आधुनिकता की उथळपणा ?

Submitted by वीणा सुरू on 15 December, 2014 - 10:16

१. या विषयाची आवड असेल तरच आपला प्रतिसाद द्यावा.
२. क्रुपया दुखावणारे प्रतिसाद टाळा.
३. अवांतर प्रतिसाद नकोत.
४. उथळ प्रश्नांना प्रतिसाद मिळणार नाही.

सोशल मीडीयावर स्वत:ला आधुनिक म्हणवणारा एक (किंवा अनेक) गट खूप आक्रस्ताळे पद्धतीने आपले म्हणणे मांडत असतो. त्यांची दहशत एव्हढी आहे की पारंपारीक गोष्टींमधल सायन्स समजून न घेता मोडीत निघत असताना हताशपणे पाहत रहावं लागतं. (याचा अर्थ जुनं तेच सोनं असा नाही).

आंम्ही मैत्रिणींनी नंतर अशा लोकांच्या नादाला लागणे सोडून दिले. जुनं ते सर्वच खोटं असंच आधुनिक शास्त्र म्हणतं की काय असा प्रचार चालू आहे त्याला आळा बसला पाहिजे असंही वाटत. चांगला योग जुळून आल्याने देशात सर्वत्र या पारंपारीक ज्ञानाचा सन्मान करणारे सरकार सिंहासनावर आरुढ झाले आहे. या सरकारचे वैशिष्ट्य म्हणजे जर या सरकारला एखादा निर्णय पटला की ते कुणाचीही पत्रास ठेवत नाही. त्यामुळेच परमपूज्य शंकराचार्यजींना आपली मतं व्यक्त करता येऊ लागली आहेत. या देशात बहुसंख्य लोक ज्या धर्माला मानतात त्या धर्माच्या सर्वोच्च धर्मगुरूला आपली मतं मांडता येऊ नयेत ही लोकशाही आहे का ? खरं तर कुणाला देव मानायचं कुणाला नाही हा अधिकार त्यांच्य़ाशिवाय कुणाकडे असणार तरी देखील सहिष्णू वृत्तीने त्यांच्या या अधिकाराकडे कानाडोळा केल्यास त्यांचं विधान बेसिकली चूक होतं का याबद्दल कुणीच बोलत नाही. फक्त तुटून पडने हेच दिसून आलं. सोशल मीडीयाचा हा एक मोठा अवगुण आहे.

जर आपलं पारंपारीक ज्ञान-विज्ञान मोडीत निघावं असं असतं तर मग आस्था चॅनेल का पाहतात लोक ? गेली कित्येक वर्ष लोक पूज्य रामदेवजी महाराजांबरोबर श्वास घेत आहेत. ते कशासाठी ? त्यांच्या पतंजली योगपीठाच्या औषधांवरचा लोकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे, ते कशासाठी ? बाबांनी कॅन्सरचे पेशंट बरे केल्याचं ते पेशंट्स स्वत:च टीव्हीवरून सांगताना देशाने, जगाने ऐकलं. फक्त या कामासाठी त्यांना नोबेल मिळू शकतं ( पण ते मिळणार नाही). पण दुर्दैवाने आधीच्या सरकारने त्यांना साधं भारतरत्न सुद्धा दिलेलं नाही ( त्या सरकारने पुरस्कार सोडाच, रामदेव महाराजांवर पोलीस सोडून अर्ध्या रात्री जे काही केलं ते सुद्धा देशानं पाहीलं आहे). अशा परिस्थितीत परंपराघत ज्ञानाला प्रतिष्ठा कशी मिळणार ? राजकीय द्धामधुमीत जे नमोभक्त सोशल मीडीयावर होत त्यांच्यामुळे अनेक गैरसमजांना हातभार लागला हे मला मान्य आहे. खरं म्हणजे यांच्यामुळे सरकारच्या इमेजचं नुकसानच झालेलं आहे. पण याचा अर्थ या सरकारचे समर्थन करणारे सर्वच असे आहेत असा समज करून घेऊ नये. ते असो.

