समयीच्या शुभ्र कळ्या...
Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago
3
परवाच्या ११ वाजता बसस्टॉपशी उभा असताना हे एक फुल पायाशी पडले आणि एक ओळ आठवली 'समयीच्या शुभ्र कळ्या उमलून लवते आणि केसातली जाई पायाशी पडते'. जरी ही ओळ ह्या प्रसगांशी मेळ खात नाही तरी पण तिचे आठवणे छान वाटले. उन्ह इतके दाट होते त्यादिवशी की इतकुशा फुलाची सावली डोळ्यात सामावून गेली.
पुर्वी इथे २००४ मधे दिनेश बोलतोय नावाचा एक आयडी होता. त्यानी ह्या ओळीचा अर्थ सांगितला तो असा की देवाविषयी मन भावनेने आणि श्रद्धेने इतके ओतप्रोत भरुन आलेले आहे की केसातली जाई समयी तेवताना देवाच्या पायाशी निखळून पडली. ... समर्पित झाली. अर्थात खर्या अर्थाने मन देवाला समर्पित झाले. पण प्रश्न पडतो की पुरुष तर केसात फुल माळित नाहीत मग त्यांचे मन देवाला कसे समर्पित होत असावे??? उत्तर पुढे आहे...
आणि हा एक देवचाफा: देवाला देवचाफा वाहून :०)
विषय:
प्रकार:
शेअर करा
फोटो छान ! पहिले फुल
फोटो छान !
पहिले फुल स्पॅथोडीया.. मूळ स्थान आफ्रिका ( युगांडा )
बी, >>पुर्वी इथे २००४ मधे
बी,
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
>>पुर्वी इथे २००४ मधे दिनेश बोलतोय नावाचा एक आयडी होता. त्यानी ह्या ओळीचा अर्थ सांगितला तो असा की देवाविषयी मन भावनेने आणि श्रद्धेने इतके ओतप्रोत भरुन आलेले आहे की केसातली जाई समयी तेवताना देवाच्या पायाशी निखळून पडली<< अरे ते आपले दिनेश दा असतील. कारण असे अर्थ वगैरे तेच उत्तम उलगडुन सांगु शकतात !!
दोन्ही फोटो सुरेख !! त्या
दोन्ही फोटो सुरेख !!
त्या स्पॅथोडीया चा रंग काय सुरेख आहे नाही ?