Submitted by समीर चव्हाण on 21 November, 2014 - 06:43
इसम एक मोठा जगाला
निकालात काढाल त्याला
नका दाखवू स्वप्न कोणी
निजू द्याल थकल्या जिवाला
विचारांविना काय अमुचे
कुठे अर्थ ह्या भटकण्याला
बरोबर असे काय असते
पकडला जसा जो मिळाला
असूद्या मला दगड-धोंडा
नको देवपण पामराला
समीर चव्हाण
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इसम एक मोठा जगाला निकालात
इसम एक मोठा जगाला
निकालात काढाल त्याला
नका दाखवू स्वप्न कोणी
निजू द्याल थकल्या जिवाला
विचारांविना काय अमुचे
कुठे अर्थ ह्या भटकण्याला<<<
फार सुंदर खयाल
नका दाखवू स्वप्न कोणी निजू
नका दाखवू स्वप्न कोणी
निजू द्याल थकल्या जिवाला
अतिशय चांगली द्विपदी.
सुंदर सहज गझल
सुंदर सहज गझल
हटके खयाल सर्वच .गझल आवडलीच
हटके खयाल सर्वच .गझल आवडलीच
नका दाखवू स्वप्न कोणी
निजू द्याल थकल्या जिवाला
बरोबर असे काय असते
पकडला जसा जो मिळाला
<<<<हे त्यातल्यात्यातही अधिक छान वाटले
बरोबर असे काय असते पकडला जसा
बरोबर असे काय असते
पकडला जसा जो मिळाला <<<
शेर आवडणे पण नीट न समजणे असे काहीतरी झाले. त्यामुळे आधी हा शेर कोट केला नव्हता. कदाचित काही अतिशय वैयक्तीक अनुभव असावा जो ह्यापेक्षा नि:संदिग्धपणे मांडणे योग्य नसावे.
तूर्त, दोन्ही ओळी स्वतंत्ररीत्या आवडल्या आहेत.
शेर आवडणे पण नीट न समजणे असे
शेर आवडणे पण नीट न समजणे असे काहीतरी झाले.<<<< अहो बेफिकीर सर हा दि समीर चव्हाणांचा शेर आहे त्यांना समजला तरी त्याना पुरेसे असते मुळात अश्या सूपर इंटेलिजेंट लोकांना, इतरांना आपण काय म्हणू पाहत आहोत हे न कळले तरी फरक काय पडतो सांगा .
उलट असे लोक असे सपाट अंगाचे शेर खाचखळगेवाले वेष्टण लावून विकत असतात . वर आपल्या शहाणपणाचे तोरे मिरवायला मोकळे !!
इथे लोकांना जरा कोड्यात पाडावे ह्या साठीच हा शेर तसा केला गेल्याचे जाणवते. अश्या वेळी लोकांनी तो तथाकथित इंटेलिजन्स फाट्यावर मारून लागेल तो अर्थ लावायचा असतो हेच हा शेर सांगतो
पहा...एक शेर आपल्या ताटात वाढण्यात आला आहे .त्याचा कोणता अर्थ बरोबर की कोणता चूक ह्याच्या मागे न लागता आपण पकडू वा जो काय अर्थ हाताला गवसला तोच अर्थ प्राप्त करून घ्यायचा मिळवायचा ..योग्य समजायचा असतो असेच हा शेर सांगत आहे
बरोबर असे काय असते
पकडला जसा जो मिळाला
असो
अपनेकू क्या !!
न ए कु, तुमचा वरील प्रतिसाद
न ए कु,
तुमचा वरील प्रतिसाद वाचला.
आता एक उदाहरण कृपया वाचा.
एक दहावीचा क्लास (क्लास म्हणजे शाळेतील वर्ग नव्हे, तर स्पेशल ट्यूशन) आहे. त्यांचे म्हणणे आहे की ज्यांना ऐंशी टक्के मिळू शकतात त्या विद्यार्थ्यांवर अतिरिक्त प्रयत्न करून ते त्यांना नव्वदच्या वर टक्के मिळवून देऊ शकतात. पण ह्या ट्यूशनच्या जागा पूर्ण भरत नाहीत. मग ज्यांच्याकडे पैसे आहेत पण त्यांचा पाल्य पंचाहत्तर टक्केवाला आहे ते तिथे येऊन 'आमच्या पाल्याला अधिक गुण मिळवण्यास सहाय्यभूत ठराल का' असे विचारतात.
जागाच भरलेल्या नसल्याने क्लासचालक त्या'ही' विद्यार्थ्याला भरती करून घेतो आणि म्हणतो......
बरोबर असे काय असते
पकडला जसा जो मिळाला
आता ह्या शेराचा अर्थ तर लागेल, पण माझ्या ह्या शेराबाबतच्या प्रतिसादाचा अर्थ असा होता की इतकी थिल्लर भावना ह्या शेरामागे नसेल. काहीतरी वैयक्तीक, खासगी अनुभव असेल.
नवाच एक कुणीतरी म्हणजेच
नवाच एक कुणीतरी म्हणजेच वैवकु, किमान आपल्या नावाने तर लिहा.
कृपया वैयक्तिक शेरे टाळावेत.
मी शेर लिहितो. जसा येतो तसा.
शेर सपाट होतो की खालीवर ह्याच्याशी मतलब न ठेवता.
शेर जाणीवपूर्वक अवघड करण्याचा प्रश्नच उदभवत नाही.
सपाट शेर वाईट असे मत मी कधीकाळी दिल्याचे मलातरी स्मरत नाही.
