"रुनम्या तुझ्या नावाचा अर्थ काय रे?" ...... प्लीज, आणि नावात काय आहे बोलू नकोस.
"तुला कसे समजले, मी हेच बोलणार होतो ते?" , अचंबित होत मी उद्गारलो.
"तुझी विनोदबुद्धी तेवढीच आहे रे .." मुस्काटात मारल्यासारखा तो उत्तरला आणि शेजारच्या दोन पोरी फिदीफिदी हसू लागल्या.
आता त्या मित्राच्या मताशी सहमती दर्शवायला हसल्या, की हसल्यावर आपण सुंदर दिसतो या गैरसमजातून हसल्या, कळायला मार्ग नाही. पण माझ्यावर काही विनोद घडला की गरजेपेक्षा जास्त हसण्याची फॅशनच आलीय सध्या आमच्या ऑफिसमध्ये.
"तुम्ही मला रुनम्या अन् रुशी, अशी हाक मारतात ते पुरेसे आहे ना, अर्थ बिर्थ आणि कशाला हवाय?" मला माझ्याच नावाचा अर्थ माहीत नाही हि नामुष्की लपवायला मी सारवासारव करू लागलो.
"नाही तर काय ऋन्मेऽऽष हाक मारू ?? पार दुष्यंत-शकुंतलाच्या काळात गेल्यासारखे वाटते ते .. कोणी ठेवले रे तुझे असे अॅंटीक नाव ?"
"ए आज्जीवर जायचे काम नाही .."
"ओह्ह आज्जीने का?? बर्र बरं.. मग ठिकच आहे " .. पाठोपाठ पुन्हा फिदिफिदी झाली.. जळला आज्जीचे नाव घेत सेंटी वातावरणनिर्मिती करायचा चान्स घ्यायला गेलो, तर त्याचा पण पचका केला.
"मला सांग, तू स्वताचे नाव देवनागरी लिपीत लिहायला कधी शिकलास?" .. भाई आज पुर्ण फॉर्मात होता. पर बात मे, दम भी तो था! बहुतांश लोक आपले नाव स्वत:च्या हाताने लिहायला एवढ्या लहान वयात शिकतात, की कोणते ते वय हे आठवूही नये. पण मला मात्र पक्के आठवत होते की ईयत्ता चौथीपर्यंत मला ऋन्मेषचा ऋ लिहायला जमत नसल्याने मी तिथे चिनी भाषेतले कसलेसे चिन्ह काढत पुढे स्पेस (रिकामे घर) देत मेष लिहायचो. यावरून मेष या शब्दाचा नेमका अर्थ माहीत असलेले काही संस्कृतप्रचुर मित्र मला मेष मेष करत हाक मारायचे..... आणि स्वताच हसायचे!
पाचवीला गेल्यावर मी मोठ्या कष्टाने "ऋ" लिहायला शिकलो खरे, पण त्यानंतर मला इतरांना सांगावे लागायचे, अरे बाबांनो ऋन्मेषचा "ऋ" ऋषीतला येतो, हृदयातला नाही.. आणि मग एके दिवशी एके शुक्रवारी हृतिकचा ‘कहो ना प्यार है’ रिलीज झाला आणि लोकच मला समजवायला लागले, अरे गाढवा तूच चुकतोयस, तुझे नाव हृन्मेषच असणार .... अरे कमाल आहे, असणार काय असणार??
असो, जर कोणी नेटाने इथपर्यंत वाचत आले असेल आणि अजूनही या लेखाचा आशय समजला नसेल तर काही नाही आपले सहजच .. आज सकाळी पुन्हा एक माझा मित्र म्हणाला, काय रे हे तुझे नाव, असे कसे अतरंगी .. आणि संध्याकाळी पुन्हा माझी ग’फ्रेंड म्ह्णाली, किती गोऽऽड आहे नाव तुझे.. इश्श! कसली फिलींग येते. एवढेच नव्हे तर ऋन्मेऽऽष मधील "ऽऽ" सुद्धा तिचीच देण आहे.
