बघता बघता दिवाळी आली कि तोंडावर. तूम्हा सर्वांना शुभेच्छा आणि वेळेवर पोहोचावा म्हणून देशोदेशीचा सुका मेवा आधीच पाठवतोय..
१) कॅलिफोर्नियाचे बदाम
२) इराणी " अनारदाणा". हा प्रकार मला दुबईला मिळाला. दुकानदाराला नाव विचारले तर त्याने अरबी नाव सांगितले.
चवीला अनारदाण्यासारखाच आहे पण बिया नाहीत. सलादवर टाकल्यास छान दिसतो. चटणी पण छान होते.
३) हॅझलनट्स.. हे फोडून खायचे असतात. आत छोटा नट असतो.
४) हे ब्राझिलनट्स.. अर्थातच ब्राझिलचे. याची चव साधारण सुक्या खोबर्यासारखी असते.
५) या आहेत सुकवलेल्या क्रॅनबेरीज. मी न्यू झीलंडवरून आणल्या.
६) अंगोलातले काजू. इथे पोर्तुगीजांनी भरपूर काजूची झाडे लावलीत पण इथल्या लोकांना बिया काढायचे तंत्र नीटसे
अवगत नाही. ( पोर्तुगीजमधे पण "काजू" असाच शब्द आहे. )
७) हे साऊथ आफ्रिकेतून आलेले मकाडामिया. माझ्या सगळ्यात आवडता खाऊ. केनयात हे खुप छान आणि स्वस्त
मिळतात. ( भारतात शेवटी बघितलेला भाव २,४०० रुपये किलो होता )
८) इराणी पिस्ते
९) इराणी शहतूत ( तुतीची फळे ) चवीला फार छान लागतात पण निवडून खावी लागतात.
१०) केनयन चेस्टनटस.. भाजून किंवा उकडून खातात.
११) आक्रोड पण मिळाले काल..
परत एकदा दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा !
मी पैला
मी पैला
मस्तच ....
मस्तच ....
वॉव, ब्राझिलनट्स.. काहीसे
वॉव, ब्राझिलनट्स.. काहीसे फणसांच्या उकडलेल्या बियांसारखे दिसतायत. पिस्त्यांवरुन नजर हटत नाहीये.
पिस्ते सुंदर दिसतायतं !!!!
पिस्ते सुंदर दिसतायतं !!!!
दिनेशदा, तुम्हाला सुध्दा
दिनेशदा, तुम्हाला सुध्दा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
फोटो बघुन सर्वांची चव चाखावीशी वाटत आहे.
मस्त खाऊ , दिनेशभाऊ ! ते
मस्त खाऊ , दिनेशभाऊ !
ते मकाडामिया चवीला कसं असत ?
दिनेशदा तुम्हालाही (इन
दिनेशदा तुम्हालाही (इन अॅडव्हान्स) दिवाळीच्या शुभेच्छा!!!
पिस्ते सुंदर दिसतायतं !!!!>>>>+१. मस्त फोटो आलाय.
यंदाच्या भारतभेटीत सगळा सुकामेवा घेऊन या.
व्वा! काजु खुप टेमटींग आहेत!
व्वा! काजु खुप टेमटींग आहेत! मकाडामिया पहिल्यांदाच बघते आहे...
आभार दोस्तांनो. मकाडामियाची
आभार दोस्तांनो.
मकाडामियाची चव एकमेव असते. अगदी कुरकुरीत पण आक्रोड ते काजूगर कशाचीच तुलना करता येणार नाही.
काही मायबोलीकरांनी चाखले आहेत ते.
हो जिप्स्या, आणायलाच हवा !
मस्तच ! मुंबईत फोर्टला
मस्तच !
मुंबईत फोर्टला अमेरिकन ड्रायफ्रुट स्टोअरेमध्ये हे सारे पाहिलेत, त्याची आठवण झाली.
मुंबईत फोर्टला अमेरिकन
मुंबईत फोर्टला अमेरिकन ड्रायफ्रुट स्टोअरेमध्ये हे सारे पाहिलेत, त्याची आठवण झाली.>>>> तिथे ही मकाडामियासुध्दा असणारच. दिनेशदांनी मकाडामियाबद्दल जे लिहिले आहे त्यामुळे मकाडामियासाठी अमेरिकन ड्रायफ्रुटसला भेट द्यावी लागणार.
