Submitted by काउ on 24 November, 2014 - 17:32
सी बी डी बेलापुर आणि सीवुड दाराव्हे ते उरण हा भाग सध्या भविष्यातील तिसरी मुंबई म्हणुन पाहिला जात आहे.
सध्या या भागात रानमाळ , डोंगर , गावठाण , मालवाहतुकीचे अजस्त्र ट्यान्कर यवंचे दर्शन घडते.
पण भविश्यात खालील कनेक्शन्स अपेक्षित आहेत..
sea link शिवडी ते उरण समुद्र सेतु ... हा पूर्ण झाल्यास भारतातील सर्वात मोठा सेतु असेल.
सीवुड उरण रेल्वेमार्ग / मोनोरेल.?
बॅलापुर ते उरण मोठा सहा पद्री मार्ग
नवे अएर्पोर्ट
सागळे पुर्ण व्हायला २०२० तरी उजाडावे लागेल.
फ्लॅट घ्यायला हा परिसर कसा आहे ?
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कुणी नाही ?
कुणी नाही ?
http://www.landscapeindia.org
http://www.landscapeindia.org/index.html
इथे माहिती आहे
अॅप्रिसिएशन यायला वेळ
अॅप्रिसिएशन यायला वेळ लागेल...
ही फारच Looooooooooong Term
ही फारच Looooooooooong Term Investment आहे. तुम्हाला दृष्य काही दिसायला किमान १०/१५ वर्षे द्यायला हवीत. भारतात सरकारी कामे काय गतीने होतात याची कल्पना असेलच. यापेक्षा जे गुंतवणुक करायचे आहे ते
१. चांगल्या एरीयात उदा. खारघर इ. घेतलेत तर Appreciation Guaranteed.
2. हे पैसे बँकेत ठेवुन येणारे व्याज एखाद्या चांगल्या SIP मधे गुंतवा.
३. नुसत्या ७.७ वर्षे बँकेत ठेवलीत तरी पैसे दुप्पट होतील.१५ वर्षात चौपट!
जर तुमची रिस्क घ्यायची तयारीच असेल तर गुंतवा पण मग किमान १०-१५ वर्षे त्याबद्दल विसरुन जायचे आणि जर त्यानंतरही वाढले नाहीत तर त्याबद्दल वाईट वाटुन घ्यायचे नाही.
दोनच दिवसा आधी अरणमुळा केरळ
दोनच दिवसा आधी अरणमुळा केरळ येथील ग्रीनफिल्ड विमानतळ प्रोजेक्ट कँसल झाले आहे.
दोन हजार कोटी रुपये गुंतवणूक असणारा हा प्रोजेक्टला केरळ राज्य सरकारचा हिरवा कंदील आधीच मिळाला होता, पण आता कोर्टाच्याच ग्रीन ट्रिब्युनल बेंचने हा प्रोजेक्टची मान्यता काढुन घेतली आहे. ज्या कंपनीने ह्या प्रोजेक्ट मध्ये पैसे गुंतवले होते ते आता रस्त्यावर येऊ घातले आहेत.
प्रश्न ह्याच एका प्रोजेक्टचा नसुन भारतातील बेभरवशाच्या कारभाराचा आहे. मग तो कारभार सरकारचा असो किंवा खासगी कंपनीचा असो. वरील प्रकरणात KGS कंपनीने सरकारकडुनच प्रकल्पाला मान्यता मिळवलेली होती आणि ती मान्यता देणार्या सरकारच्याच एनव्हार्मेंटल अॅप्रेजल कमीटी नेच सरकारच्याच निर्देशाची
पायमल्ली केली अस कोर्टाने निदर्शनाला आणुन दिल होत.
भारतातील येणार्या प्रोजेक्ट च्या भरोश्यावर गुंतवणुक हा खुपसा जुगारच ठरेल !!
नवी मुंबै विमानतळाचे सर्व
नवी मुंबै विमानतळाचे सर्व जागेचे अॅक्विजिशन झालेले आहे.. लोकांचे समोरच पुनर्वसनही मंजुर झाले आहे.. पर्यावरण खात्याची मंजुरीही झाली आहे.
मायबोलिफेम मायबाप मोदीनीही विमानतळ आणु सेतु यांना २०१८ चे टार्गेट दिले आहे.