तर मित्रांनो, तो जो कोण म्हणतो नावात काय, त्याला लाडाने हाक कोणी मारलीच नाय
आपलाच लाडका,
ऋन्मेऽऽष
शीर्षकात विलीबाबाला का वेठीला
शीर्षकात विलीबाबाला का वेठीला धरलाय उगाच..
(नावात काय आहे हे त्याचे उद्गार आहेत माहितीये. रोमिओ ज्युलिएट मधे आहे ती ओळ)
इतर कुणाच्या नावाचा टॅटू जोवर
इतर कुणाच्या नावाचा टॅटू जोवर काढून घेत नाही तोवर नावात काहीही नाही. मात्र त्या नंतर ..... नावाशिवाय काही नाही.
<शीर्षकात विलीबाबाला का
<शीर्षकात विलीबाबाला का वेठीला धरलाय उगाच.<> हो ना. मी तेच वाचायला आले होते.
पचका झाला.
<< मी तेच वाचायला आले
<< मी तेच वाचायला आले होते.पचका झाला.>> हेंच तर नाममहात्म्य आहे ! म्हणे, नांवात काय आहे !!!
पु. ल. देशपांडे यांच्या
पु. ल. देशपांडे यांच्या वार्यावरची वरात नाटकात देशपांडे एका गावात एका कार्यक्रमाकरिता जातात. त्या कार्यक्रमात एक गुजराती शेटजीची पत्नी भाषण करते. त्यात ती शेक्सपीअरचा उल्लेख "सेक्सपीअर" असा करते. तेव्हा देशपांडे तिची चूक सुधारायचा प्रयत्न करतात तर ती त्यांना ठासून प्रत्युत्तर देते की नावात काय आहे असं त्या लेखकानंच सांगून ठेवलंय ना? मग चुकीचं नाव उच्चारलं तरी काय फरक पडतो.
हेंच तर नाममहात्म्य आहे !
हेंच तर नाममहात्म्य आहे ! म्हणे, नांवात काय आहे !!!
>>>>
बिंगो भाऊ !!!!!
शेक्सपीअर भाऊंचे नाव वापरून त्यांनाच दाखवले बघा नावात बरेच काही आहे.. प्रतिसाद चार येवोत वा चौदा, चारशे लोक्स धाग्यावर फिरकून नक्की जाणार
आणि हो, तसेही लेखाचा शेवट पाहिल्यास लक्षात येईल की शेवटचे वाक्य शेक्सपीअरनाच उद्देशून असल्याने हे शीर्षक समर्पक देखील आहे.
चेतनजी
शेक्सपिअर की शेक्सपीअर ?
शेक्सपिअर की शेक्सपीअर ?
शेक्सपिअर की शेक्सपीअर
शेक्सपिअर की शेक्सपीअर ?
>>>>>
मूळ नाव shakespeare हे मराठी भाषेत नसल्याने त्याचा शुद्धलेखनाचा नक्की असा काही नियम बनवू शकत नाही.
<< त्याचा शुद्धलेखनाचा नक्की
<< त्याचा शुद्धलेखनाचा नक्की असा काही नियम बनवू शकत नाही.>> खरंय. शेक्सपिअर/ शेक्सपीअरने इंग्रजीत 'ऋन्मेऽऽष' कसं लिहीलं असतं, असाही विचार मनात चमकून गेला !
भाऊ
भाऊ
सुंदर आणि विनोदी लिहिले
सुंदर आणि विनोदी लिहिले आहे.
बाकी शेकस्पिअर ला लाडाने काय हाक मारणार? 'शेकू?'
शेकू आमच्या शाळेत एक शेखर
शेकू
आमच्या शाळेत एक शेखर कुलकर्णी नावाचा मित्र होता त्याला शेकु म्हणायचो
याच धर्तीवर, अमित कुलकर्णी - अकु
समीर पाटील - सपा आणि हर्शल पाटील - हपा .. अश्या जोड्या होत्या