"न" चा पाढा
Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago
9
दिवाळीला नको फटाके
होळीला नको पाणी
नवीन वर्षाला नको मदिरा
आणि ईदीला नको बकरी
दांडियाला नको टिपर्या
संक्रातीला नको पतंग
द्सर्याला नको सोने
गणपतीला नको मुर्ती
आणि महाशिवरात्रीला नको दुध
पुढे म्हणाल...
.. हनीमुनला नको प्रणय!!!!!
छे!!!!
हा पाढा नन्ना चा नाही
उत्सव साजरे करायला
मना इथे नाही...
पण जपलेल्या प्रतिकांवर
श्रद्धा उरली नाही!!!!
बी
विषय:
प्रकार:
शेअर करा
(No subject)
छान. पंतगीचं पतंग किंवा पतंगी
छान.
पंतगीचं पतंग किंवा पतंगी करा.
छान! विदर्भाच्या धाग्यावरुन
छान! विदर्भाच्या धाग्यावरुन इकडे आले म्हणा किंवा ती 'बी' ची कविता आहे.... पतंगी खटकला नाही ... विदर्भात पतंग चे बहुवचन पतंगी होतं!
मंजू पुर्वी मी पन्तगी असे
मंजू पुर्वी मी पन्तगी असे लिहिले होते हे की चुक होते म्हणून सातिने सुचना केली.
साती, बदल केला आहे.
सर्वांचे धन्यवाद.
बी परत एकदा पंतग झाले आहे..
बी परत एकदा पंतग झाले आहे.. ते पतंग हवं आहे...
धन्यवाद हिम्सकूल
धन्यवाद हिम्सकूल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आवडली...
आवडली...
छान
छान
दिवाळीला नको फटाके >> प्रदुषण
दिवाळीला नको फटाके
>> प्रदुषण न करणारे फटाके वाजवा कि.. नाही कोणी म्हटलंय ?
होळीला नको पाणी
>> दुष्काळग्रस्त भागात जाऊन खेळा कि हव्या तेवढ्या पाण्याची होळी.. नाही कोणी म्हटलंय ?
नवीन वर्षाला नको मदिरा
>> नो कमेंट्स.. इथे दारु आवडणारे असंख्य लोक्स अंगावर धावुन येतील. पण प्यायलात तरी गाडी स्वतः नका चालवु प्लीज. ते बेकायदेशीर आहे.
आणि ईदीला नको बकरी
>> पुन्हा नो कमेंट्स. धागा भरकटेल. मांसाहार वि. शाकाहार हा वाद जुना आहे.
दांडियाला नको टिपर्या
>> ध्वनीप्रदुषण न करता हव्या तेवढ्या खेळा कि.. नाही कोणी म्हटलंय ?
संक्रातीला नको पतंग
>> खुशाल उडवा. पण लहान मुलांना गच्चीच्या धोकादायक कठड्यांपासुन लांब ठेवा फक्त.
द्सर्याला नको सोने
>> खर्या सोन्याविषयी म्हणत असाल तर गुंतवणुकदार म्हणून तो तुमचा वैयक्तीक प्रश्न आहे.
आपट्याच्या पानांविषयी म्हणत असाल तर ती पाने वाटतांना एखादे आपट्याचे झाडपण लावले तर फार बरे होईल. (सेम फॉर वटपौर्णिमा).
गणपतीला नको मुर्ती
>> इको फ्रेंडली मुर्त्या घ्या कि.. नाही कोणी म्हटलंय ?
आणि महाशिवरात्रीला नको दुध
>> प्लीज. हे खरंच एखाद्या गरीब मुलाला पाजले तर जास्त दुवा मिळतील.
(अर्थात हा एक फु.स. आहे फक्त. बाकी निर्णय तुम्हीच घ्या).
पुढे म्हणाल...
.. हनीमुनला नको प्रणय!!!!!
>> त्या-त्या कपलचा वैयक्तीक प्रश्न.
पण जपलेल्या प्रतिकांवर
श्रद्धा उरली नाही!!!!
>> जर आपली प्रतिके पर्यावरणाचा र्हास करत असतील किंवा इतरांना उपद्रव करत असतील किंवा कोणाच्या जीवाला धोकादायक ठरत असतील तर त्यांच्यावर श्रद्धा तरी कशी ठेवायची हो? तुम्हीच सांगा.