Submitted by संतोष वाटपाडे on 6 November, 2014 - 23:02
वेदना लपवून सार्या हसवतो ओठास हल्ली
मात्र खोटे हासण्याचा होत आहे त्रास हल्ली..
सोबतीला तू अता नसलीस कि आनंद होतो
मोकळे निघतात कंठातून सारे श्वास हल्ली..
रिक्त डोळ्यातून माझ्या वेदना बाहेर येते
आसवांना लाभतो बिनशर्त कारावास हल्ली..
प्राक्तनाने ओढलेली रेघ का ओलांडते तू
वेगळ्या वेशात रावण हिंडतो सर्रास हल्ली..
मुखवटे लावून दुनिया फ़सवते प्रत्येक वेळी
मी कुणावरती बरे ठेवायचा विश्वास हल्ली..
थांब कर्णा कुंडले देऊ नको आता कुणाला
ओळखीतूनच फ़सवणुक जन्मते हमखास हल्ली..
-- संतोष वाटपाडे (नाशिक)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्राक्तनाने ओढलेली रेघ का
प्राक्तनाने ओढलेली रेघ का ओलांडते तू
वेगळ्या वेशात रावण हिंडतो सर्रास हल्ली..
थांब कर्णा कुंडले देऊ नको आता कुणाला
ओळखीतूनच फ़सवणुक जन्मते हमखास हल्ली.. >>>>>>> मस्त संतोषजी
रिक्त डोळ्यातून माझ्या वेदना
रिक्त डोळ्यातून माझ्या वेदना बाहेर येते
आसवांना लाभतो बिनशर्त कारावास हल्ली..<<< छान शेर
मी कुणावरती बरे ठेवायचा विश्वास हल्ली << व्वा छान ओळ
मतलाही बराच
रावणही चांगलाच शेर
पुलेशु
रदीफ एक्सप्रेशनच्या पाठीवरचे
रदीफ एक्सप्रेशनच्या पाठीवरचे ओझे होऊ नये, असे वाटते.
धन्यवाद.
रदीफ एक्सप्रेशनच्या पाठीवरचे
रदीफ एक्सप्रेशनच्या पाठीवरचे ओझे होऊ नये, असे वाटते.>>>>
समीरजी कृपया याबद्दल अजून सविस्तर सांगितले तर आनंद होईल मला. पुढील काळात जेव्हा कधी गजल सुचेल तेव्हा मी सुधारणा करण्याचा प्रयत्न करीन.
समीरजी कृपया याबद्दल अजून
समीरजी कृपया याबद्दल अजून सविस्तर सांगितले तर आनंद होईल मला.
मी सांगितलेली ओळ स्पष्ट आहे, असे वाटते.
तेच विधान वेगळ्याप्रकारे सांगता येइल. पण ते आपल्याला अपेक्षित नसावे.
आपण एका अंगाने विचार करून पाहू शकता. रदीफ शेरात अर्थाला घेऊन येतोय की
रदीफ जमीनीत आहे म्हणून आग्रहाने येतोय. आपण उत्तम कवी आणि अनुभवी आहात. तेव्हा आपल्यास विचारांती लक्षात येईलच. गझलेची चिरफाड करणे वा विकल्प सुचवणे प्रशस्त ठरणार नाही. खरेतर माझी कुवत नाही आणि स्वभाव तर नाहीच नाही. माझ्या विधानाने जर वाईट वाटले असेल तर जरूर सांगाल.
मी ह्यापुढे असे काहीही लिहिणार नाही.
समीर
श्वास आणि कारावास आवडले ...
श्वास आणि कारावास आवडले ...
समीरजी तुम्ही सांगितलेले
समीरजी तुम्ही सांगितलेले आवडेल मला ....मला गजलक्षेत्रात विशेष माहिती नाहिये अजून..... खरोखर चार चांगल्या गोष्टी शिकायला मिळाव्यात यासाठी आग्रह केला मी..... माझा अजूनही रदिफ्,काफिया,मतला या शब्दांमधे गोंधळ होतो.....इतर मित्र गजलक्षेत्रात आहेत म्हणून मीही प्रयत्न करतो अधूनमधून...जिथे खरंच काही माहिती नाही तिथे माहिती घ्यायला कधी लाजलोही नाही....कृपया गैरसमज न करुन घेता मार्गदर्शन करावे.....