Submitted by काउ on 19 December, 2014 - 09:45
संक्रांती जवळ आली.
आज वांगे पावटे भाजी केली. तेलाच्या फोडणीत कढीपत्ता , लसुण ,कांदा , टोमटो यांचा किस घालुन त्यात वांग्याच्या फोडी थोडे पाणी घालुन शिजत ठेवल्या. मग त्यात आधीच शिजवलेले पावटे घातले. थोडे पावटे क्रश करुन मिसळले. तिखट , मीठ, गूळ ,मसाला गरजेनुसार. शेवटी ग्यास बंद करताना दोन चमचे दही घालुन मिसळुन घेतले.
हा धागा वांगे फॅन क्लबसाठी.
वांग्याच्या भाज्या , भरीत , काप ..
इ इ
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वांग्याचे काप. ताम्दळाचे पीठ
वांग्याचे काप.
ताम्दळाचे पीठ / रवा / बेसन लावुन शॅलो फ्राय.
http://www.maayboli.com/node/30948
वांग्याच्या मी पण काही
वांग्याच्या मी पण काही पाककृती लिहिल्या होत्या. याबाबत एक मजेशीर आठवण आहे. नगर जिल्ह्यातील एक मित्र युरपमधे एकटाच रहात होता. त्याला वांगीबटाटाशिवाय दुसरी भाजी जमत नसे. पण तो एक शक्कल लढवे. एका दिवशी नुसतीच वांगी, तर दुसर्या दिवशी नुसतेच बटाटे, तिसर्या दिवशी दोन्ही तर चवथ्या दिवशी रस्सा खात असे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला कोरीयन एअरलाइन्स वर वांग्याचा एक गोड पदार्थ दिला होता. वांगे कांदे यांचे गोड लोणचेही मी चेंबूरला एका हॉटेलमधे खाल्ले होते ( आता नाही ते होटेल
)
अजून लिहीनच.
वरची भाजी मात्र छान आहे.
मस्तं दिसतेय फोटोतली
मस्तं दिसतेय फोटोतली वांगंभाजी. पाकृ आवडली.
बघा बघा! जामोप्यांनाही
बघा बघा!
)
जामोप्यांनाही प्रेझेंटेशन करावेसे वाटू लागले.
पुर्षांच्या पाक्रुला हे प्रेझेंटेशनचं टेंशन अस्तं. म्हणून जास्त बल्लव इथं लिहीत नाहीत.
फोटूला १० पैकी ९ मारकं.
(काकडी अवांतर आहे, प्लस सोलली नाही म्हणून १ कापला
वांग्याच्या बाबत मी
वांग्याच्या बाबत मी एक्स्ट्रीम स्विंग झालेय.
म्हणजे पूर्वी अज्जिबात न आवडणारी ही भाजी आता अगदी आवडते.
मस्त आहे वरचा फोटो. एकदम
मस्त आहे वरचा फोटो. एकदम टेंप्टींग.
वा वा ! काउकाका , मस्त दिसतेय
वा वा ! काउकाका , मस्त दिसतेय हो भाजी . तोंपासु
छान वाटतिय भाजी! वर थोडा हरा
छान वाटतिय भाजी! वर थोडा हरा धनिया टाकायला हवा होता.
काउकाकांच्या वांगे क्लबात ,
काउकाकांच्या वांगे क्लबात , हे वांग्याचे कापरूपी माझे योगदान
भाजी आणि कापृपी योगदान मस्तच.
भाजी आणि कापृपी योगदान मस्तच.
ंमी या क्लबची आजन्म मेंबर
ंमी या क्लबची आजन्म मेंबर असेन. वांगे इतके आवडते कि दोन दिवसाच्या वर वांग्याशिवाय मी राहू शकत नाही.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
सगळ्यात आवडता प्रकार म्हणजे आईच्या हातची हिरव्या वांग्याची तडतडीत भाजी. भाकरीचा खोल्गट तव्यामध्ये भाकरी झाल्या कि त्यात तेल जरा जास्त घालुन, फक्त शेंगदाण्याच कुट आणि आमच घरच मसाल्याच तिखट घालुन केलेली भाजी. ही भाजी जास्त शिजवलेली नसते आणि पाणि उगाच आपल असल तर असल.
बाकी नंतर .आईची आठवण आली.
वांग्याचे भरीत , भरलेली वांगी
वांग्याचे भरीत , भरलेली वांगी जस्ट लव ईट!
फोटो मस्त आहेत. आय लव वांगं.
फोटो मस्त आहेत. आय लव वांगं. भरीत तर पोट पुर्ण भरलेले असेल तरी खाऊ शकते. नुसते पण खाते.
भरताचे वांगे सोलताना मी आतला
भरताचे वांगे सोलताना मी आतला गर खातो, छान लागतो.बाकि वांगे खेंदाताट छान लागते.
काउ... मस्त रेसीपी... पण टाइप
काउ...
मस्त रेसीपी...
पण टाइप करतांना किती घाई...(कदाचित आय.डी. डिलीट व्हायच्या आत पा.क्रु. प्रकाशीत करायची असेल. लब्बाड...)
"तेलाच्या फोडणीत कढीपत्ता लसुण कांदा टोमटो किस घालुन त्यात वांग्याच्या फोडी थोडे पाणी घालुन शिजत ठेवल्या. मग त्यात आधीच शिजवलेले पावटे घातले. थोडे पावटे क्रश करुन मिसळले. "
ना स्वल्प विराम ना आधीच्या वाक्यांना शेंडा ना बुडखा....
आता हितेस कडून घेतलेली मिसळपावची पा.क्रु. कधी?
जामोप्या, गावाकडनं आली होती
जामोप्या, गावाकडनं आली होती काय वांगी?
@ टण्या... आपल्याला काय
@ टण्या...
आपल्याला काय करायचे आहे?
वांगी कुठूनही का येइनांत..तिसर्या मुंबैतल्या भाजीवाल्याकडून किंवा कर्नाटकातून... काउला स्वयंपाक येतो, हे दाखवायचे आहे त्यांना....
काउ, तू काही जास्त लक्ष देवू नकोस.... आणि परत नविन काहीतरी मर्मभेदक धागा उकरून काढ...
@ टण्या... आपल्याला काय
@ टण्या...
आपल्याला काय करायचे आहे?
>>>>
अहो पण मला इंटरेस्ट आहे ना. आम्ही आणि जामोप्या गावशेजारी आहोत. ज्यांनी आमच्या इकडची वांगी खाल्ली आहेत त्यांना कळेल वांगी कुठून आली ते किती महत्त्वाचे आहे ते.
नाही . ही वांगी मानखुर्दची..
नाही . ही वांगी मानखुर्दची.. मानखुर्दला पी एम जी कॉलनीत दांडगा बाजार भरतो.. भाज्या अगदी मस्त असतात. मst टाईमपास होतो.
भाजीवालीने दोन नमुन्याचे वाटे लावले होते. लहान हिरवी आणि मोठी जांभळी .. भाजी की भरीत ? आमचं एकमतच होत नव्हतं .. शेवटी भाजीवाली ओरडली लेना है तो जल्दी लेव. पीछे और गिराइक है.
भरीत करायचं म्हणजे दही घालावे लागणार. बिनदह्याचे भरीत आम्ही नै खात ! चार दिवस घरात सर्दीचं थैमान सुरु आहे. म्हणुन मग अखेर भाजीची वांगीच घेतली.
डोंबोलीत फडके रोडला मस्त भाज्या मिळतात.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
@ काउ.... तुम्ही डॉ. ना? तरी
@ काउ....
तुम्ही डॉ. ना?
तरी पण "चार दिवस घरात सर्दीचं थैमान सुरु आहे...."
अरेरे....
तुम्हाला खूद्द तुमची सर्दी बरी करता येत नाही....
असो,
आँ !
आँ !
@ काउ ते आँ, आम्ही
@ काउ
ते आँ, आम्ही म्हणायचे...
एक डॉ. असून तुम्ही स्वतःची सर्दी बरी करू शकत नाही...ते पण चक्क ४ दिवस....हा मुद्दा ध्यानात आला....
छान....
छान....
उद्या तुमच्या घराचे फाटक बाद
उद्या तुमच्या घराचे फाटक बाद झाले तर आम्ही आँ करुन म्हणु ... स्व्तः फाटक आहेत आणि घराचं फाटक कसे बिघडले ?
काय हे काउ... अहो...आडनावाचा
काय हे काउ...
अहो...आडनावाचा आणि वस्तूंचा काय संबंध? तसेच व्यवसायाशी...
असो,
एकूणच तुमच्या अवतारांविषयी खात्री वाटत चालली आहे... एकूण काय? तर तुम्ही डॉ, असून पण सर्दी बरी करू शकत नाही, हे सत्य आणि हे सत्य पचवायची ताकद तुमच्याकडे नसल्याने तुम्ही हे असे आडनावरून बोलणारच....
विरारकडे मिळणारी चुलीवरची
विरारकडे मिळणारी चुलीवरची वांगीपावटेशेवग्याच्याशेंगाचा रस्साभाजी अधिक तिकडचा जाडा भात कोणी ओरपलं आहे का ?याचे फैन आहोत.
वांग्या च्या भाजित लोखंडी
वांग्या च्या भाजित लोखंडी फाटक सर्दि स्वल्प विराम अल्प विरा शेंडा बुडखा... काय काय चालय...
रेसिपी वाचायची करुन बघायची खायची.सर्दि काना, मात्रा कशाला बघायचा.
आमच्य इकडे कधी कधी हि पांढरी
आमच्य इकडे कधी कधी हि पांढरी वांगी मिळतात.
(अवांतरः हि पांढरी वांगी बघूनच इन्ग्रजीत वांग्याला एगप्लांट म्हणतात कि काय?)
हे आचारी बैंगन. म्हणजे लोणच्याचा मसाला (बेसन मधे मिसळून) भरून परतलेली वांगी.
@ सुरेख... त्याचे काय आहे...
@ सुरेख...
त्याचे काय आहे... आमची "काउ" इतर धाग्यांचे पण असेच करते.....मग आम्ही पण तेच केले आहे......
असु द्या हो. आमचे धागे चितळे
असु द्या हो.
आमचे धागे चितळे मास्तरच्या तासागत असतात.
गोदीच्या पदरापासुन रघुवंशापर्यंत सगळ्याची चर्चा अलाउड आहे
Pages