गगनगड हा इसवी सन.- १२०० च्या शतकात राजा भोज या राजाने बांधला. गगनगड निसर्गाचे एक अदभूतपूर्व लेणे लाभलेला आणि समुद्र सापाठीपासून ३००० फुट उंचीवर बांधलेला हा गगनगड अर्धा कोकण आपल्या नजरेत सहज काबीज करतो. त्यामुळेच या गडाची भुरळ पडली असावी ती आपलं हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या छ. शिवाजी महाराजांना. या गडाचा उल्लेख छ. शिवाजी महाराजांच्या इतिहासात कुठेच झालेला दिसून येत नाही. राजा भोज नंतर या गडावर बर्याच राजांनी राज्य केले. छ. शिवाजी महाराज या गडाचा उपयोग गोदामासाठी करायचे. त्याची साक्ष गडावर असणाऱ्या गुहाच देतात.
या गडाला नवी ओळख मिळाली ती प्रसिद्ध नाथ संप्रदाय श्री गगनगिरी महाराज यांच्यामुळे परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांची ओळख म्हणजे हि प्राचीन व सळसळत्या योग परंपरेतला अधिकारी पुरूष अशी आहे. महाराजांनी आपल्या अविरत योगसाधना व संन्यस्त जीवनाने लक्षावधी भक्त-साधकांच्या जीवनात जे चैतन्य निर्माण केले. ते मात्र चिरंतन राहील. महाराजांचे १०२ वर्षांचे जीवन म्हणजे साधक किती अनासक्त होऊ शकतो, किती कठोर तप आचरू शकतो, याचे मूतिर्मंत उदाहरण!
गगनगड म्हटलं तर सर्वांचा गोंधळ उडतो. प्रश्न पडतो की या गडाचा उल्लेख इतिहासात कुठेच कसा नाही काही जण शंकाही घेतात. पण यात दोष त्यांचा किंवा या गडाचाही नाही. उपेक्षा आणि दुर्लक्ष यामुळे या गडाच्या वाटय़ाला आलेले हे नशीब म्हणावे! भुईबावडा गावच्या पूर्वेला ऐन घाटमाथ्यावरच सह्याद्रीच्या डोंगर रांगात वसलेला हा गगनगड याच कुंडलीतला!
गगनबावडा या तालुक्यातूनच एक रस्ता या गगनगडावर जातो. आता तेथे चारचाकी गाडी जाईल असा मोठा रस्ता बांधण्यात आला आहे पूर्वी तेथे डोंगर दर्यातून जाणारी एक अरुंद वाट होती झाडा झुडपातून वाट काढत त्या गडावर जावे लागे. दुसरा रस्ता म्हणजे भुईबावडा गावातून जाणारा तळीवाडी येथून हा रस्ता आता राहिलेला नाही. उभा डोंगर चढून कडे कपारीतून थेट गडावर जायला हा रस्ता होता. पण भुईबावडा घाट झाल्यापासून या रस्त्याचा वापर कमी झाला आणि घनदाट जंगलात लुप्त झाला. अशा प्रकारे भुईबावडा गावाच्या डोक्यावर वसलेला हा गगनगड! भुईबावडा या गावातून गडावर जाण्यासाठी एसटी बस (सकाळी 8 आणि दुपारी 1 वाजता) इथे जाण्यासाठी सोयीची. कोल्हापूर शहरापासून गगनबावडा येथे येण्यासाठी एसटी बस ही गडावर येण्यासाठी सोयीची. तेथून गडावर जाण्यासाठी आपली दोन पायांची गाडी आहेच मदतीला!
गगनगडाला भेट द्यायची असेल तर गगनबावडा या तालुक्यात मुक्कामाला यावे. तेथून १ किलोमीटर वर असणारा हा गगनगड आणि त्याची माहिती आपल्याला जाणून घेता येईल. रात्रीच्या अंधारात भोवताल समजत नाही. पण सकाळी उजाडले, की घाटावरचा हा गगनगड दोन हात करत समोर उभा राहतो. पावसाळ्यात तर वेगळीच मजा असते. दाट धुक्यात गडावर तो डोंगराच्या कुशीतून जाणारा रस्ता आणि लागणारी थंड हवा अंगावर शहारे आणते. गगनगडाच्या पायथ्याशी असणारा भुईबावडा गाव तर धुक्यात हरवून जातो. या धुक्यात गडाच्या बुरुजावर उभे राहिले तर आपण आकाशात उडतोय / फिरतोय असा अनुभव नाही आला तर नवलंच.!
