस कविता... नवीन वर्षाचा संकल्प चांगला जमला आहे.
आवडली
आवडली
आशूडी, कविता खूप आवडली.
आशूडी, कविता खूप आवडली.
मस्तं जमलंय.
मस्तं जमलंय.
मस्तच...
मस्तच...
मस्त!!
मस्त!!
छान आशू
छान आशू
गोड!
गोड!
खुपच गोड!
खुपच गोड!
व्वा, मस्त खूप आवडली.>>>>>>+१
व्वा, मस्त खूप आवडली.>>>>>>+१
शेवटचा पॅरा जबरी आहे, मस्त!
शेवटचा पॅरा जबरी आहे, मस्त! आवडली.:स्मित:
छान आहे
छान आहे
खूप आवडली
खूप आवडली
गोड. आवडली.
गोड. आवडली.
वाह मस्त .. उतरतेय
वाह मस्त .. उतरतेय
आवडली.
आवडली.
छानच.
छानच.
साधी पण सुंदर कविता, शेवटच्या
साधी पण सुंदर कविता, शेवटच्या ओळीशिवाय ही कविता परीपुर्ण आहेच. पण शेवट्च्या ओळीने कविता 'काही थांग लागत नाही' अशी झालीये.
..दोघापैकी "एकाला" काही देतानाही "काहीतरी" हवं असणं आणि दुसर्याला "जे पाहिजे" ते मिळालं नाही तरी त्यानं त्या एकाला "हवं आहे" ते देऊ करणं..
ह्यात मोठं मन आहे, समर्पण आहे पण काहीशी विफल निराशा ही आहे असं वाटतंय...
काही संबंध नाही पण ग्रेट गॅटस्बी मधले 'so many shirts' उगाचच आठवून गेले...
सुरेख लिहिलेय शेवटची ओळ
सुरेख लिहिलेय
शेवटची ओळ कौतुकाचीच वाटली, कलाटणी अथवा धूसर करण्याचा प्रयत्न नसावा बहुतेक.
काय हवे आणि कशासाठी हवे...हा भाव खूपच छान उतरलाय.
अविनाशभाऊ, Great Gatsby चा संदर्भ interesting, पण इथली नायिका डेझीहून निरागस वाटतेय
गोड
गोड
हे ललित आहे की कविता ? बरच
हे ललित आहे की कविता ? बरच काव्यसदृष वाटतय !
सुंदर, खुप आवडली. शब्द
सुंदर, खुप आवडली.
शब्द खुणांमधे स्वेटर
अविनाश, तुमच्या
अविनाश, तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. टोटली न्यू पर्स्पेक्टिव्ह, अँड पुटिंग एव्हरीथिंग अपसाईड डाऊन, अँड आय वॉज स्टन्ड!
मूळ शब्दरचनेत यासाठी दम असावा लागतो, तो इथं आहे- हे कबूल केलं पाहिजे.
धन्यवाद साजिरा.. बहुतेक
धन्यवाद साजिरा..
बहुतेक वेळा शब्द 'विनाकारण' असतात .पण काही वेळा असतही नाहीत.. शेवटी शेवटी आलेले तर अजिबात असत नाहीत . आत दाबून ठेवलेलं उसळून येतं ते सगळं 'शेवटी शेवटीच' असतं.
..शेवटी ही कविताच आहे, पण ही सगळी कविताच " शेवटची ओळ" लिहिण्यासाठी लिहिली गेली आहे असं मला वाचताना जाणवून गेलं इतकंच..
वा वा अविनाश
वा वा अविनाश
Pages