आज स्वतःने स्वतःचीच गोष्ट लिहायची ठरवली तेव्हा स्वतः रस्त्यावरचं ऊन पाहत खिडकीत बसला होता. ऊन हळुहळू फाटकातून आत शिरत होतं आणि स्वतः त्याच्या कडे नजर रोखून पाहत होता.
स्वतः ला उन फार आवडतं, अगदी शेजारच्या झाडावरच्या घरट्यापेक्षा, त्यातल्या छोट्याश्या पिल्लापेक्षा आणि त्या पिल्लाला पळवून न्हेण्याच्या कल्पनेपेक्ष्याही जास्तं!
उन्हात बसलं की आतला गारठाही थोडा उबदार होतो असं स्वतः मला परवाच सांगत होता. तो म्हणे एकदा एका ओसाड रानामध्ये हरवला होता. रात्र होऊ लागली, सूर्य अस्ताला गेला. रानात अंधार वाढू लागला. हळू हळू अंधाराला पसरायला जागाच राहिली नाही तेव्हा अंधार स्वतःच्या काळजात उतरला. त्याचे ते धाकधुक करणार काळीज पाहून अंधारालाही थोडे हायसे वाटले. त्याने त्याला घट्ट मिठीत घेतले.जशी रात्र उलटू लागली तसे स्वःताला आपल्याच हृदयाचे ठोके ऐकू यायचे बंद झाले. रात्रीचा नुस्ता किरकिराट.....
स्वतःचं काळीज हळूहळू थंडं होऊ लागलं पण स्वतः पळत राहिला ...जीव खाऊन... सूर्याच्या दिशेने.
किती मिनिटे,किती दिवस, किती महिने....
स्वतःला जाग आली तेव्हा एक भुंगा स्वतःच्या कानापाशी गुणगुण करत त्याला हाका मारत होता. दुपारचे कितीतरी वाजले होते. ऊन स्वतःच्या डोक्यावर थोपटत होते. सगळे वारे शांतपणे स्वतःभोवती उभे होते. स्वतःने डोळे उघडले तसे ऊन पटकन आत शिरले. काळजातल्या अंधाराला बाहेर हाकलत काळीज शेकले.
त्या दिवसापासून थोडसं ऊन स्वतःच्या आतच घर करून राहतंय. आतलं उन आणि बाहेरचं उन भेटलं की अजूनच मजा येते. मग चार दोन पक्षी, एखादा भुंगा, वार्यावर उडत जाणारे पान, दोन-एक फुलं, ढगाची सावली, गवताचे तृण सगळे स्वतःच्या काळजातलं ऊन पाहण्यासाठी आजुबाजूला गोळा होतात, गप्पा मारू लागतात.
स्वतः स्वतःच्या गोष्टींमध्ये त्यांच्या ही गोष्टी रंगवून लिहणार आहे.
चला , रस्त्यावरचं ऊन आता अंगणात पोहोचलय.
ऊन्हाला काळजात उतरवून घ्यायची वेळ झालीय, काळजातल्या उन्हाला उधळून द्यायची वेळ झालीय.
स्वतः
Submitted by Girija Pandit on 18 December, 2014 - 02:12
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तचं! वर वर गमतीदार वाटते
मस्तचं! वर वर गमतीदार वाटते तुझे लिखाण पण आतला अर्थ फार आवडतो.
कित्ती मस्तं!
कित्ती मस्तं!
साती, शुद्धलेखनाच्या चुका
साती, शुद्धलेखनाच्या चुका हायलाईट कर प्लीज. मायबोलीवरचे जाणकार pointers देतील ह्या आशेने लेख टाकला आहे.
बी:
आज स्वतःने स्वतःचीच गोष्ट
आज स्वतःने स्वतःचीच गोष्ट लिहायची ठरवली तेव्हा स्वतः रस्त्यावरचं ऊन पाहत खिडकीत बसला होता. ऊन हळुहळू फाटकातून आत शिरत होतं आणि स्वतः त्याच्या कडे नजर रोखून पाहत होता.
स्वतःला ऊन फार आवडतं, अगदी शेजारच्या झाडावरच्या घरट्यापेक्षा, त्यातल्या छोट्याश्या पिल्लापेक्षा आणि त्या पिल्लाला पळवून न्हेण्याच्या कल्पनेपेक्ष्याही जास्तं!
