आणि तोही दिवस आठवतो...
कितीतरी युगं पुढे नेऊन ठेवलस त्या दिवशी तू मला...
यमुनेकाठची अशीच एक सुंदर सकाळ होती ती. पाणी भरता भरता, एका क्षणी तू थबकलीस, पुन्हा घट यमुनेत रिकामा केलास; अन पुन्हा भरू लागलीस. जरी मी पावा वाजवत असलो तरी लक्ष तुझ्याकडेच होतं माझं. तू पुन्हा घट रिकामा केलास अन पुन्हा भरू लागलीस...???
हसलीस अन वळून माझ्याकडे पाहिलस. मी नजरेनेच तुला काय विचारलं. तर तूही नजरेनेच जवळ बोलावलस. मी पावा थांबवला अन उठलो, तुझ्याजवळ यमुनेत पाय टाकत काही बोलणार, तर नजरेनेच गप्प केलस. आणि पावा वाजव म्हणालीस.अन एक नजर घटातल्या पाण्याकडे टाकलीस.मी पुन्हा आसावरी छेडला. वादी ध पाशी आलो तशी तू मला थांबवलस आणि घट पाण्यात बुड्वून भरलास.... माझ्या आसावरीतला ध तू बरोब्बर साधलास.
मग पुन्हा थांबलीस म्हणालीस, " मी रा..."अन घटातून पुन्हा धा वाजवलास. पुन्हा म्हणालीस " मीरा..." अन घट पाण्यात न बुडवता मला सामोरी झालीस अन माझ्या डोळ्यात खोलवर पाहिलस. सर्र्कन माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले.... आजवर माझ्याही लक्षात न आलेली गोष्ट तू अशी लख्ख उभी केलीस डोळ्यासमोर... तू मीरा......
तू खूप गूढ हसलीस अन पाठमोरी होत तो अर्धा भरलेला घट घेऊन निघून गेलीस. छे अर्धा माझ्यासाठी यमुनातीरी ठेऊन गेलीस. त्या मीरेला पोटात सामावून घेत, आतल्या आत रिचवत कितीतरी शतकं तसाच उभा आहे मी... राधे... मीरा....धे....
.....
राधे...१. http://www.maayboli.com/node/51393
राधे...२. http://www.maayboli.com/node/51440
राधे...३. http://www.maayboli.com/node/51543
राधे...४. http://www.maayboli.com/node/51594
राधे...५. http://www.maayboli.com/node/51968
राधे...७. http://www.maayboli.com/node/54215
वाह! क्या बात है!
वाह!
क्या बात है!
नेहमीप्रमाणेच सुरेख
नेहमीप्रमाणेच सुरेख
अवल.... किती थोडक्या शब्दात
अवल....
किती थोडक्या शब्दात अर्धा घट घेऊन घरी परतणारी मीरा तू चितारलीस !! समोर आली झटदिशी आणि त्यासोबत तिच्या चालीतील ओढही...जायचे आहे घरी...जायचे नाही घरी....घटाचे आहे निमित्त...सजनासाठी परतायचे आहेही... नाहीही....हा खेळ फार लोभस....पावा गुंजत आहे, छेडत आहे आसावरी....सारेच स्तब्ध आहेत यमुनेकाठी....
आसावरीतील रचना "रुक जा रात ठहर जा रे चंदा...." लता गात आहे...आता तुझे विचार वाचताना वाटत आहे अरे ही तर मीराच जणू.
वाह!!
वाह!!
वाह! दुसरे शब्दच नाहीत.
वाह! दुसरे शब्दच नाहीत.
मस्तच गं!............
मस्तच गं!............
राध्ये मस्तच...
राध्ये मस्तच...
मस्त.. पटकन संपलं पण. 'आपली
मस्त..
पटकन संपलं पण. 'आपली लाडकी यमुनेकाठची' या वाक्यात लाडकी या शब्दाची जागा बरोबर वाटत नाहीये. एकतर तो 'सकाळ' ला जोडून हवा किंवा नकोच त्या वाक्यात.
मस्त.. पटकन संपलं पण. >>>
मस्त..
पटकन संपलं पण. >>>
मस्त!
मस्त!
धन्यवाद सर्वांना आशुडी बरोबर
धन्यवाद सर्वांना
थँक्यु
लक्षात ठेवते हे, पुढचा मोठ्ठा लिहेन 
आशुडी बरोबर आहे तुझं, काढते तो शब्द
संंपलं पण पटकन...
मस्त!
मस्त!
अवल...... रोमांच उभं राहिलं
अवल......
रोमांच उभं राहिलं हे वाचुन.....>>तू खूप गूढ हसलीस अन पाठमोरी होत तो अर्धा भरलेला घट घेऊन निघून गेलीस. छे अर्धा माझ्यासाठी यमुनातीरी ठेऊन गेलीस. त्या मीरेला पोटात सामावून घेत, आतल्या आत रिचवत कितीतरी शतकं तसाच उभा आहे मी... राधे... मीरा.<< व्वा व्वा !! क्या बात !!!!!_________/||\___________
म स्त !
म स्त !