Submitted by वैवकु on 6 October, 2014 - 09:05
नको टांगूस माझी लक्तरे ही
जगाला सांगतिल सगळे खरे ही
सयी सांभाळणारे पूर होते
तशी काठावरी काही घरेही
पुन्हा गोठ्यात हंबरतील गाई
पुन्हा लाडात येतिल वासरेही
जरा हासून बघ ह्या वेदनेला
पुन्हा येणारही नाही बरे ही
जरासे मौन घे आकाशगंगे
(किती वाचाळ आहे बापरे ही !)
निघू शतपावलीला सोबतीने
पहा मिटतील सारी अंतरे ही
दिशांनो द्या जरा ओढाळ हाका
पुढे जातील माझी पाखरे ही
असावी ही खरी किमया जिभेची
तुझी गोडी नसावी साखरे ही
तुझी आभाळपुण्याई तुकोबा
जळावरती तुझी गाथा तरे .. ही....
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्मृत्या सांभळणारे पूर
स्मृत्या सांभळणारे पूर होते
तशी काठावरी काही घरेही... स्मृती, असेही चालेल की
बाकी.. ठिकठाक
इडली व भाकरीप्रमाणे स्मृतीचे
इडली व भाकरीप्रमाणे स्मृतीचे अनेकवचनही स्मृतीच होत असावे!
>>>पुन्हा गोठ्यात हंबरतील गाई
पुन्हा लाडात येतिल वासरेही
जरा हासून बघ ह्या वेदनेला
पुन्हा येणारही नाही बरे ही
जरासे मौन घे आकाशगंगे
(किती वाचाळ आहे बापरे ही !)
निघू शतपावलीला सोबतीने
पहा मिटतील सारी अंतरे ही
<<<
शेर आवडले.
मौन घे ऐवजी मौन धर असे एक सुचले. कृ गै न. (कंसाची आवश्यकता समजली नाही).
ओके..
ओके..
>>> श्रीगणेशा | 6 October,
>>> श्रीगणेशा | 6 October, 2014 - 21:39 नवीन
ओके..
<<<
धन्यवाद सर्वांचे स्मृती चे
धन्यवाद सर्वांचे
स्मृती चे अनेकवचनही स्मृती असेच आहे हे मला माहीतच होते पण स्मृत्या असा शब्द आपसूकच सुचला मग मी तो बदलला नाही असे आड्नीड शब्द मला अनेकदा सुचतात ते आपसूकच सुचतात माझ्या भाषा चालवण्याच्या पद्धतीचा हा एक भागच असावा जणू . स्मृती असे लिहिले तर ते अनेकवचन म्हणून वापरले आहे हे लक्षत येइल की नाही असा विचार शेर करता करताच मनात आला असावा . आता माझ्याकडे २ पर्यायी शब्द आहेत खुणा आणि सयी बहुधा मी सयी हा शब्द घेईन .
तसेच धर हा पर्यायही सुचलेलाच पण मी घे हा शब्द घेतला याहीमागे माझी भषा असावी (जे मिसरे /अर्धमिसरे शायर मनात बोलत आहे असे दाखवतात त्याना कंस देता येतो असे माझे निरीक्षण पण असे करणे अपरिहार्य वगैरेही नसावे असेही वाटते...बस शायराची आवडनिवड असे म्हणाता यावे )
गणेशरावांच्या ओके मुळेही मी विचारात पडलो आहे . हा प्रतिसाद त्यांनी एकंदर गझलेसाठी दिला असावा असे वाटते .
ह्यातही चूक माझीच आहे . माझं वागण बोलणं इतरांच्या मनात माझ्याबाबत अप्रीती निर्माण करायला पुरेसं असतं
इतरांशी स्नेहसंबंध जुळवणे ते वाढवणे टिकवणे मला जमत नाही . उलट मी त्यांबाबत जरा उदासीनच असतो . त्यामुळे मला स्वतःची इमेज नीट बिल्ड करता आलेली नाही ना नीटशी प्रसिद्धी मिळवता आली .