असो, शेर फारच सोपा आहे. आयुष्यात बरोबर वा चूक असे काहीच नसते. जे जसे
पुढे येते तसे माणूस घेतो. कधी यश हातात येते तर कधी अपयश.
संपादित करीत आहे.
कोणाला काय म्हणायचे त्यावर आपला कंट्रोल नसतो, तेव्हा असे प्रतिसाद टाळणे उत्तम.
समीर
गझलबाबत सगळेच गंभीर आहेत (मी
गझलबाबत सगळेच गंभीर आहेत (मी सोडून), पण ते एकमेकांना काँट्रॅडिक्ट करत आहेत, हे चित्र दुर्दैवी आहे.
असो!
एक स्टेज अशी येते जेव्हा माणूस असे काहीतरी शब्दबद्ध करायला लागतो जे इतरांना आवडो न आवडो, त्याला स्वतःला निदान ते स्वतःपुरते फार फार प्रामाणिक वाटते.
ह्या पातळीला तुम्ही दोघेही आहात ही बाब माझ्यासाठी आनंददायी आहे. जितका समीर प्रदीर्घ अनुभवी आहे तितकाच वैवकु (वा नएकु) नवखा, पण गझलेबाबत दोघेही खूप गंभीर आहेत आणि मी तेवढे गंभीर होण्याच्या प्रयत्नात असल्यामुळे येथे व्याख्याने झोडत आहे. तेव्हा कृपया वाद मिटवूनच टाका.
वाद मिटवूनच टाका.<<< वाद आहेच
वाद मिटवूनच टाका.<<<
वाद आहेच कुठे बेफीजी ? जे चाललेय ते खेळीमेळीनेच चाललेय
ह्या शेरात मी सांगीतलेला अर्थ लावता येतो तुम्हचा आणि समीरजींचाही अर्थ लावता येतोच . आता असे अर्थ लावणारे आपण सरावाने असे करू शकत आहोत हे करण्याची बौद्धीक पातळी आपण लोकांनी मिळवलेली आहे . पण शेर सामान्यजनाना कळण्यात किती अडचणी आहेत पहा ...
>>बरोबर असे काय असते ? << प्रश्नार्थकता !! सहसा निगेटिव्हली घेतली जाणारी म्हणजे बरोबर असे काही नसते (मग चूक असेही काही नसते असा छुपा अर्थ पुढे येवू पाहतो ) . आता एक विधानात्मकता आली येथे !! चूक बरोबर असे काही नसते !! आता तत्त्वचिंतन आले येथे . जे पटणेबल आहे अनेक भारतीय दर्शनशास्त्रांमध्ये अनेकदा हा विषय -आशय उल्लेखिला जातो त्यामुळे माहीत असते जवळपास सगळ्याना . इथवर शेर कळायला अॅक्सेप्ट करायला सहज -सोप्पाय
पण ...>> पकडला जसा जो मिळाला << काय पकडला ? कुणी पकडला? कुणाचा पकडला ? का पकडला ?.... प्रचंड संदिग्धता !! अनावश्यक गूढता !! नेमका बेनेमकेपणा !! काय हासिल करायचे आहे ह्या ओळीतून ??(लिहिणार्याला अन वाचणार्यालाही ऑ ?)
असो शेर फसवा झाला आहे (फसलेला असे म्हणालो नाहीयेय मी प्लीज नोट दॅट
)
असो
चू भू दे घे
आपला नम्र
वैभव
______________________________
अवांतर :
भाषिक अडचणी पहा .. वर्च्या ओळीत असते (नपु. लिंगी )असे क्रियापद मग खाली पकडला मिळाला अशी पुल्लिंगी क्रियापदे . लोकांनी काय समजायचे सांगड कशी घालायची सांगा ना ?
असे करता आले असते की.....
खरा अर्थ आहे कुठे हा
पकडला जसा जो मिळाला
उल्याला पर्याय ......@समीरजी ..स्वीकारावेत अशी सूचना विनंती अग्रह वगैरे वगैरे काहीच नाही कृगैन
१) नसावा खरा अर्थ हाही
२) कळेना गुन्हा हा कुणाचा
३) कुठे बाक शोधत बसावा
४) तुझा हात नाही मिळाला
५)"प्रबंधा"त केली हुशारी
इत्यादी इत्यादी
वैभवः असो शेर फसवा झाला
वैभवः
असो शेर फसवा झाला आहे
मला माहीत नव्हते, असा विनोद कोणी करू शकते.
असो, जौ़कचा पुढील शेर आठवला (ज्यात उसे म्हणजे काय हे कोडेच.).
उसे हमने बहुत ढूंढा, न पाया
अगर पाया, तो खोज अपना न पाया
माझ्या हौस संग्रहाच्या मनोगतात केपलरचे एक विधान दिले आहे.
And the detailed exposition can no less obfuscate than the overly terse.
हे वाक्य समजून घेतले तर आपल्याला आयुष्यभर पुरेल. कृपया शब्दार्थ विचारू नये.
बाय दि वे माझ्या शेरात कुठलीही भाषिक अडचण नसून पहिले विधान जनरल असून दुसरे विधान
पर्टिक्युलर आहे. Logic चे एकादे पुस्तक पाहिल्यास फायदा होईल.
शब्दाला शब्द आणि उत्तराला उत्तर म्हणून लिहू नये.
जो पर्यंत सांगण्यासाठी मुद्दा नसेल तोवर मी लिहीत नाही.
तसेच छाटछूट पर्याय सुचविण्याची चेष्टा परत न केल्यास उत्तम.
अन्यथा इथे लिहिणे थांबवण्याचा अधिकार मला नक्कीच आहे.
समीर चव्हाण