Submitted by शाबुत on 1 November, 2014 - 08:15
आयुष्याच्या मध्यावर
सगळेच डाव नव्याने खेळावे असे वाटतात
कारण बर्याच चुका केल्या
भावनांना साद देत आलो
कधी व्यवहार केला नाही...
कधी कळाला नाही
आता हाच मैलाचा दगड
आयुष्याचा मार्ग ठरविणार...
पण माणसाच्या हातात फार काही नसतं
नशिबाच्या रेघोट्या शिवाय
वा़कड्या-तिकड्या रेषात
माणसाचं भाविष्य लिहलेलं असतं म्हणे
पण...
जे हात दिवसभर राबतात
त्यांना फक्त दोन वेळचं जेवणच मिळावं
यासाठी किती तर्क काढतात
किल्लेदाराचं नाव जगाला माहित
किल्ला बाधंणारे सगळे गायब
किती दिवस चालणार हे
काहितरी केले पाहीजे
जग नाही बदलले...
तरी स्वतः बदलले पाहिजे
सर्कशीत भरती आहे
रिंग मास्तरची...
*****
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा