Submitted by शाबुत on 6 December, 2014 - 23:26
तिन प्रेमी युगल जोडपे फिरायला जातात... तिन मुले-तिन मुली... जंगलात पुढे जाता-जाता त्यांना एक मोठी नदी लागते... ती नदी पार करण्यासाठी एक होडी तिथे बांधलेली असते... या होडिची फक्त दोन व्यक्ती वाहुन नेण्याची क्षमता असते... होडी इकडुन- तिकडे नेण्यासाठी तिथे वेगळा व्यक्ती नाही... आता वास्तव असे की... त्यांचा आपापल्या जोडीदारावर विश्वास नाही...
>> थोडक्यात एका जोडप्यातला मुलगा आणि दुसर्या जोडप्यातली मुलगी यांना आपल्या एका काठावर ठेवायचे नाही.
>> दोन मुले आणि दुसर्या जोडप्यातली एक मुलगी जिचा प्रियकर तिकडच्या काठावर असे चालु शकणार नाही.
>> एक जोडपे म्हणजे एक मुलगा आणि त्याच्या सोबतची मुलगी एका काठावर चालु शकतात.
>> थोडक्यात मुलींना दुसर्या मुलापासुन वाचवायचे.
@ ह्याचे उत्तर नक्कीच सोपे नाही.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भरतनी बरोबर सोडवलं...
भरतनी बरोबर सोडवलं...
गजानन, वाघ बकरीचे कोडे वेगळे.
गजानन, वाघ बकरीचे कोडे वेगळे. हे वेगळे.
१ मुलगी तिच्या बॉफ्रे आणि दुसर्या एका मुला सोबत कोणत्याही किनार्यावर राहू शकते.
पण एक बकरी २ वाघांसोबत किंवा एक वाघ दोन बकर्यांसोबत राहिला तर वाघ बकरीला खाणार्/मारणारच
अनंतरंगी, होडी वल्हवत पैलतीरी
अनंतरंगी,
होडी वल्हवत पैलतीरी जाऊन येण्याच्या वेळेत जर चारित्र्य बिघडणार असेल, तर त्यासाठीची सुसज्जता काय वर्णावी! जबरदस्त प्रभावशाली यौवन दिसतंय एकेकांचं!
आ.न.,
-गा.पै.
रीया पुढचा कूटप्रश्न हा कि
रीया पुढचा कूटप्रश्न हा कि बकरीचा बॉ.फ्रे. कोण ?
बोकड
बोकड
१. मुलगा१ आणि मुलगी१ होडीतून.
१. मुलगा१ आणि मुलगी१ होडीतून. मुलगी१ उतरते. मुलगा१ होडी घेऊन परत जातो.
२. मुलगा२ आणि मुलगी२ होडीतून. दोघं उतरतात. मुलगी१ होडी घेऊन परत जाते.
३. मुलगा१ आणि मुलगी१ होडीतून. मुलगी१ उतरते. मुलगा१ होडी घेऊन परत जातो.
४. मुलगा३ आणि मुलगी३ होडीतून. दोघं उतरतात. मुलगी१ होडी घेऊन परत जाते.
५. मुलगा१ आणि मुलगी१ होडीतून. दोघं उतरतात.
भरत मयेकर... अभिनंदन! >>>
भरत मयेकर... अभिनंदन!
>>> तुम्ही योग्य पध्दतीने सोडवले आहे.
@ ह्या कोड्यात एक वेळ एक जोडीने होडी परत आणायची आहे... हे सहसा कोणाच्या लवकर लक्षात येत नाही... म्हणुन हे सहज सुटत नाही.
>>> @ नको त्या प्रतिसांदाना पुन्हा एकदा धन्यवाद!
घ्या.. आधीच त्या लोकांचा
घ्या.. आधीच त्या लोकांचा एकमेकांवर विश्वास नाही, वर त्यात तुम्ही त्यांना पोहायला लाऊन भिजवा, कपडे ओले करा, मग थंडी वाजणार, शेकोट्या पेटणार... चारीत्र्यावर डाग पडू न द्यायचे कोडे सोडवत आहात की पाय घसरायची वातावरणनिर्मिती करत आहात!
मयेकर ++++१
मयेकर ++++१
मयेकरांनी लाज राखली असामी
मयेकरांनी लाज राखली
असामी
आता दुसरे कोणीतरी कोडे
आता दुसरे कोणीतरी कोडे लिहा...
Pages