सरोवराकाठी त्यांची पार्टी पूर्णं रंगात आली होती, वेगवेगळ्या झाडांपासून मिळवलेली मद्ये, मोसमात उपलब्ध असलेली फळे, अनेक तर्हेच्या झाडांच्या पानांना एकत्र करून तयार केलेल्या खाद्यकृती, सोबत जिभेला झणका देणार्या मुळ्या. हो, असेच सगळे, कारण आता जिभेचे बाकी चोचले पुरवायला दूर दूरपर्यंत एकही शिकार उपलब्ध होत नव्हती, जी काही थोडीफार शिकार शिल्लक होती ती सुद्धा संरक्षीत करून फार दूरवर नेऊन ठेवण्यात आलेली होती.
पार्टीतल्या काहीजणांचे दु:ख हेच होतं आणि ते त्यांच्या चेहर्यावरून स्पष्ट जाणवत होतं. मध्यभागी कोंडाळं करून बसलेल्यांपासून दूर अस्वस्थपणे इकडे तिकडे फिरताना त्यांच्यातल्या एकानं ती अस्पष्ट चाहूल टिपली.. नक्कीच आज नशीब जोरावर होतं, पावलांचाच आवाज तो.. एकमेकांशी नेत्रपल्लवी करत तिघेही आवाजाच्या दिशेनं सरकले. काही पावलातच सावज नजरेच्या टप्प्यात आलं, आणि तिघांनीही त्याला टिपण्यासाठी धाव घेतली...
तेवीस शक्य समांतर विश्वातील अशक्यप्राय घटना पाहून त्यानं नुकताच चोविसाव्या विश्वात प्रवेश केला, तहानेनं कोरडा पडलेला घसा ओला करण्यासाठी समोरच्या सरोवराकडे जाताना आजूबाजूनं अचानक आलेल्या आवाजानं तो दचकला, काही क्षणच.. पुढच्याच क्षणी तो जमिनीवर कोसळलेला होता..
जमिनीवर निष्प्राण पडलेल्या आपल्या शिकारीकडे विजयी नजरेनं पाहत त्या तिन्ही हरणांनी जल्लोष केला, खुप काळानंतर आज त्यांना मांसाहार मिळणार होता.
नीट कळलं नाही... तेवीस समांतर
नीट कळलं नाही... तेवीस समांतर विश्वं वगैरे
बापरे, मस्त. कथाकल्पना आवडली.
बापरे, मस्त. कथाकल्पना आवडली.
वेगळी कल्पना. ( डोक लावा )
वेगळी कल्पना.
( डोक लावा )
सुपर कथा, कचा. खूप आवडली.
सुपर कथा, कचा. खूप आवडली.
कवठीचाफा, कथा मस्तच आहे.
कवठीचाफा, कथा मस्तच आहे. कल्पना आवडली.
बादवे, इथेही चोविस?
कचा, मस्त कथा कल्पना ! सहीच
कचा, मस्त कथा कल्पना ! सहीच !
कचा, मस्त कथा कल्पना ! सहीच
कचा, मस्त कथा कल्पना ! सहीच !>>>+१
चाफ्या
चाफ्या
व्वा! भारीच कल्पनाशक्ती. एकदा
व्वा! भारीच कल्पनाशक्ती. एकदा जोरदार टाळ्या हं! खास चाफ्फा स्टाईलसाठी
भारीच!!!
भारीच!!!
सुपर!
सुपर!
धन्यवाद मंडळी बेदाणा, त्या
धन्यवाद मंडळी
बेदाणा, त्या चोविस आणि या चोवीसचा एकमेकांशी आजिबात संबंध नाही
ग्रेट!
ग्रेट!
24 आकड्याला पुरते बदनाम करून
24 आकड्याला पुरते बदनाम करून टाकले आहे
कथा चांगली आहे
कल्ला रे आश्या... लै भारी !
कल्ला रे आश्या...
लै भारी ! सगळाच 'गोपाळकाला'
आवडली
भारीच..हटके..कचा स्टाईल
भारीच..हटके..कचा स्टाईल
लय भारी
लय भारी
त्या चोविस आणि या चोवीसचा
त्या चोविस आणि या चोवीसचा एकमेकांशी आजिबात संबंध नाही >> हे लिहायला नको होतेस
एक नंबर कथा फार आवडली
एक नंबर कथा फार आवडली
परत वाचली ही कथा.
परत वाचली ही कथा.
हटके.....मस्त!
हटके.....मस्त!
हा हा मस्तच. शेवटचे वाक्य
हा हा मस्तच. शेवटचे वाक्य भारी
थोडं काही डोक्यात जाईल असं
थोडं काही डोक्यात जाईल असं रेफेरेंस मिळेल का ?