Submitted by समीर चव्हाण on 14 January, 2015 - 01:11
माझ्यासोबत जाइल माझी इच्छा बहुधा
सुटण्याचा कुठलाही नाही रस्ता बहुधा
माझ्या मागे नव्हते कोणी, नाही कोणी
अंत नसावा एकाकी जगण्याला बहुधा
वाट किती साधी पण नेते कोठेकोठे
भांबावुन जाईल पुढे जाणारा बहुधा
पोचावे सगळेच इथे एकाच ठिकाणी
आधी का नंतर हा चिल्लर मुद्दा बहुधा
सुकणा-या झाडाला पडली फांद्यांची तर
फांद्यांना पडली इवल्यांची चिंता बहुधा
टीपः माझे मित्र अनंत ढवळे ह्यांच्या मी इतिहासाचा एखादा सांधा बहुधा ह्या गझलेची जमीन किंवा तिचा मोह ह्याचा परिपाक म्हणजे बहुधा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एक्कुणएक शेर आवडले ढवळेसरांची
एक्कुणएक शेर आवडले
ढवळेसरांची ती गझलही अप्रतीमच आहे
मला फक्त शेवटच्या शेरात इवल्यांची म्हणजे काय ते नीट समजले नसावे बहुधा इवले म्हणजे पक्षी का किंवा इवले म्हणजे कोवळी पालवी ?
चिल्लर हा कानाला खरखरीत वाटणारा शब्द फार मजा देवून गेला
असो
धन्यवाद समीरजी
सुंदर
सुंदर
पोचावे सगळेच इथे एकाच
पोचावे सगळेच इथे एकाच ठिकाणी
आधी का नंतर हा चिल्लर मुद्दा बहुधा
सुकणा-या झाडाला पडली फांद्यांची तर
फांद्यांना पडली इवल्यांची चिंता बहुधा <<<
सुंदर शेर!
"पोचावे सगळेच इथे एकाच
"पोचावे सगळेच इथे एकाच ठिकाणी
आधी का नंतर हा चिल्लर मुद्दा बहुधा" मस्त !
मी इतिहासाचा एखादा सांधा
मी इतिहासाचा एखादा सांधा बहुधा<< एकंदर जमीन वाचून ते जाणवलंच . ती सुध्दा एक आवडती गझल.
ही पण छान झालीय.
वाट किती साधी पण नेते कोठेकोठे
भांबावुन जाईल पुढे जाणारा बहुधा
पोचावे सगळेच इथे एकाच ठिकाणी
आधी का नंतर हा चिल्लर मुद्दा बहुधा
खूप आवडले हे शेर.
वाट किती साधी पण नेते
वाट किती साधी पण नेते कोठेकोठे
भांबावुन जाईल पुढे जाणारा बहुधा
पोचावे सगळेच इथे एकाच ठिकाणी
आधी का नंतर हा चिल्लर मुद्दा बहुधा
सुकणा-या झाडाला पडली फांद्यांची तर
फांद्यांना पडली इवल्यांची चिंता बहुधा
आवडली गझल
सगळ्यांना धन्यवाद. इवल्यांची
सगळ्यांना धन्यवाद.
इवल्यांची ह्या शेरात तीन पिढ्यांचा रेफरन्स आहे.
सुंदर!!! धन्यवाद सर
सुंदर!!! धन्यवाद सर
पोचावे सगळेच इथे एकाच
पोचावे सगळेच इथे एकाच ठिकाणी
आधी का नंतर हा चिल्लर मुद्दा बहुधा
छान आहे शेर….
चिल्लर च्या जागी 'शुल्लक' सुद्धा छान बसेल.
चिल्लर च्या जागी 'शुल्लक'
चिल्लर च्या जागी 'शुल्लक' सुद्धा छान बसेल.
सहमत. शुल्लक शब्द डोक्यात आला नाही लिहिताना.
धन्यवाद. जयदीपराव आपलेही धन्यवाद.
शुल्लक नव्हे, क्षुल्लक
शुल्लक नव्हे, क्षुल्लक
शुल्लक नव्हे, क्षुल्लक हा हा
शुल्लक नव्हे, क्षुल्लक
हा हा हा. हा क्षुल्लक शब्द निसटला.
शुल्लक नव्हे, क्षुल्लक
शुल्लक नव्हे, क्षुल्लक ===>
अच्छा. धन्यवाद.