वाईट ह्याचे वाटते माझ्या अश्या असण्यामुळे भोगावे मात्र माझ्या गझलेला लागते . ती जी दाद डीसर्व करते ती मी तिला कधी फारशी मिळवून देवू शकलेलो नाही .प्रसंगी अनेक रसिक ती वाचतात तरी का असा प्रश्न मला पडतो . काही अपवाद मोजकेच जे माझी गझल आपलीशी करू शकले आहेत म्हणून त्या आपुलकीपायी दाद मिळते .~ जसे शामजी...त्याहुनही कमी रसिक आहेत जे तिचा चांगुलपणा -वाईटपणा नेमका जाणून दाद देतात .~जसे बेफीजी
पण दुसरबिडकरानाच का बोलू ? शामजींचाही त्रोटक प्रतिसाद मनाचा हुरूप कमी करण्यास पुरेसा होता . आणि बेफीजींना तीनच शेर का आवडले बाकीचे का नाहीत हा विचारही नेहमीप्रमाणे व्यथित करणारा
गणेशजींनी निदान ओके असा त्रोटक (की खोचक :)) प्रतिसाद दिला पण निदान प्रतिसाद तरी दिला .
इतकेही लाभत आहे हेही छानच आहे की
आठव ती तगमग जेंव्हा हे इतकेसुद्धा ...नव्हते
_____________________________
दुसरबिडकर इथे शायर पाहून दाद देणारे जास्त भेटतील शेर पाहून दाद देणारे खूप कमी भेटतील . कोणीही कसेही असो सगळ्यांकडे पाहून ओठावर स्मित राखत जा कुणाशी वाद बीद घालत जाऊ नका जास्तीत जास्त सलोखा ठेवायला शिका . तुम्हाला गझल क्षेत्रात वावरताना माझ्या ह्या अनुभवजन्य टिप्स चा दीर्घकालीन फायदा व्हावा म्हणून सांगत आहे
विशेष धन्यवाद

आपला नम्र
~वैवकु
गझल ओक्के वाटली... नको टांगूस
गझल ओक्के वाटली...
नको टांगूस माझी लक्तरे ही
जगाला सांगतिल सगळे खरे ही
>>> 'जगा वाटेल हे सगळे खरेही' असं एक सुचलं... अर्थात तुमच्या अर्थापेक्षा हा अर्थ वेगळा होतोय...
'ही' रदीफमुळे माझातरी गोंधळ झाला थोडा... काही ठिकाणी सुद्धा या अर्थी आहे, आणि उरलेल्या ठिकाणी संबोधनाचं काम करतेय...
आईग्गं! तुमचा वरचा प्रतिसाद
आईग्गं! तुमचा वरचा प्रतिसाद आत्ता वाचला..

कशाला एवढं मनाला लावून घेताय? दादबिद मिळणं/घेणं हे विचार फक्त मनातच ठेवायचे हो... लिहित राहायचं...
वैवकु, तुमचा गैरसमज झाला आहे.
वैवकु,
तुमचा गैरसमज झाला आहे. प्रतिसादांचे टायमिंग बघा. कोणत्या प्रतिसादांचे तेही सांगतो. श्रीगणेशा ह्यांच्या गझलेवर मी दिलेला जो प्रतिसाद आहे त्याला बहुधा त्यांना ओके म्हणायचं होतं पण ते चुकून इथे ओके टायपून बसले असावेत.
यात्रीजी तुम्ही हसलात हे
यात्रीजी तुम्ही हसलात हे बरोबर केलं नाहीत . मी हे विसरणार नाही .
बेफीजी मला ते तसे वाटत नाही आहे पण आपण सांगत आहत तर मान्य करेन
धन्यवाद !!
गझल आवडली , धन्यवाद
गझल आवडली , धन्यवाद
छानै गझल.
छानै गझल.
आवडली....
आवडली....
धन्यवाद जोशी , डॉ . साहेब .
धन्यवाद जोशी , डॉ . साहेब . रतनलाल जी
सुंदर ! संपूर्ण आवडली, फक्त
सुंदर ! संपूर्ण आवडली, फक्त आकाशगंगेचं मौन जरा क्लिअर झालं नाही..