समजा हे दोन्ही प्रकल्प लांबले तरीही जागेचा विकास होतच आहे
http://en.m.wikipedia.org/wik
http://en.m.wikipedia.org/wiki/Navi_Mumbai_International_Airport
बिन्धास्त घेऊन ठेवा. किमती
बिन्धास्त घेऊन ठेवा. किमती फार नाहियेत. जमीनीतली इन्व्हेस्टमेंट वाया जात नाही. ५-१० लाख टाकायला हरकत नसावी. तेवढ्यात हजार स्क्वेअरफूट आले तरी म्हातारपणी ऐश कराल.
संदर्भः सीवूड्स इस्टेटीतल्या लोकांचे फ्लॅट्स. सिडकोच्या बिल्डिंगा होत्या एनाराय काँप्लेक्सात. २० वर्षे, आजचा भाव, अन करा हिशोब.
http://wap.business-standard.
http://wap.business-standard.com/article/economy-policy/navi-mumbai-airp...
City and Industrial Development Corporation (Cidco) plans to start the pre-development work, including relocation of power transmission lines and reclamation of land site, for the Navi Mumbai airport from January.
The work, expected to cost Rs 2,000 crore and take a year to complete, will commence after the completion of land acquisition later this month. According to Cidco’s planning, the first phase of the Rs 14,500-crore Navi Mumbai airport will be ready by December 2018.
हरकत नाही. सिस्टमेटीक
हरकत नाही. सिस्टमेटीक डेवलपमेंट होतेय त्या भागात. भविष्यात चांगला भाव येणारच. पर्यायच नाही. खारघर, वाशी वा बेलापूरमधीलही जे भाग डेव्हलप झालेत त्यांचे भाव आताच चढले आहेतच. टू बीएचके एक करोड पर्यंत जात आहेत. तर तिथे राहायला घर घेण्यापेक्षा जे विभाग पुढे डेवलप होणार आहेत तिथे गुंतवणूक म्हणून प्लॉट घेणे उत्तम. रिस्क काही असलीच तर ती फायदा कमी व्हायची आहे, नुकसानाची नाही
तिथली घरं जाऊन पाहिलीत का
तिथली घरं जाऊन पाहिलीत का कुणी? अजुन १५-२० वर्षांनी भाव यायला तोवर ती घरं टिकली पाहिजेत. मी उल्व्याची घरं पाहिलीत आणि बांधकाम ताजे असतानाची त्यांची अवस्था पाहता १५-२० वर्षांनी ती नक्कीच रि-डेवेलपमेंटला येतील असा अंदाज आहे.
तेव्हा तिस-या मुंबईत गुंतवणुक करताना तिथे प्रत्यक्ष जाऊन पहा आणि मगच काय ते कर.
कुठेही गेलात तरी २० वर्षात
कुठेही गेलात तरी २० वर्षात आता घरे रिडेवलपला येतीलच. वाळु सिमेंट प्रदुषणाने ग्रस्त आहे असे सांगुन बिल्डर सुटतात.
लँड्स्केप बिल्डर चांगला आहे असे ऐकुन आहे
Ulave ... Six thousand PSF
Ulave ... Six thousand PSF rate
In chirle , dighode it is 2 thousand PSF at present.
one day it will be 10 thousand
बाप्रे! भयंकर भाव आहेत की!!
बाप्रे!
भयंकर भाव आहेत की!!
ते दर फ्लॅटचे आहेत. प्लॉटचा
ते दर फ्लॅटचे आहेत.
प्लॉटचा दर गेल्या वर्षी सहा लाख गुंठा होत.. तो आता दहा - अकरा लाख झाला आहे.
मग प्लॉट घेऊन टाका, तात्काळ
मग प्लॉट घेऊन टाका, तात्काळ हजारपट वाढ आहे.
एक गुंठा = हजार स्क्वेअर फूट होतात रफली (१०८९ एक्झॅक्ट)
१० लाखात १००० स्क्वेफू = शंभर रुपये स्क्वेअरफुटाचा जमीनीचा भाव होतो. त्यावर किमान १० मजले बांधतात. यातल्या प्रत्येक मजल्याच्या स्क्वेअरफुटाचआ भाव आजच २-६ हजार सांगताहात तुम्ही.
