नमस्कार,
एजंट/दलालामार्फत घर विकतानाच्या व्यवहारात मला मिळालेली साधारण माहिती साधारण अशी:
०. घराची किंमत परस्पर पार्ट्यांनी एकत्र येऊन दलालासमोर ठरवणे. दलालाची फी किती असेल हे दलाल आणि आपण दोघांनी एकमताने ठरवणे.
१. घर ज्या सोसायटीत आहे त्या सोसायटीशी आपली असलेली मेंटेनस इ.ची थकबाकी आधी क्लिअर असली पाहिजे.
२. सोसायटीकडून समोरच्या पार्टीला घर ट्रान्सफर करण्यात सोसायटीची कसलीही हरकत नाही असे नमूद केलेले NOC घ्यायचे.
३. समोरच्या पार्टीकडून अॅडव्हान्स रकमेचे टोकन घ्यायचे. सर्वसाधारण ठरलेल्या व्यवहाराचा मेमोरँडम बनवणे. यात व्यवहार कितीला ठरला आहे, ठरलेली रक्कम किती टप्प्यांत, कोणत्या तारखांना/तारखांच्या आगोदर देण्याचे ठरले आहे हे नमूद केलेले असेल. त्याची मूळ प्रत समोरच्या पार्टीकडे आणि झेरॉक्स आपल्याकडे (घर विक्रेत्याकडे) राहील.
४. सोसायटीकडून घेतलेल्या NOC ची ओरिजिनल प्रत एजंटला घ्यायची.
५. ठरलेल्या टप्प्यानुसार रक्कम दिली जाईल तशी मेमोरँडममध्ये ते अपडेट करणे व त्याची पोच समोरील पार्टीला देणे.
६. ठरलेली किंमत पूर्ण स्वरूपात घर मालकाच्या ताब्यात आल्यानंतर रेजीस्ट्रेशन करणे.
७. रेजिस्ट्रेशननंतर घराचा ताबा कोणत्या तारखेला नवीन घरमालकाला द्यायचा (उदा. शैक्षणिक वर्षाखेरीस - ३० एप्रिलला) ठरले आहे, तसेच ताबा द्यायच्या तारखेपर्यंत आधीचा मालक नव्या मालकाला काही मासिक भाडे देणार आहे का? इ. हे स्टँपपेपरवर नमूद करून घेणे. त्याची मूळ प्रत नव्या मालकाकडे राहील. झेरॉक्स प्रत घर विक्रेत्याकडे राहील.
७. रेजिस्ट्रेशनच्या कागदपत्रांची एक प्रत घर विक्रेत्याकडे राहील व मूळ प्रत घर खरेदी करणार्याकडे राहील.
८. एजंटची/दलालाची फी देणे.
९. ठरलेल्या तारखेला घर खाली करून नव्या मलकाच्या ताब्यात देणे.
यात अनुभवी मायबोलीकरांची, त्यांना आलेल्या अडचणी, अनुभव याद्वारे भर घालून मार्गदर्शन करावे, ही विनंती.
वरच्या कोणत्या स्टेपवर काय अडचण येऊ शकते, त्याकरता काय खबरदारी घेणे गरजेचे आहे, यावर लिहिलंत तर मदत होईल.
मनापासून धन्यवाद.