गडावर जातानाच प्रवेश द्वारा पूर्वी लागणार म्हसोबाच छोटस मंदिर आणि आ..! वासून उभा असलेला दगडात कोरलेला म्हसोबा. प्रवेश दारातून समोरच्याच गुहेत असणारा गडाचा गाभारा आणि गगनगिरी महाराजांचा मठ! तेथे दर्शन घेवून मग पुढे गगनगड फिरायचा. वरती गेल्यावर गगनगिरी महाराजांनी बांधलेले दत्त मंदिर आणि तेथे असणारी महाराजांची जिवंत भासणारी मूर्ती आगदी जवळ जावून पहावी. गडावर जमलेली वानरसेना तर तुमच्या स्वागतास सज्ज असते. गडावर असणारा एक भली मोठी तोफ, काही कोरीव शिल्पं, दत्ताची रत्नजडित मुर्ती. बुरुजावर जाताना वाटेत लागते ते शिव मंदिर याच मंदिराच्या खालच्या बाजूने एक अरुंद वाट जाते. त्या वाटेने पुढे गेलात कि आपल्याला गडाच्या पोटात असणारे तुडुंब पाण्याने भरलेले तलाव पाहायला मिळतील.
गगनगडाच्या बुरुजावर भर उन्हात चालत जाईपर्यंत चांगलाच घाम निघतो. पण मग इथे आलो की त्यावर फुंकर घालण्यासाठी चारही बाजूनी सो-सो जोरदार वारा तयारच असतो. वरती पोहोचताच समोर असणारी जुनी पण मजबूत मज्जीद. गगनगडाचा हा बुरुज म्हणजे सहय़ाद्रीची खिडकीच म्हणावी लागेल. गगनगडासारखे सारखे असंख्य उंच उंच डोंगर-पर्वत आपल्या पुढय़ात गर्दी करतात. बुरुजावर त्या मज्जीद जवळ उभे राहून दिसणारे दृश्य मात्र अवघ्या सहय़ाद्री भूमंडळाचे असते. खोल दरीत दिसणारा भुईबावडा गाव, डाव्या बाजूला करूळ गाव आणि संद्याकाळच्या वेळी मावळतीला जाणारा सूर्य असे हे दृश्य म्हणजे जणू कृष्णांन देवकीला दाखवलेले ब्रम्हांड.!
गगनगडाची ही गगनभेदी उंची आणि तुटलेले सरळ कडे, यामुळे त्याला तटबंदीची जोड ही आवश्यक तिथेच! यातही तळ कोकणावर लक्ष ठेवणारा हा बुरूज पाहण्यासारखा! गडमाथ्यावर सदर, दारूगोळय़ाचे कोठार, शिबंदीची घरटी, पाण्याची टाकी अशा दुर्गाच्या अनेक खाणाखुणा! फक्त या साऱ्यांवर आता प्रचंड गवत-झुडपे माजल्यामुळे फिरताना साहसापेक्षा सतत सावधपण असावे लागते.
हे सारे पाहिले, की मग गगनगडाच्या इतिहासाचे उत्खनन सुरू होते. गडाच्या पोटातील गुहा खोदीव टाक्यांवरून त्या नि:संशय प्राचीन असाव्यात. पाण्यानी भरलेली डोंगराच्या कुशीतली अनेक तलाव. कोकणातून-देशावर चढणाऱ्या अनेक घाटवाटांचा हा आधारस्तंभ! इसवी सन १२०० मध्ये बांधलेल्या या गडावर किती सत्ता नांदल्या असतील! शिवशाहीत या गडाचा झालेला वापर आणि उंच उंच काळ्या दगडाचे कडे पाहताना.. फिरताना एक प्रकारची मनात भीतीच वाटते, गगनगडाचे हे रूप अंगावर काटा उमटवून जाते!
अनेक वर्षे लोटली तरी पूर्वजांच्या या असल्या कर्तृत्वाचा वारसा आहे तसा आहे. गडावर आता खूप सुधारणा झालीय. येते राहायला पर्यटकांसाठी राहण्याची सोय केलेली आहे. दर गुरवारी येथे महाप्रसाद दिला जातो. सर्व सोयींनी सुसज्ज अशा कार्याला सलाम!
एकदा तरी आपण ही या गगनगडाला जरूर भेट द्या..!
लेखक -
गणेश पावले
सुंदर माहिती, आणि फ़ोटो. आणि
सुंदर माहिती, आणि फ़ोटो.
आणि हा लेख " कविता” "विभागात दिसतोय तो"लेख " विभागात द्या.
सुंदर वर्णन...
सुंदर वर्णन...
इंद्रधनुष्यजी.......... धन्यव
इंद्रधनुष्यजी..........
धन्यवाद __/\__
छान लेख.
छान लेख.
सुंदर वर्णन आहे. खोपोलीतही एक
सुंदर वर्णन आहे.
खोपोलीतही एक गगनगिरी महाराजांचे मठ आहे. त्या मठातून नदी वाहते. व तिथली महाराजांची मुर्तीही जिवंतच भासते.