एक गुंठा जागेत (३३x३३) मस्त ३-४ खोल्यांचं टुमदार घर प्लस आजूबाजूला छोटी बाग होते. बांधकाम ३० एक लाख पकडा. शिवाय नुसती ओपीडी चालवायला एक व्हरांडा पुरेल. नव्या जागेत दुकानही उत्तम चालायला हरकत नाही. एकादा मेडिकलवाला स्पॉन्सर पकडा. बिनखर्चात होईल
हो ... अगदी बरोबर... पण ते
हो ... अगदी बरोबर... पण ते होईस्तोवर त्या प्लॉटची राखण कोण करणार ?
जमीन हीच खरी जागा... फ्लॅट म्हणजे पत्त्याचा मनोरा. मलाही पटते ... पण .....
जसजसे शहर वाढत जाईल तशी
जसजसे शहर वाढत जाईल तशी गावठाणालाही जास्त एफ एस आय मिळेल्च .
लोकाना घराची गरज आहे तशी सरकारला इतकी लोकसंख्या अशी अॅकोमोडेट करायची याची चिंता असेलच .
त्यामुळे भविष्यात चांगलि डेवलपमेंट होईलच.
या ठिकाणी जागा घेताना हिंदुत्वाचे स्मरण करावे. पांडवानी खांडववन घेतले तेंव्हा तिथे जंगलच होते. नंतर तिथे इंद्रप्रस्थ उभे राहिले.
जय इंद्रप्रस्थ ! जय तिसरी मुंबै !
चान माहिती आहे
चान माहिती आहे
<<प्लॉटचा दर गेल्या वर्षी सहा
<<प्लॉटचा दर गेल्या वर्षी सहा लाख गुंठा होत.. तो आता दहा - अकरा लाख झाला आहे.>>
सहा लाख नव्हे, साठ ते सत्तर लाख रुपये गुंठा!
जानेवारीपासुन दर वाढणार. १ आर
जानेवारीपासुन दर वाढणार.
१ आर के . १० चा तेरा होणार.
प्लॉट विकत घ्यायला होम लोनच्या दरान दीर्घ मुदतीचे कर्ज मिळते का ?
प्लॉट एन ए झालेले
प्लॉट एन ए झालेले नाहीत.
प्लॉट एन ए नसल्यावर काय होते ?
नवीन नियमानुसार घर बांधायला प्लॉट एन ए करायची गरज नसते..या नियमाने नेमका काय फरक पडणार आहे ?
प्लॉट भविष्यात एन ए होउ शकतो का ?
मी विकत घेतलेल्या शेतजमीनीवर
मी विकत घेतलेल्या शेतजमीनीवर घर बांधू शकतो का?
माझे बाबा शेतकरी आहेत. शेतकरीपुत्र म्हणून मला तसे करता येईल का?
शेताच्या दहा टक्के भागावर घर
शेताच्या दहा टक्के भागावर घर बांधु शकता
ते प्लॉट नॉन एन ए आहेत. पण एस
ते प्लॉट नॉन एन ए आहेत.
पण एस बी आय वाला बोलला की कर्ज मंजुर होईल प्प्लॉटला. १० %. दर
म्ञा म्हटलं म्या डॉक्टर आहे.. तर बोलला मग व्याज फक्त ७.५ %
हे खरोखरच ऐकले की स्वप्नात ?
@ काउ हे बरे आहे तुझे.... कधी
@ काउ
हे बरे आहे तुझे....
कधी डोंबिवली तर कधी तिसरी मुंबई....
पण तुझा प्लॉट विकला गेला का?
माझा प्लॉट ? माझा प्लओट
माझा प्लॉट ?
माझा प्लओट विकायचा आहे , असे मी कुठे लिहिले आहे ?
मला प्लॉट घ्यायचा आहे.
डोंबोलिला रविवारी येणार आहे मी .. नएहरु मैदानसमोर अप्पम मस्त मिळतात. मला फार आवडतात. येणार का ?
येणार ना. आंतरजालावरचे थोर
येणार ना. आंतरजालावरचे थोर अवतारी आय.डीं.ना भेटायला नक्कीच आवडेल.
पण नेहरू मैदानातल्या अप्पम पेक्षा टिळक टॉकीजच्या मागच्या गल्लीत अप्पम चांगले मिळते...शिवाय तिथे कुर्मा परोठा पण चांगला मिळतो...
http://m.youtube.com/watch?v=
http://m.youtube.com/watch?v=LzWtB1yxDcw
१२.५ % मधील जमीन म्हणजे काय
१२.५ % मधील जमीन म्हणजे काय असते ?
Pages