वत्सलाने आणलेल्या
वत्सलाने आणलेल्या क्रॅनब्रेरीजची आठवण झाली.
नरेश, दादरला बेबी बिस्किट
नरेश, दादरला बेबी बिस्किट मार्टमधे मिळेल. महात्मा फुले मंडईत स्वस्त मिळतील.
दिनेशदा, दादरला बेबी बिस्किट
दिनेशदा, दादरला बेबी बिस्किट मार्ट नक्की कुठे आहे?
चला दिवाळी सुरू झाली
चला दिवाळी सुरू झाली डोळ्यांसाठी.दिनेश शुभेच्छा.
शिवाजी मंदीरहून, सेनाभवन कडे
शिवाजी मंदीरहून, सेनाभवन कडे जाताना डाव्या हाताला रस्त्यावरच आहे. तिथे दोन तीन सुक्यामेव्याची दुकाने आहेत.
धन्यवाद दिनेशदा, त्यातील छेडा
धन्यवाद दिनेशदा, त्यातील छेडा बिस्किट मार्ट माहित आहे.
त्यांच्याकडे पण मिळेल.. महाग
त्यांच्याकडे पण मिळेल.. महाग असणार पण थोडे तरी घ्याच.
दिनेश धागा उघडल्या उघडल्या
दिनेश धागा उघडल्या उघडल्या उगिचच वाटलं की माकडमियाँ चा फोटो नसला तर मी नक्की विचारेन.
एका गटगला उरलेले सर्व माकडमियाँ मी घरी घेऊन गेले होते. त्यामुळे चव मला चांगलीच माहित आहे.
दक्षे.. आणि सगळ्यांनी तूझा
दक्षे.. आणि सगळ्यांनी तूझा आपण अजिबात हेवा करत नाही असे भाव तोंडावर आणले होते !
दिनेश
दिनेश

मस्त.ते नारंगी आणि शेवटच
मस्त.ते नारंगी आणि शेवटच केनयन चेस्टनटस माहीत नव्ह्तं. मकाडामिया नाव नसत लिहिलं तर मला त्या नारंगी गोळ्या वाट्ल्या असत्या.
हॅझलनट्स हे फोडल्यावर कसे
हॅझलनट्स हे फोडल्यावर कसे दिसतात त्याचा एक फोटो टाकायचा ना
दिवाळीचा हार्दिक
दिवाळीचा हार्दिक शुभेच्छा....
नवीन प्रकारांची माहीती मिळाली.मकाडामिया मला माहित नव्हते.
तुम्हि इतकी भटकंती करता हयाच ही खूप कौतूक वाटल
रीया, फोडता फोडताच तोंडात
रीया, फोडता फोडताच तोंडात टाकले जातात. पुढच्या वेळेस आठवणीने फोटो काढेन.
भटकंतीची हौस आहेच.
गोपिका, मकाडामिया खुपच छान लागतात चवीला. माझ्या एका मित्राला दिले होते त्याने त्याचे गुरवारचे उपवास केवळ मकाडामिया खाऊन केले
माकडमियाचे कौतुक बास. मला पण
माकडमियाचे कौतुक बास.
मला पण हवेत मग ते
रीया.. आता जुलैपर्यंत वाट
रीया.. आता जुलैपर्यंत वाट बघायला हवी. ऑस्ट्रेलियात पण छान मिळतात ते. तिकडून कुणी येणार असेल तर ..
दिनेश दा लै भारी तोंपासु....
दिनेश दा लै भारी तोंपासु....
दिनेशदा मी ह्या सगळ्या वस्तू
दिनेशदा मी ह्या सगळ्या वस्तू खाल्ल्या आहेत. आमच्याकडे आई हिवाळा आला की सगळा सुका मेवा कांडून त्याचे लाडू करते. त्यात ती डि़क टाकते. उडीदाचे सुद्धा लाडू करते. इथे सिंगापुरमधे हिवाळा नाही म्हणून ह्या गोष्टी खूप खाता येत नाही. कारण, खूप गरम असतात.
हॅझलनट्स हे फोडल्यावर कसे
हॅझलनट्स हे फोडल्यावर कसे दिसतात >> काबुली चन्यासारखे दिसतात ना
चॉकलेट बणवताना आणले होते
Pages