धन्यवाद भारतीताई आकाशगंगेचं
धन्यवाद भारतीताई
आकाशगंगेचं मौन ! ह्या शेरात मी मौन धर असे म्हणणार होतो पण त्याबद्दलची भूमिका वर एका प्रतिसादात दिली आहेच
)
आकाशगंगेत एकाच वेळी किती स्थित्यंतरे घडत असतील ! किती आवाज होत असेल .पण मनवी कानांच्या क्षमतेबाहेर असल्याने ते ऐकू येत नाहीत . इथे एक कवी आहे तो अकाशगंगेशी बोलत आहे / म्हणजे तिचेच ऐकून घेत बसला आहे (कविकल्पना! तो असं ऐकू शकतोय कारण तुम्हाला माहीतच आहे कवी नावाच्या जमातीचे अनेक व्यापार तनाने नाही तर मनाने चालतात )ही आकाशगंगा त्याच्याशी बोलते आहे तिलाही असे ऐकून घेणारे कोणी नसावे म्हणून ती कधी बोलायला न मिळाल्यासारखी बोलत सुटली आहे .
कवीला तिची बडबड जरा थांबवायची आहे (कविकल्पना!!) ह्याची कारणे अशी की..
१) एकतर कवीला आता केवळ शांतता हवी आहे
२)किंवा तिची काळजी वाटून तू आता बोलून थकली असशील जरा मौन घे अशा भावनेने तो म्हणत असावा
३)किंवा आता त्यालाही आपल्या मनात होणारी स्थित्यंतरे मनात घडणारे स्फोट्विस्फोट तिला ऐकवायचे असतील
...काय माहीत !!
किती वाचाळ आहे बापरे ही ...ही कवीने तिच्या स्त्रीसुलभ वाचाळपणावर मनातल्या मनात दिलेली उस्फूर्त पुरुषी टिप्पणी आहे (मनातल्या मनातच कारण स्त्रियांना तोंडावर असे म्हणायची बिशाद असते का कधी कुण्या पुरुषाकडे
धन्यवाद भारतीताई
'पाखरे' आणि 'साखरे' हे सर्वात
'पाखरे' आणि 'साखरे' हे सर्वात छान वाटले.
अरेरे...काय हे वैवकुदेवा.अहो
अरेरे...काय हे वैवकुदेवा.अहो माझ्या ओके चा विपर्यास नका करू हो.. माझ्यादृष्टीने माझं ओके म्हणजे व्यवस्थित अश्या पद्धतीने लिहिलय.. तुमचे बरेचशे शेर जरा हटके असतात त्यामुळे तुमच्या गझलेकडे आवर्जून येत असतो..!!
खरतर मी शिकाऊ ह्या दृष्टीनेच प्रत्येक गझलकडे बघत असतो,त्यामुळे प्रतिसाद जास्त खोलात जावून देत नाही इतकच...गैरसमज नसावा..आपल्या गजला वेगळं बोलतात ...अगदी रुटीनच्या पलिकडचं...!!
बर झालं इकडे फिरकलो..नाहीतर
बर झालं इकडे फिरकलो..नाहीतर उगाच तुमचा गैरसमज ठाम झाला असता..!!
नाराज नका होवू..तुम्ही छान लिहिता त्यामुळेच तर इकडे येतो ना...?शक्यतो मायबोलीवर मी कमी असतो..त्यामुळे.. !!
कविकल्पना छान आहे वैवकु
कविकल्पना छान आहे वैवकु
जरा हासून बघ ह्या
जरा हासून बघ ह्या वेदनेला
पुन्हा येणारही नाही बरे ही
निघू शतपावलीला सोबतीने
पहा मिटतील सारी अंतरे ही
व्वा….
सगळेच शेर आवडले पण... जरा
सगळेच शेर आवडले पण...
जरा हासून बघ ह्या वेदनेला
पुन्हा येणारही नाही बरे ही
विचारातली उत्कटता फार फार भावली.
धन्यवाद !