येथेच घडले हिंदुस्थानचे, राजे शिवछत्रपती

Submitted by गणेश पावले on 7 January, 2015 - 01:09

जन्मताच मातेने त्यांना शिकविले शौर्य
सळसळलं रक्त अंगी पाहून, सुलतानी क्रूर क्रौर्य
क्रोधाग्नी भडकला, वळल्या हाताच्या मुठी
येथेच घडले हिंदुस्थानचे, राजे शिव छत्रपती

बाटत होत्या आया बहिणी, विटली माय मराठी
हिंदुत्वाची आग विजली, अन दिवसाढवळ्या लुटी
गर्जला मराठा अशावेळी, जागल्या तलवारीच्या पाती
येथेच घडले हिंदुस्थानचे, राजे शिव छत्रपती

आक्रोश होता दाही दिशा, कुठे दुष्काळी सावट
पातशहांचे जुलूम वाढले, होते हिंदुत्वावर संकट
पेटली ठिणगी एक, फुलली अभिमानाने छाती
येथेच घडले हिंदुस्थानचे, राजे शिव छत्रपती

स्वराज्याचे तोरण बांधून, मावळा लढायास तयार
हर हर महादेव गर्जुनी, मावळा मरायास तयार
स्थापिले स्वराज्य सह्याद्रीत, पसरली दाही दिशा कीर्ती
येथेच घडले हिंदुस्थानचे, राजे शिव छत्रपती

© कवी - गणेश पावले.
९६१९९४३६३७

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users