आज सर्वत्र व्यभिचार वाढला आहे. सोशल मीडीयावर म्हणे तो वैयक्तिक प्रश्न आहे, व्यक्तीस्वातंत्र्य आहे. अरे, पण हे सर्व कुठे चाललं आहे ? त्यातूअ गुन्हेगारी वाढती आहे. महिलांवर हल्ले होतात. नवरा बायकोच्या जिवावर उठतो आहे, कारण काय तर दुसरी कुणी भवानी आवडलेली असते. या जोडीला अभिनेत्री नको त्या धंद्यात पोलिसांच्या जाळ्यात सापडत आहेत. हे काय समाज जिवंत असल्याचे लक्षण आहे की काय ?

हेच ओळखून पूर्वीच्या साधू संतांनी मनुश्याला अध:पतनापासून वाचवण्य़ासाठी सोप्या सोप्या वचनांची निर्मिती केलेली आहे. साध्या सरळ मराठीत सांगायचं तर परस्त्री मातेसमान हा सुविचार मनावर बिंबवला गेल्याने पूर्वीच्या काळी स्त्री ला आदर मिळत असे. तसच स्त्रियांसाठी वटसावित्रीचे व्रत तर आहेच आहे, शिवाय परपुरूष पित्यासमान हे वचन सुद्धा प्रचलित होते. यामुळे स्त्रीपुरूषांमधे एकमेकांविषयी वेडेवाकडे विचार येत नसत,. आजच मानसशास्त्र हे पूर्वीच्या लोकांनी कुठल्याही विद्यापीठात न जाता कोळून पिलेलं होतं हे यातून कळतं. .या सर्व जीवनविद्या साधू संतांनी सांभाळून ठेवल्या, समाजहितासाठी त्या पुढच्या पिढीला शिकवल्या.

थोरांचा आदर करण्य़ाची आपली परंपरा ही चेष्टेचा विषय नाही. या मागे काय विचार आहे हे आपण जेव्हां ज्येष्ठ होऊ तेव्हां कळतं. ज्येष्ठांकडे अनुभव असतो पण दुस-यावर अवलंबून असल्यानं पुढच्या पिढीने त्यांना आधार दिला तर त्यांचं म्हातारपण सुखाचं जाऊ शकतं आणि तरूण पिढीला अनुभवाचा फायदा होत असतो. अशाच पद्धतीने कित्तीतरी चांगल्या गोष्टी समाजात चालत आलेल्या आहेत. पण चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त निगेटीव्ह गोष्टींकडे लक्ष वेधून सगळंच मोडीत काढण्याला आधुनिकता समजल जातं. समाज अनुकरणप्रिय असल्याने हे लोण खाली खाली झिरपत जातं. अशा पद्धतीनं आपण एका अपरिचित संस्कृतीला कवटाळून बसत आहोत. या संस्कृतीला इतिहास नसताना विज्ञानाच्या नावाखाली नव्या अंधश्रद्धा जोपासत आहोत. जुन्याला कुठलाही विचार न करता विरोध हा या अंधश्रद्धेचाच भाग आहे. या लोकांना सांगा की वीज असते तर तत्काळ विश्वास ठेवतील. हे बटन दाबल्यावर वीज वाहते म्हटलं की विश्वास ठेवतील. पण वीज दाखवा असं आवाहन केलं की यांची बोबडी वळते .

या ठिकाणी आपण अशाच चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या अशा अंधश्रद्धांमुळे काळाच्या उदरात गडप होण्य़ाची शक्यता आहे त्यांची चर्चा करूयात.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अय्यो! रियाने कुठे लिहीलेय ड्यु आय डीन्चे खरे रुप? लिहीले असेल तर दावा हो.

बाकी उथळ झालेला आधुनीक धागा वाचकान्च्या प्रतीसादानी निथळतोय.

कुठल उत्तर? कुणाला दिले? केव्हा दिले? का दिले? कशाला दिले?:दिवा: ( क ची बाराखडी लिहावी वाटली.)

सध्द्या मायबोली वर यायला अजिबात वेळ नाही पण या धाग्यावरील प्रतिसाद वाचायला वेळ काढतेच आहे.
तं तै नां धन्यवाद. धागा २००० गाठणार ....

सुरेख | 7 January, 2015 - 07:51
सध्द्या मायबोली वर यायला अजिबात वेळ नाही पण या धाग्यावरील प्रतिसाद वाचायला वेळ काढतेच आहे.
तं तै नां धन्यवाद. धागा २००० गाठणार ....

--->

१०़ हजार करु ... २०१६ पर्यन्त

उत्तर देऊनही मजेशीर चर्चा चालू राहीली.
पारा हे एकच नाही तर आणखीही काही इंधनं वापरली गेल्याचं त्या पुस्तकात म्हटलंय. त्याची लिंक आधी दिली होती, पण त्या वेळी सगळेच हिंस्त्र मूड मधे असल्याने पुन्हा काही त्याबद्दल बोलायचं धार्ष्ट्य झालं नव्हतं...

पारा हे इंधन.. Proud

पारा ह्व अतीजड मूलद्रव्य आहे.. विमानात पारा भरुन ठेवला तर विमान खालीच बसेल.

मूळात तुमचा प्रश्नच चुकीचा आहे.
कुठे लिहून वगैरे कशाला ठेवायला पाहिजे?
बायबलची सुरूवात वाचली नाही का?
देव म्हणाला 'लेट देअर बी लाईट अँड देअर वॉज लाईट'
तो तर 'त्यांचा' देव. आपले एंशंट ऋषीमुनी त्याहून लई पॉवर्बाज.
ते नुसते म्हणाले की 'येऊ द्या विमान' की झालंच तयार विमान.
एरोप्लाण्ट आणि इन्फ्रास्ट्रक्चरची गरज तुमच्या आमच्या सारख्या आधुनिक आणि उथळ माणसाना.
त्यावेळच्या ग्रेट पर्सनॅलिटीजना याची काडीमात्रं गरज नव्हती.
मूळात तुम्ही आधुनिक काळाचे निकष लावून त्यावेळची सायंटिफिक प्रगती मोजताय तेच चुकीचं आहे.
उद्या म्हणाल पिवळ्या रंगाची पिवळता किलोत मोजून दाखवा. अहो पिवळतेला किलोचं मोजमाप नाही चालत.
तसेच पुष्पक विमानाला कॉकपिट कुठे आणि पंख कुठे आणि फ्यूएल कसलं हे तुम्ही काय विचारत बसलाय?
देव्/दानव म्हणाले ' चल रे विमाना' की त्या देवा/दानवाच्या पॉवरनेच उडायचं विमान. त्याला तुमच्या फड्तूस नविन विमानांसारखं एविएशन फ्युएल नी काय काय नाही लागायचं बरं.
चष्मा आणि फूटपट्ट्या बदला जरा!

(इतरत्र प्रकाशित प्रतिसाद)

दिवाळीत चम्मनचिडी नावाचा एक फटाका मिळायचा. एक डबी असायची, तिला वात असायची. वातेला उदबत्ती लावली की आतली दारू (इंधन) जळाल्याने उष्णता निर्माण होऊन ती डब्बी सुरुवातीला गोल गोल फिरत नंतर वर जायची. पा-याचा पण असाच काहीतरी वापर करत होते असं कुठं तरी ओझरतं वाचलेलं आहे. पाठीमागे लिंक दिलेली आहे. त्या ग्रंथामधे आपल्या शंकांची उत्तरे आहेत. मी काही तज्ञ नाही.

मला इथले प्रतिसाद वाचून मोठी गंमतच वाटतेय.
पारा जाय चढायचा त्यात..

इथे फक्त प्रश्न विचारतात. हे सोपं काम आहे. पुरावे दिले तर नालंदा विद्यापीठ जळाल्याचे पुरावे मागताहेत. नशीब हिंदुस्तान नावाचे राष्ट्र अस्तित्वात असल्याचे पुरावे अजून मागितलेले नाहीत.

मी हिंदुत्ववादी वगैरे नाही. पण बरेचसे विचार मान्य आहेत. तथाकथित पुरोगाम्यांच्या दृष्टीने बथ्थड, अवैज्ञानिक असणा-या हिंदुत्ववाद्यांपैकी अनेक जणांनी विज्ञानक्षेत्रात अत्युच्च योगदान दिलेले आहे. ते ही पुरोगाम्यांच्या दृष्टीने मक्का मदीना असणा-या युरोप, अमेरिकेतल्या आघाडीच्या संशोधन संस्था, विद्यापीठांमधून.