उन्हात बसलं की आतला गारठाही थोडा उबदार होतो असं स्वतः मला परवाच सांगत होता. तो म्हणे एकदा एका ओसाड रानामध्ये हरवला होता. रात्र होऊ लागली, सूर्य अस्ताला गेला. रानात अंधार वाढू लागला. हळू हळू अंधाराला पसरायला जागाच राहिली नाही तेव्हा अंधार स्वतःच्या काळजात उतरला. त्याचे ते धाकधुक करणार काळीज पाहून अंधारालाही थोडे हायसे वाटले. त्याने त्याला घट्ट मिठीत घेतले.जशी रात्र उलटू लागली तसे स्वःताला आपल्याच हृदयाचे ठोके ऐकू यायचे बंद झाले. रात्रीचा नुस्ता किरकिराट.....
स्वतःचं काळीज हळूहळू थंडं होऊ लागलं पण स्वतः पळत राहिला ...जीव खाऊन... सूर्याच्या दिशेने.
किती मिनिटे,किती दिवस, किती महिने....
स्वतःला जाग आली तेव्हा एक भुंगा स्वतःच्या कानापाशी गुणगुण करत त्याला हाका मारत होता. दुपारचे कितीतरी वाजले होते. ऊन स्वतःच्या डोक्यावर थोपटत होते. सगळे वारे शांतपणे स्वतःभोवती उभे होते. स्वतःने डोळे उघडले तसे ऊन पटकन आत शिरले. काळजातल्या अंधाराला बाहेर हाकलत काळीज शेकले.
त्या दिवसापासून थोडंसं ऊन स्वतःच्या आतच घर करून राहतंय. आतलं ऊन आणि बाहेरचं ऊन भेटली की अजूनच मजा येते. मग चार दोन पक्षी, एखादा भुंगा, वार्यावर उडत जाणारे पान, दोन-एक फुलं, ढगाची सावली, गवताचे तृण सगळे स्वतःच्या काळजातलं ऊन पाहण्यासाठी आजुबाजूला गोळा होतात, गप्पा मारू लागतात.
स्वतः स्वतःच्या गोष्टींमध्ये त्यांच्याही गोष्टी रंगवून लिहिणार आहे.
चला , रस्त्यावरचं ऊन आता अंगणात पोहोचलय.
उन्हाला काळजात उतरवून घ्यायची वेळ झालीय, काळजातल्या उन्हाला उधळून द्यायची वेळ झालीय.
(हे मला पटकन जमलं तेवढं दुरूस्त केलंय, अजून दुरुस्ती भरत मयेकर किंवा चिनूक्स सांगू शकतील.)
मराठी माझी पहिली भाषा
मराठी माझी पहिली भाषा नाही>>
मग तर हॅटस ऑफ टु यू.
अप्रतिम मराठी लिहितेस.
साती: :-) मदत केल्या बद्दल
साती:
मदत केल्या बद्दल धन्यवाद 
गिरिजा , आतल उन ,बाहेरच उन
गिरिजा , आतल उन ,बाहेरच उन ,काय मस्त लिहिलय्स!
आणि मराठी तुमची पहिली भाषा नाही यावर विश्वास नाही बसते.
पुढच्या ललिताच्या प्रतिक्षेत!
खूप सुरेख अलवार लिहिलंय. विषय
खूप सुरेख अलवार लिहिलंय.
विषय वेगळे आणि लिखाण प्रवाही आहेच आता एखादा अधिक विस्तारित गहिरा असा लेख लिहा सावकाशीनं. हा फॉर्म जबरदस्त आहेच!
हा फॉर्म जबरदस्त आहेच!>> अगदी
हा फॉर्म जबरदस्त आहेच!>>
अगदी बरोबर! हा फॉर्म इतका दुर्मिळ आहे ना ललित साहित्यात की तो लिहायला जमणे अवघड आहे. आणि तो गिरिजा ह्यांना जमत आहे हे माबोसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. ह्या फॉर्म मधे इथे फारसे लेखन झालेले नाही. पुर्वी 'एकटा' करायचा.
>>त्या दिवसापासून थोडसं ऊन
>>त्या दिवसापासून थोडसं ऊन स्वतःच्या आतच घर करून राहतंय. आतलं उन आणि बाहेरचं उन भेटलं की अजूनच मजा येते<< व्व्व्वा क्या बात है !
स्वतः ला सान्गुन ठेवावे से वाटते आहे की असे स्वतः सारखेच जगलो तर खरी गंमत आहे !!
गिरिजा, अजुन का नाही लिहित
गिरिजा,
अजुन का नाही लिहित थोडेसे...जास्त नाही पण एक दोन भाग अजुन...
छान वाटतो आहे हा प्रकार !!
मस्त लिहिलंय , आवडलं
मस्त लिहिलंय , आवडलं
खूप छान, आवडलं!
खूप छान, आवडलं!
खूपच छान लिहिलं आहे!!
खूपच छान लिहिलं आहे!!
खुप छान लिहिलंय गिरिजा.. नीट
खुप छान लिहिलंय गिरिजा.. नीट लक्ष देऊन, समजून घेऊन वाचावं लागलं. आता पहिल्या पानावर गिरिजा पंडित दिसलं की आधी तोच धागा उघडला जाणार
मातृभाषा नसताना इतकं ओघवतं लेखन वाचून अंबरिश मिश्रांचं लेखनही आठवलं.
हा फॉर्म तसा जड जातो समजायला. मला 'एक झाड दोन पक्षी'ची आठवण झाली.
साती, लगेच लिहून काढलंस, ग्रेट!
आता पहिल्या पानावर गिरिजा
आता पहिल्या पानावर गिरिजा पंडित दिसलं की आधी तोच धागा उघडला जाणार >> हा हा हा
अगदी माझेही असेच होते. आज मी सुमुक्ताचे सगळे धागे उघडून एक एक वाचले,. मस्त वेळ गेला.
अप्रतिम लिहिलय! स्वतःच्या आत
अप्रतिम लिहिलय!
स्वतःच्या आत शिरुन स्वतःचाच घेतलेला ठाव ...खुपच सुन्दर!
<<स्वतःने डोळे उघडले तसे ऊन पटकन आत शिरले. काळजातल्या अंधाराला बाहेर हाकलत काळीज शेकले.<<
ही सकारात्मकता... हे अस स्वतःलाच थोपटण... अगदी गोड वाटतय!
सई + ११११
सई + ११११
हे सुद्धा मस्त! आवडलं!
हे सुद्धा मस्त! आवडलं!
गिरिजा यांच्या या ललित
गिरिजा यांच्या या ललित लिखाणावर जी सहजछाया पसरली आहे ती एरव्हीचे अनेक कारणांनी मरगळून जाऊ शकणारे जगणे फुलून येण्यास निश्चितच सहकार्य करते...म्हणजे अगदी उदासक्षणी हे लेखन वाचल्यावर जणू वाटू लागते..."काळजातल्या उन्हाला उधळून द्यायची वेळ झालीय...." हे फार लोभसवाणे आहे. भाषेतील अंतस्थ पक्केपणामुळे आणि अनुरुपतेमुळे रोजच्या दिवसातील एक सर्वसाधारण प्रसंग...आतले ऊन आणि बाहेरचे ऊन... त्यांची सांगड इतकी की ते सारेच हवेहवेसे वाटू लागते वाचकाला.
वाचकसदस्यांकडून इथे प्रसिद्ध होणार्या प्रतिसादातून लेखिकेला ऊनाची जी सुखद ऊब लाभत आहे, त्यातून त्यांच्या लेखनकार्याला नक्कीच प्रोत्साहन मिळत राहील....सारेच काही आनंदी झाले आहे.
व्वा! सुंदर !
व्वा! सुंदर !
किती मस्त लिहिलय..
किती मस्त लिहिलय..
वाह!! तरल, हळुवार...
वाह!! तरल, हळुवार...
सुंदर.
सुंदर.
नितांत सुंदर संकल्पना,
नितांत सुंदर संकल्पना, लोभसवाणे लिखाण ....
मराठी, मायबोली नसताना, इतके सुंदर लिहिता, कमाल आहे, लिहित रहा...
नितांत सुंदर संकल्पना,
नितांत सुंदर संकल्पना, लोभसवाणे लिखाण>>>> +१००
आवडलेच
आवडलेच
आवडलं.
मराठी माझी पहिली भाषा
मराठी माझी पहिली भाषा नाही>>
कोणती आहे ?
लेख छान
लेखनशैली आवडली.
लेखनशैली आवडली.
Pages