मोठी गंमतच झाली. सहज चम्मन चिडी म्हणून सर्च दिला तर महात्मा गांधीचे नाव असलेला कुठलासा ग्रामीण कायदा असं पेज आलं गुगळेंकडून. काय बै एकेक !

https://www.google.co.in/?gfe_rd=cr&ei=_XWtVIffHMLV8geXv4DgDQ&gws_rd=ssl...

चम्मन आणि चिडी वेगवेगळं शोधलेलं दिसतंय.

>> महेश | 7 January, 2015 - 12:16
छे रामदेवबाबा हे उत्तर नाहीये.
रावण हा असूर होता, असूरांना प्रिय पेय काय होते ? तसे तर ते देवांना पण होते, आणि अजुन पर्यंत अनेक मानवांना देखील आहे. मानव सोडून अन्य प्राणी पित नाहीत, आणि मानवाने अतिरिक्त सेवन केल्यास त्याचा प्राणी (पक्षी पशू) होतो. अनेकांना याची देही याची डोळा आपोआपच विमान प्रवास घडतो. असे ते दिव्य इंधन त्या काळात वापरले जात असावे, असा आमचा जावई शोध नव्हे तर्क
>>
मला माहित असलेल्या व्युत्पत्तीप्रमाणे सूरा पिणारे ते सूर म्हणजे देव आणि सूरा न पिणारे असूर. मस्तंपैकी सूरा पीत अप्सरांचे नृत्य बघायचं! मज्जा !! देवाचं पेय माणूस पण पिणारच. मग तो देवमाणूस बनतो.

चमनचिडीबद्दल मागे लिहिलेले होते.

अत्यंत अनप्रेडिक्टेबली उडणारा फटाका होता तो. त्यावर बंदी घातली गेली. तो दिसायला काजळाच्या डबीएवढा असायचा. पण वात पेटली की तो जळत कुठे उडेल हे ब्रह्मदेवाच्या तीर्थरुपांना सांगता यायचे नाही.

त्याकाळी माणसे चमनचिडी लावताना 'च्यायला आपल्यालाही असे वागता आले असते तर' असे मनात म्हणत जगाला शिव्या घालतच चमनचिडी लावायचे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, तीनपेक्षा अधिक मुले आणि चमनचिडी ह्या तीन बाबींवर साधारण एकाच काळात बंदी आली.

Wink

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, तीनपेक्षा अधिक मुले आणि चमनचिडी ह्या तीन बाबींवर साधारण एकाच काळात बंदी आली. >> एकाच वेळेचं नव्हतं माहीत.

चमनचिडी असं नाव का दिलं असावं ? चमन म्हणजे दोन अर्थ माहीत होते.

चमनचिडी असं नाव का दिलं असावं ?<<<

कुठेही सुरू होऊन कुठेही उडेल असा एक धागा २०१४ मध्ये निघेल हे तेव्हा माहीत असते तर त्या फटाक्याचे नांव 'आधुनिक उथळ फटाका' असेही ठेवले असते.

तेव्हा तळ्यातल्या गणपतीबाहेर एक वेडी बसायची तिला सगळे चमनचिडी म्हणायचे. ती तेव्हा ६८ ते ७० वर्षांची होती. ती सकाळी तळ्यातल्या गणपतीपाशी असली तरी दिवसभरात कुठेही दिसायची. त्यावरून ते नांव पडले.

>>दिवाळीत चम्मनचिडी नावाचा एक फटाका मिळायचा.<<
चम्मनचिडी वेदिक काळात होती का नाहि हा संशोधनाचा चिषय आहे परंतु त्यामागच्या प्रिंसिपल (प्रोपेलंट) वरुन एखादा अवलिया प्रेरणा घेउ शकतो.

यावरुनच आठवलं - रॉकेट्स्च्या तंत्रज्ञानाने झपाटलेले टीनेजर्स स्वतःच्या हिकमतीवर रॉकेट बन्वुन त्याचं यशस्वी उड्डाण करतात, त्यातलाच एक नासा एंजीनियर होतो - या सत्य घटनेवर एक सुंदर सिनेमा (ऑक्टोबर स्काय) आलेला आहे. जरुर पहा.

Pages